शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
2
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
3
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
4
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
5
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
6
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
7
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
8
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
9
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
10
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
12
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
13
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
14
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
15
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
16
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
17
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
18
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

स्टार्टअपचं गॅरेज

By admin | Published: July 21, 2016 4:51 PM

स्टार्टअपचा बोलबाला सगळीकडे आहे, कल्पनांचा सुकाळ आहे; मात्र या कल्पनांचं खऱ्या अर्थानं स्टार्टअपमध्ये आणि पुढे उत्तम व्यवसायात रूपांतर होणं हा प्रवास सोपा नसतो

स्टार्टअपचा बोलबाला सगळीकडे आहे,कल्पनांचा सुकाळ आहे;मात्र या कल्पनांचं खऱ्या अर्थानं स्टार्टअपमध्येआणि पुढे उत्तम व्यवसायात रूपांतर होणंहा प्रवास सोपा नसतो.म्हणून काही स्टार्टअप्सनाएका छताखाली आणूनत्यांना भांडवलासह मार्गदर्शनआणि तांत्रिक पाठबळ देणारंएक नवं गॅरेज मुंबईत सुरू झालं आहे..‘मेक इन इंडिया’चं बाळ जन्माला आल्यापासून स्टार्टअप आणि टेक्नॉलॉजी हातात हात घालून मोठे होतायत. म्हणजे गेल्या काही वर्षांत ‘रोटी, कपडा और मकान’ अशा मूलभूत गरजांची जागा आता ‘वाय-फाय’ने मिळवलीय. एकवेळ श्वास घेण्यासाठी योग्य जागा नसेल तरी चालेल; पण नेटवर्क मिळतंय ना त्याचं ‘कन्फर्मेशन’ हवं, असाच आजचा जमाना आहे. सध्या सगळ्या गरजा पूर्ण करण्याचं ठिकाणं म्हणजे स्मार्टफोन्स. तळहाताएवढ्या स्मार्टफोन्सवर अवघं विश्व एकवटलंय.जस्ट वन टच इनफ टू सोल्व्ह द प्रॉब्लेम..! आणि याच धर्तीवर नुकतंच मुंबईत दैनंदिन गरजांची भूक भागवणारं आगळंवेगळं ‘गॅरेज’ नुकतंच सुरूझालं!

हो. बरोबर वाचलंत तुम्ही, गॅरेजच!

पहिलवहिलं ‘गरजांचं गॅरेज’.रोजच्या लाइफमध्ये अनेक छोट्या-मोठ्या समस्या आपल्याला दिसतात. त्यामुळे उगाच ताण येतो, राग येतो, तर कधी चिडचिड अनावर होते. आणि मग एकदम अशीच चिडचिड इतरांनाही होत असल्याची जाणीव होते. त्यातूनच ‘हे अमुकतमुक ना असं असायला हवं होतं’ याचा जन्म होतो. खरंतर यालाच काहीसं वैचारिक खाद्य पुरवलं की हटके कल्पना सुचतात. आणि याच कल्पनांतून जन्माला आलेलं अनेकांच्या स्टार्टअपचं बाळ रांगायलाही लागतं. त्याचं उत्तम भरणपोषण केलं की एका यशस्वी स्टार्टअपमध्ये त्याचं रूपांतर होतं. आणि तिथून पुढे एका बड्या बिझनेसमध्ये हे सारं परावर्तित होईल अशी आशाही मनाशी मूळ धरते.याच साऱ्या प्रवासाचा एक भाग म्हणून हे ‘गॅरेज’ जन्माला आलं आहे.असं आहे हटके गॅरेज...मळकट कपडे घातलेली माणसं, भंगारातल्या गाड्यांचा खच, ग्रीसमध्ये काळेकुट्ट झालेले हात असं काहीसं ‘टिपिकल’ गॅरेजचं चित्र आपल्या डोळ्यासमोर असतं. पण या ‘चाकोरीबद्धते’ला मोडीत काढत मुंबईत लोअर परळच्या सन्मिल कंपाउंडच्या गजबजलेल्या कोपऱ्यात हे पहिलं ‘गरजा’ पूर्ण करणारं गॅरेज सुरू झालं आहे, तेही एकदम चकाचक कॉर्पोरेट वातावरणात. आणि तरुण मुलांच्या मस्त उत्साहात.

