शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

चमचमीत मिसळचा ठसका

By admin | Published: October 20, 2016 4:22 PM

अस्सल मराठी मिसळीची सध्या तरुण मुलांमध्ये जाम क्रेझ आहे. मिसळ कट्टे, मिसळ पिकनिक असं नवं काय काय तर रुजायला लागलं आहेच, पण मिसळ थेट फाईव्हस्टारच्या मेन्यूतही पोहचली आहे आणि लग्नाच्या बुफेतही. मिसळला हे ग्लॅमर कशानं आलं?

भक्ती सोमण
 
त्या दिवशी एका लग्नाला थेट पंचतारांकित हॉटेलमध्ये गेले होते. फाईव्हस्टारमधला मेन्यू म्हणजे काही ‘खास’ असेल असं आपल्या डोक्यात असतंच!
पण बुफे लागलं आणि पाहिलं तर पदार्थ बघून अवाक्च झाले...
कारण तिथला सर्व मेन्यू महाराष्ट्रीय होता. बटाटे वडे, कोल्हापूरचा तांबडा-पांढरा रस्सा, नागपूरचा पाटवडी रस्सा, गोळा भात, मसाले भात असे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातले पदार्थ हारीनं मांडलेले होते. आणि त्या साऱ्यांची राणी असावी अशी एक चीज तिथं होती, आणि तिच्याभोवती प्रचंड गर्दी होती..
ती मिसळ!
मऊसूत पावाबरोबर वाटाणा आणि मटकी असे दोन पर्याय असलेली ठसकेबाज मिसळ त्या फाईव्हस्टार वातावरणात चांगलीच घमघमत होती. तर्रीचा तिखट गंध नाकात जात होता. चौकशी केल्यावर कळलं की नवरानवरीच्या मित्रमंडळींना खूप आवडते म्हणून खास त्यांच्यासाठी मेन्यूत मिसळ ठेवली होती..
आणि मित्रमैत्रिणी तरी कोणते?
देशी तर होतेच पण काही परदेशीही होते.
आणि त्यातले काही परदेशी मित्र या मिसळीवर चक्क तुटून पडले होते. मटकीचा, वाटाण्याचा रस्सा, वर फरसाण, कांदा, कोथिंबीर आणि त्यावर थोडी लालेलाल तर्री.... अहाहाहा.... 
इतकी चमचमीत मिसळ की खाण्याऱ्यांचं पोट भरलं पण मन नाही! आणि अर्थातच जेवणाच्या इतर पदार्थांची चवच फक्त घेतली. 
तिकडे मिसळीच्या स्टॉलवरची गर्दी हटतच नव्हती. आणखी एक, आणखी एक म्हणत दणादण प्लेट-प्लेट मिसळ खाल्ली जात होती!
मिसळ टपरीवरून उठून फाईव्हस्टारपर्यंत पोहचली आणि जाता जाता तिचा चेहराच ग्लॅमरस झाला, हा बदलही आपल्या लक्षात आला नाही..
 
कॉलेजच्या कॅण्टीनमध्ये एकेक मिसळ मारून यायचं, एका मिसळीत तर्री ओतओतून चारपाच जणांनी ती खायची यात जी गंमत असते, ती आयुष्यभर सोबत करतेच. मिसळ मारण्यातलं झणझणीत थ्रिल ज्याला कळतं त्यालाच कळतो जगण्याचा ठसका.
तुम्हाला खूप भूक लागली असो वा अगदी हलकं काहीतरी खायला हवं असो, मिसळ ही तुमची सर्व इच्छा पूर्ण करते. उसळ आणि तर्रीच्या चवीवर आपलं पोटं किती भरायचं आहे, याचं गणित ज्याचं त्याला आपोआप कळतं. मूग-मटकी किंवा वाटाण्याची उसळ. त्यावर फरसाण आणि वर कांदा, तर्री घालून पावाबरोबर खायची. चमचमीतपणाचे सगळे आविष्कारच तिच्यात सामावलेले आहेत.
आणि मिळमिळीत बर्गरपेक्षा हा झणझणीत चमचमीतपणा तरुण मुलांना आवडला नसता तरच नवल होतं! म्हणून तर सध्या मुंबई-पुण्याच्या कॉलेजातही अनेकदा मिसळ पार्ट्या रंगतात. मिसळवर ताव मारले जातात. आणि तिचे फोटो ‘इन्स्टा’वरही जाऊन बसतात. 
कॉलेजात शिकणारा मिहीर राजे सांगतो, ‘माझ्या कॉलेजबाहेर पिझ्झा आणि मिसळचे स्टॉल आहेत. पण पिझ्झा कितीही आवडत असला तरी तो खाल्ल्यावर काहीवेळाने भूक लागतेच लागते. पण मिसळ खाल्ल्यावर तसं होत नाही. एक तर ती पौष्टिक आणि चविष्ट असते आणि बराच वेळ भूकही लागत नाही. त्यामुळे मी तरी आजकाल मिसळच खातो. एवढचं नाही तर घरी आईने उसळ केली तर मी मिसळ करून खाणार हे पक्क तिला माहीत असतं. त्यामुळे मिसळ सध्या माझी फेवरिट आहे.’ 
‘चमचमीत, चटकदार आणि पोटभरीचं खायला मिळावं यासाठी मी विविध पर्याय ट्राय केलेत, करतही असतो. पण मिसळ खाऊन मात्र माझं जास्त समाधान होतं. त्यातही तर्री मला जाम आवडते. त्यामुळे नेहमीच मिसळ खायला माझी पसंती असते,’ असं केतकी साने सांगते. 
 
