- निशांत सुर्वे
नव्या वाहतूक सुधारणा नियमांतर्गत मोबाइलवर बोलत गाडी चालवणार्यांचं लायसन्स तीन महिने रद्द करण्यात येणार असल्याची बातमी तर तुम्ही वाचलीच असेल. म्हणजे हा नियम लायसन्स नसणं, सिगAल तोडणं यांसारख्या अनेक गोष्टींना लागू आहे. मात्र मोबाइलवर बोलत गाडी चालवणार्या शूरवीरांना मात्र त्यातून वठणीवर आणता येईल, असं व्यवस्थेला वाटत असावं.वर वर अनेकांना हे नियम अन्यायकारकही वाटत असतील. हेल्मेट घाला, सिगAल पाळा, गाडी चालवताना फोनवर बोलू नका, ही काय सक्ती असंही वाटेल. मात्र रस्ते सुरक्षा आणि चालकासह अनेकांच्या जिवाला असलेला धोका पाहता हे नियम खरं तर राजीखुशीनं पाळायला हवेत.आता त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा गाडी चालवताना मोबाइलवर बोलण्याचा. असं काय काम अडीत असेल की मान वाकडी करकरून मोबाइलवर बोलावं लागत असेल? आणि अडीत असेलच तर गाडी बाजूला उभी करून मग ही बोलता येईल. मात्र काळ असा की, मोबाइल मॅनर्स या नव्या गोष्टीची जगभरातच एकूण भयंकर परिस्थिती आहे. आपल्याचकडे कशाला अमेरिकेत ऑसुरीऑन नावाच्या एका बडय़ा ग्लोबल लीडर टेक्नॉलॉजी सव्र्हिस लीडर असलेल्या कंपनीने अलीकडेच एक सव्र्हे केला. त्यात लोकांचे मोबाइल मॅनर्स तपासले गेले. त्यातले निष्कर्ष आपल्याकडे तंतोतंत लागू होतात. तपासून पहा, आपण सगळेच यापैकी कोणत्या ना कोणत्या कॅटेगरीत नक्की बसू.1. सव्र्हे केलेल्यांपैकी 45 टक्के लोक सांगतात की, आम्ही बाथरूम-टॉयलेटमध्ये; पण मोबाइल नेतो. सार्वजनिक ठिकाणीही नेतो. तिथून फोनवर बोलतो किंवा मेसेज करतो.2. 75 टक्के लोक म्हणतात की, आम्ही जेवण्याच्या टेबलवर फोन जवळच घेऊन बसतो. फोनवर बोलतो, मेसेज करतो. त्याचं बाकीच्यांनाही काही वाटत नाही.3. 85 टक्के लोक सांगतात की, आम्ही इतर लोकांचं सावर्जनिक ठिकाणी पर्सनल बोलणं मस्त ऐकत बसतो.4. मोबाइल ओव्हर शेअरिग्ां तर सगळेच करतात, इतकं शेअर करतो की काही गोष्टी फक्त शेअर करण्यासाठीच करतो.5. 90 टक्क्यांहून अधिक लोक मान्य करतात की, आपल्या अनेक खासगी गोष्टी आम्ही फोनवर बोलतो. कुठंही असलो तरी बोलतो. इतर लोक ते ऐकतात हेच विसरून जातो. सगळं खासगी जगणं फोनवर असतं, हेच आता विसरून गेलेलो आहोत.6. या 5 पैकी आपण किती कॅटेगरीत बसतो यावरून आपणच आपले मोबाइल मॅनर्स जोखलेले बरे.