या गॅरेजमधे कॅफेटेरिया, टेलिफोन, वॉलपेंटिग आणि कानाकोपऱ्यातील ‘क्रिएटिव्हिटी’ला वावं देणारं वातावरण असं सारंच कॉर्पोरेट वळणाचं आहे. जवळपास १७० जणांची क्षमता असलेल्या या गॅरेजमध्ये पायाभूत सुविधा, संलग्न सेवा, सुसंगत इव्हेंट्स आणि तंत्रज्ञान पुरवलं जात असल्यानं हे स्टार्टअप्स समुदायातील मंडळींना आपल्या आवडीच्या कामावर फोकस करण्यासाठी महत्त्वाचं ठरत आहे. क्रिएटर्स, इनोव्हेटर्स आणि पॅशनेट तरुणांच्या मदतीने आपल्या व्यवसायाला नव्या उंचीवर नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुण स्टार्टअप्ससाठी ही सेवा आगळावेगळा पर्याय ठरणार आहे, हे निश्चित.

एकमेकांच्या साहाय्याने काम करण्याच्या सिलिकॉन व्हॅलीतील यशस्वी मॉडेलच्या धर्तीवर या ‘गॅरेज’ची उभारणी करण्यात आली आहे. केवळ एकत्रित काम करण्याची जागा म्हणून या ठिकाणाला मर्यादित न ठेवता ही एक डिजिटल इकोसिस्टीम आहे. यशस्वी होण्यासाठी स्टार्टअप्सना अगदी मार्गदर्शकापासून भांडवलापर्यंत, तंत्रज्ञान ते डिझाइन्स, बाजारपेठ ते कायदेशीर सल्ला व मनुष्यबळाच्या पाठिंब्यापर्यंत एका विशिष्ट प्रकारच्या इकोसिस्टीमची गरज लक्षात घेऊनच या गॅरजेच्या निर्मितीचा घाट घालण्यात आलाय.

म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर एका छताखाली साऱ्या सुविधा तर मिळत आहेतच, तरुणांची साथ आहे, बाजारपेठेत उभं राहण्याचे धडे आणि आर्थिक पाठबळ हे सारं एकाच ठिंकाणी उपलब्ध होत आहे.आणि तरुण हातांना नवी बळकटी मिळत आहे. एक नवा प्रयोगच यानिमित्तानं आकारास येत आहे.