मिसळच का?
या प्रश्नाचं या मुलांचं उत्तर एकच- चमचमीतपणा!!
आणि मुंबई-पुण्यातच कशाला नाशिक, खांदेश, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातही सध्या चुलीवरच्या तमाम मिसळींच्या अड्ड्यांवर तरुण मुलांची गर्दी दिसते. रविवारी मिसळ पिकनिक निघतात.
मिसळीच्या प्रेमापोटीच मग जागोगाजी मिसळ फेस्टिव्हल, मिसळ क्लब स्थापन होतात. ज्यातून दिसते ते मिसळीवरचे प्रेम. ते प्रेम मिसळीतल्या तर्रीप्रमाणेच चटकदार रंगात तरुण मुलांना पुन्हा आपले वाटू लागले आहे.
 
क्रेझ वाढतेच आहे...
मिसळीची क्रेझ तरुणाईमध्ये पूर्वीपासूनच होती. पण २०१४ साली जगातला सर्वात टेस्टी पदार्थ म्हणून 'आस्वाद'च्या माझ्या हॉटेलच्या मिसळीला पुरस्कार मिळाल्यानंतर अमराठी तरुणाई आवर्जून मिसळ खायला येऊ लागली. मिसळ हा पदार्र्थच असा चमचमीत आहे. म्हटलं तर जेवण, म्हटलं तर नास्ता या प्रकारात मोडणारा हा पदार्थ आहे. त्याच्या तर्रीची चव जमली की मिसळ जमलीच म्हणून समजा. कोणत्याही प्रकारची उसळ मिसळीसाठी चालते. त्यामुळे पौष्टिक पदार्थ म्हणूनही याकडे पाहिले जाते आहे. तरुणाईच्या चमचमीतपणाची आवड हा पदार्थ पूर्ण करतोय, असे म्हटले तरी चालेल
- सूर्यकांत सरजोशी, मालक, आस्वाद उपाहारगृह
 
पर्याय मिसळ फोंड्यूचा 
तरुणाई नेहमीच नावीन्याच्या शोधात असते. सध्या फोंड्यू तरुणाईच्या आवडीचा पदार्थ आहे. त्यामुळे मिसळीला आधुनिक टिष्ट्वस्ट फोंड्यूप्रमाणे देता येईल, असे सूर्यकांत सरजोशी म्हणाले. छोट्या शेगडीवर चिज सॉसमध्ये पाव डिप करून खायचा प्रकार म्हणजे फोंड्यू. यात बदल म्हणजे मूग, मटकी वगैरेची उसळ पात्रात ठेवायची आणि बाजूला कांदा, फरसाण आणि लाल ग्रेव्ही असे वेगवेगळे द्यायचे. आपल्या आवडीप्रमाणे पावाच्या तुकड्याला मिसळ आणि फरसाण लावून खायचे. हा फोंड्यू ३-४ जण एकत्र खाऊ शकतात. 
 
मिसळ कल्चर
पुण्यात नुकताच मिसळ महोत्सव होऊन गेला. नाशकातही काही वर्षे होतोय. याविषयी महोत्सवाचे आयोजक अंबर कर्वे म्हणाले, ज्याप्रमाणे आपल्याकडे साऊथ इंडियन पदार्थांचे कल्चर आहे तसेच मिसळीचे कल्चर असावे यासाठी हा प्रयत्न होता. शिवाय प्रत्येक ठिकाणच्या मिसळीची खासियत आणि चवही वेगळी असल्याने लोकांना मिसळीचे प्रकारही खाता आले. त्यामुळे आयोजक म्हणून हे करताना मलाही मजा आली. 
 
(लेखिका लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहेत.)