शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
2
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
3
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
5
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
6
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
7
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
8
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड
9
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
10
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
11
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
12
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
13
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
14
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
15
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
16
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
17
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
18
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
19
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
20
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!

दोस्तहो, स्पर्धा परीक्षांमागे पळू नका, असं का म्हणतोय हा त्या चक्रातून गेलेला तरुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2019 1:23 PM

शहरात आलो, वाटलं आपण अधिकारी होणार, मग देशाचा जीडीपी समजून घेताना मायबापाच्या कष्टाचं उत्पन्न मी कुठं खर्च करतोय याचा विसर पडला. गावाकडं ज्या आंब्याच्या झाडाखाली बसून अभ्यास केला, ते मनाच्या भूगोलाच्या नकाशातून आणि मग एक दिवस जाग आली तेव्हा हातात काहीच उरलेलं नव्हतं.

ठळक मुद्देमी आपबिती सांगतोय, वेळीच सावरा, मार्ग शोधा, या मृगजळामागे पळू नका..

अर्जुन गोडगे

अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता, अख्खा होरपळून निघालोय म्हणून लिहितोय हे.हा लेख दुसर्‍याचा आत्मविश्वास कमी होण्यासाठी लिहीत नाही. किंवा लोक म्हणतील याला यश मिळालं नाही म्हणून लिहितोय. पण, वास्तवाची जराशी जाणीव ठेवून आपली माझी लेखणी पाजळतोय.गावाकडे राहणार्‍या आमच्या निरक्षर मायबापाने रक्ताचं पाणी करून आम्हाला शिकवलं. त्यांच्या कष्टावर आम्ही शिकलो, वाढलो, घडलो. त्यांचे दुर्‍ख, प्रश्न, समस्या आम्ही जवळून बघितल्या. फक्त बघितल्याच नाहीत, तर अनुभवल्याही. त्या सगळ्याचा त्नास व्हायचा. मन अस्वस्थ व्हायचं. समोरचं चित्न बदलावं असं सारखं सारखं वाटायचं. पण मार्ग माहीत नव्हता. दिशा सापडत नव्हती.शिकल्यावर माणसाला दिशा सापडते म्हणतात. आम्ही शाळा, कॉलेजात अ‍ॅडमिशन घेतलं होतं. शिकत असतानाच मोठमोठय़ा क्लासवन अधिकार्‍यांची ‘गेस्ट लेक्चर’ ऐकायला मिळाली. ‘इकडे सगळं अगदी सोपं असतं’ अशा आविर्भावतली त्यांची ती भाषणे ऐकून माझ्या नि माझ्यासारख्याच माझ्या भोळ्याभाबडय़ा मित्रमैत्रिणींच्या डोक्यात ‘प्रशासकीय अधिकारी’ नावाचा किडा वळवळू लागला. प्रशासनात जाऊन आपले आणि समाजाचे प्रश्न सोडवायचे या विचारांनी मनाचा ताबा मिळवला. हळुहळु हा सगळा गोतावळा ‘स्पर्धा परीक्षा’ नावाच्या एका वेगळ्या अर्थव्यवस्थेत खेचला गेला. मी स्वतर्‍ आजवर पन्नास हजारपेक्षा जास्त परीक्षा फॉर्म भरले आहेत. बाप दुसर्‍याच्या रानात काम करतो, आईची साथ होती. वाईट वाटायचं; पण परीक्षा पास होऊ असंही वाटायचं. असं करत करत अर्ध आयुष्य गेलं तरी हाती काहीच नाही. मागं पुढं गडद अंधार.