पहिल्यावहिल्या ‘गॅरेज’मधील हे जे स्टार्टअप्स आहेत, त्यांच्या नुस्त्या कल्पना पाहा. केवळ कल्पनांच्या जोरावर जन्माला आलेल्या या नव्या स्टार्टअप्सच्या आयडिया आहेत. आणि अनेक तरुण डोकी या कल्पना लढवून व्यवसायासह आयुष्य जास्त सहज कसं जगता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत. या साऱ्या स्टार्टअप्सनी त्यांचे पोर्टल आणि अ‍ॅपही तयार केले आहेत.सोनिक भारतीयांना कायमच परदेशातील नोकऱ्यांचं आकर्षण असतं. त्यात शिकायला जाणाऱ्या अनेकांना तर पार्टटाइम नोकरीही हवी असते. अशाच काहीशा ‘टिपिकल’ विचारातून सोनिकचा जन्म झाला. लंडनमधील बार, पब्ज आणि रेस्टॉरण्ट्समधील पार्टटाइम जॉब्जची अचूक माहिती देणारं हे अ‍ॅप.. हॅप्पी बिझी शेड्यूल्डमुळे म्हणा कदाचित, पण आपणं शेवटचं कधी खळखळून हसलो असा प्रश्न विचारला तर काहीसं थबकायला होतं? म्हणजे या थबकण्यातून आपण हसणंही विसरतोय याची होणारी जाणीव विचार हे ‘हसण्यावारी’ नेऊ नये हा असं म्हणायला भाग पाडते. म्हणूनच डे टू डे लाइफमध्ये खास हसविण्यासाठी ‘हॅप्पी-हसते रहो’ सेवा पुरवतेय. सुमारे २२ भारतीय भाषांमधून मेसेज, फोटोज् आणि व्हिडीओज्च्या माध्यमातून लोकांना हसवायची धुरा उचलणारे अ‍ॅप आणि वेबसाइट आहे.द गुड साइज एखादा शर्ट, टॉप आवडला तरी केवळ ‘प्लस’ साइज नाही, आपल्या गुटगुटीत तब्येतीच्या मापाचं नाही म्हणून सगळं अडतं. याच ‘प्लस’ साइजचा विचार करून ‘द गुड साइज’ हे अ‍ॅप एका वेगळ्या फॅशन स्टेटमेंटला जन्म देतंय. ‘प्लस’ साइजच्या लोकांसाठीचं हे फॅशन मार्केटचं लक्ष वेधून घेतंय.अर्जन्सी एका साध्या, सहज विचारातूनच ‘अर्जन्सी’ची निर्मिती झालीय. योग्य वेळी व्यक्तीस मदत न झाल्याने सध्या जगभरात मृत्यूचे प्रमाण वाढतेय. याला आळा घालण्यासाठी अर्जन्सीचा चमू ग्लोबल प्लॅटफॉर्मवर काम करतोय. तातडीची वैद्यकीय सेवा या अ‍ॅपच्या माध्यमातून सहज उपलब्ध केली जाते आहे.टॉक टीव्ही घरात असो वा आॅफिसमध्ये क्रिकेट, फुटबॉल बघताना आपल्याला आपले फंटर्स सोबत लागतातच. एखादा गोल हुकला की शिव्या घालायला आणि अचूक टायमिंगला खेळाडूने कॅच सोडली की धिंगाणा घालायला सोबत लागतेच. ही सर्वांची सवय ओळखून जगभरातील ‘स्पोर्ट्स हॅपनिंग’शी जोडणारं आगळवेगळं अ‍ॅप. या अ‍ॅपच्या माध्यमातून खेळाचा आस्वाद घेताना आपल्या मित्र-मैत्रिणींची ‘व्हर्च्युअल’ सोबत मिळते हे याचं वेगळेपण.मेझी एखाद्या फंक्शनला जाताना नक्की काय घालायचं या प्रश्नात कायमच आपला वेळ वाया जातो. पण जर यासाठी तुम्हाला कोणी मदत केली तर? याच विचारातून तुमचं स्टाईल स्टेटमेंट तयार करण्यासाठी शॉपिंग एक्सपर्ट उपलब्ध असतील. शिवाय, तुम्हाला कपडे ‘व्हर्च्युअली’ ट्रायही करता येतील.स्कूपव्हूप ‘टिपिकल’ बातम्यांना अंतर देऊन केवळ भारतीयांसाठी मर्यादित असलेलं हे ‘स्कूपव्हूप’. हटके व्हिडीओज्, पॅरडी आणि स्टँडअप व्हिडीओज्साठी हे प्रचलित आहे.