दुसरी नोकरी करून आपल्या एकटय़ाचं कल्याण करून घेण्यापेक्षा आपण प्रशासकीय सेवेत जाऊन देशसेवा करण्याचे झटके यायला लागले. शेताला पाणी देताना असो, जनावर राखताना असो किंवा सिक्युरिटी म्हणून नोकरी करताना असो वर्दीचे झटके. मोठी स्वप्नं पहात आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी जीवतोड मेहनत करा असले मोटिव्हेशनल कोट्स डोळ्यासमोर तरळायला लागले. मार्ग आणि दिशा सापडली असं वाटलं. मग सुरू झाला स्वप्नांचा पाठलाग. खरंच मधल्या काळात जी व्याख्यानं ऐकली त्यातून हवाच भरत गेली डोक्यात. अडाणी मायबापाच्या डोळ्यातील भावना मागे ठेवून आणि प्रशासकीय अधिकारी बनण्याची मोठी स्वप्नं डोळ्यात घेऊन शहरात आलो. मायबापाने कर्ज काढून, दागिने विकून किंवा बचत करून मिळवलेले पैसे त्याच्या हातावर होते. ‘100 टक्के अधिकारी’ करण्याची खात्नी देणार्‍या जाहिराती पाहून त्या नावाजलेल्या क्लासमध्ये प्रवेश घेतला. त्यांना माझ्यासारख्या अनेकांमुळे नवा ग्राहक आणि चांगला हमीभाव मिळाला होता.खरं तर हे मृगजळ आहे हे समजायला मलाच उशीर झाला.सकाळी लायब्ररीत जायला लागल्यापासून डोक्यावर परिणाम झाल्यासारखं वागायला लागलो. वेडय़ासारखं पुस्तकं वाचत सुटलो, रंजन कोलंबे कोळून प्यालो, राज्य प्रशासन वाचताना आपणही कार्यकारी मंडळातील प्रतिष्ठित अधिकारी झाल्याचे भास होऊ लागले. देशाचा जीडीपी समजून घेताना आपल्या मायबापाच्या कष्टाचे सकल वार्षिक उत्पन्न कुठे खर्च होतंय याचा त्यांना विसर पडला. आपल्या शिक्षणासाठी मायबापांनी लहानपणापासून घेतलेल्या कष्टाचा इतिहास आठवायचं त्याला बंद झालं. गावाकडे जिथं बसून परीक्षेचा अभ्यास केला ते आंब्याचे झाड त्याच्या भूगोलाच्या नकाशातून कधीच गायब झालं. चहा पिताना चहाच्या घोटांबरोबर रंगणार्‍या पश्चिम महाराष्ट्र की मराठवाडा, पवारसाहेब की मोदीसाहेब या ग्रुप डिस्कशनमध्ये सहभाग वाढला. लायब्ररीत बसून देशाचं राजकारण, अर्थकारण, इतिहास, भूगोल अभ्यासणार्‍या वर्गाचा देशात घडणार्‍या प्रत्येक घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन ग्रामीण ते शहरी असा बदलत चालला होता, ते खुळ्या सारखं वागणं समजत होतं. कळतंय; पण वळत नाही परिस्थिती झाली होती.एकंदर असंच सारं बरेच दिवस निवांत सुरू असताना अचानक प्री अ‍ॅड आली. आम्ही खडबडून जागे झालो. फॉर्म भरले. प्री दिली. मेन्स दिली. इंटरव्ह्यूवही दिले. नंतर रिझल्टची वाट बघण्यात दिवस निघून गेले. रिझल्ट लागला. अपेक्षित असतानादेखील यश मिळाले नाही. अभ्यास कमी पडला असं समजून आमचा आशावादी स्वभाव परत पुढच्या वर्षीच्या तयारीला लागला. माझ्यासारखे अनेक तिथं संख्येला तोटाच नाही. मात्न पुढच्या वर्षीही तेच. पंचवार्षिक योजना पूर्ण झाली तरी हातात काय नाही. हे चित्न दरवर्षीचेच ! प्रचंड निराश होऊन दिवस ढकलत होतो.शेवटी वय वाढलेलं होतं. खिशात पैसे नव्हते. लग्न जमत नव्हतंच. नोकरी मिळत नाही. व्यवसायाला भांडवल नाही. घरच्यांना काय उत्तर द्यायचं? पाहुणेमंडळी काय विचार करतील? गावात लोक काय म्हणतील?एवढे प्रश्न आणि मोठं अपयश सोबत घेऊन आम्ही भावी अधिकारी गावाकडे परत येतो. तेव्हा डोक्यात असतं प्रचंड नैराश्य. जीवन का जगतोय हे समजत नाही. लय वाईट वाटतं; पण मार्ग दिसत नाही. आईबापाचं कष्ट आठवलं की काळीज चर्र्र होतं; पण माझ्या कर्माने मी हतबल झालो होतो.मागील आठ-दहा वर्षाचा कोणताच हिशोब मी कुणालाच देऊ शकत नाही.तरी काही प्रश्न उपस्थित करून माझी व्यथा संपवतो. स्पर्धा परीक्षा तयारी करणार्‍या उमेदवारांच्या या नुकसानीला जबाबदार कोण?त्याची कारणं काय? दरवर्षी स्पर्धकांची संख्या वाढत आहे; पण जागा वाढत नाहीत. मग करणार काय? स्पर्धा परीक्षार्थीच्या पैशांवर क्लासेस, पुस्तक लेखक, विक्रे ते, झेरॉक्सवाले, हॉस्टेल, लायब्ररी, हॉटेल, चहावाले, मेसवाले, रद्दीवाले एवढंच कशाला आयोगसुद्धा श्रीमंत होत आहेत. पण उमेदवारांना काय मिळतं? कधीकाळी देशाच्या लोकसंख्येच्या विस्फोटावर पानभर निबंध लिहिणार्‍या वर्गाला बेरोजगारीच्या विस्फोटाची चाहुल एवढय़ा उशिरा का लागते? महाराष्ट्रातील फार मोठी बेरोजगारी स्पर्धापरीक्षा या क्षेत्नाने लपवून ठेवली आहे. मी स्वतर्‍ ते भोगलं आहे. पण व्यावहारिक जग किती विचित्न आहे हेही जगलो आहे. स्पर्धा परीक्षा तयारी करणार्‍या माझ्या मित्नांना स्वप्नांच्या दुनियेतून व्यावहारिक जगात कधी ना कधी यावेच लागणार आहे..हे सारं वाचून काही जण म्हणतील हा अपयशी ठरला म्हणून अक्कल पाजळतोय आहे.तर तसं नाही मित्रांनो, मी आपबिती सांगतोय, वेळीच सावरा, मार्ग शोधा, या मृगजळामागे पळू नका..