प्रेटमोड ‘फॅशन’साठी वेगवेगळ््या साइट्सचे आॅप्शन्स आहेत. पण यामुळेच बऱ्याचदा ‘कन्फ्युजन’ वाढतंय. त्यातून मार्गदर्शन मिळावं म्हणून ‘ग्लोबली’ बदलत चाललेली फॅशन येथे बघायला मिळेल.टॅपहिलसर्दी झालीय, ताप येतोय.. दोन दिवस झाले फिक्स शेड्यूल्डमुळे डॉक्टरकडे जायला वेळ नाही. अशावेळी थेट डॉक्टर तुमच्यापर्यंत आला तर? याच कल्पनेतून ‘व्हिडीओ कन्सल्टिंग’द्वारे उपचार करण्याची सेवा या पोर्टलने सुरूकेलीय. तुमच्या लॅपी, कम्प्युटर्स आणि स्मार्टफोन्सवरच एका क्लिकवर डॉक्टर तुम्हाला सहज उपलब्ध होईल.क्लिनिटो आजच्या तरुणाईला आरोग्यविम्याविषयी धडे देण्याचं काम हे करतात. आरोग्यविषयक कायद्याचं ज्ञान या माध्यमातून दिले जात आहे. लोनझोन लोन कसं मिळेलं याची माहिती बऱ्याच यंगस्टर्सना नसते. लोन क्लेम करताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी हे पोर्टल सर्वांनाच फायद्याचे ठरणार आहे. पहिल्यांदाच मुंबईत असं आगळंवेगळं ‘गॅरेज’ प्रत्यक्षात साकारलंय, आणि याचं मुख्य कारण म्हणजे ही काळाची गरज आहे. स्टार्टअप ट्रेंड सेट होत असताना काहीसा वेगळा मार्ग अवलंबून ‘गॅरेज’ सुरू केलंय. हेच वेगळेपण कायम टिकवण्याचाही प्रयत्न केला जाईल, यात शंका नाही. मुंबई ही सर्वार्थाने प्रत्येक क्षेत्राचंच ‘हब’ झाल्याने याचा श्रीगणेशा मुंबईतून केलाय. मात्र लवकरच या ‘गॅरेज’चं जाळं पसरत जाईल. तंत्रज्ञानाचा योग्य आणि अचूक वापर हे या गॅरेजच्या यशाचं गमक ठरेल, अशी आशा आहे.- क्रिस गोपालकृष्णन कार्यकारी अध्यक्ष, जेटसिंथेसिस (इन्फोसिस - सहसंस्थापक)जेटसिंथेसिसने पहिल्या ‘गॅरेज’ सुविधेच्या निर्मितीसाठी आणि जेटलॅब्जच्या माध्यमातून व्यवसायवृद्धी करणाऱ्या स्टार्टअप्समध्ये ३० लाख अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.- सिद्धार्थ राव, अध्यक्ष, जेटलॅब्जस्टार्टअप गॅरेज नेमकं आहे काय?आपल्याकडे ही कल्पना अत्यंत नवीन असली तरी अमेरिकेत, विशेषत: सिलिकॉन व्हॅलीत या स्टार्टअप गॅरेजचा बराच बोलबाला आहे. तिथं अनेक अशी स्टार्टअप गॅरेज आहेत, जी नवख्या उद्योजकांना काम सुरू करण्यापासून विविध सुविधा देण्यापर्यंत आणि बाजारपेठेत उभं राहण्यापर्यंतची मदत करतात. प्रत्यक्षासह आॅनलाइनही मिटअपसारखी गॅरेजेस पाहायला मिळतात. अनेकदा एकाच विषयात काम करणारेही एकत्र येत व विविध भाग वाटून घेत एक गॅरेज सुरू करताना दिसतात, ज्यामुळे तंत्रज्ञानादि सुविधांवरचा खर्च कमी होतो. तरुण मुलांनी उद्योगाकडे वळावे यासह नव्या कल्पना आणि तंत्रज्ञानाचा मेळ यात दिसतो.स्टार्टअपचा विचार करणाऱ्यांसाठी, मार्गदर्शन हवं असणाऱ्यांसाठीhttps://thestartupgarage.com ही साइटही उपयुक्त आहे, तिचं मुख्यालय अर्थातच अमेरिकेत आहे.- स्नेहा मोरे (लेखिका लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक/वार्ताहर आहेत.)