शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

स्टेपकट विथ नऊवारी अ‍ॅण्ड पुतळ्याची माळ

By admin | Published: April 01, 2017 5:55 PM

नऊवारी साडी ही फॅशन स्टेटमेण्ट ठरेल असं कधी कुणाला वाटलं होतं का?पण तरुण मुलींच्या नऊवारीचे नखरे वाढलेत खरे..

- विद्या राणे-शराफ 

नऊवारी साडी ही फॅशन स्टेटमेण्ट ठरेल असं कधी कुणाला वाटलं होतं का?पण तरुण मुलींच्या नऊवारीचे नखरे वाढलेत खरे..गुढीपाडवा उत्साहात साजरा झाला, आता रामनवमी. त्यात घरोघर चैत्रगौरीचं हळदीकुंकू.सेलिब्रेशनचा माहौल सर्वत्र आहेच. आणि या सेलिब्रेशनला फॅशनची जोड तर असतेच. कारण आजकाल आपल्याला सेलिब्रेशनचा बहानाच पाहिजे.म्हणून तर गुढीपाडव्याच्या शोभायांत्रात कितीतरीजणी बाईकवर बसून फेटे घालून मस्त मिरवल्या. आणि आता तर चैत्रगौरीच्या हळदीकुंकवांनाही अनेकजणी नऊवारी नेसत आहेत. नऊवारी, सो टिपीकल म्हणून नाकं मुरडण्याचा काळ कधीच सरला. आता नऊवारीही ट्रॅडिशनली फॅशनेबल झाली आहे. ही नऊवारी साडी आता आपण म्हणून तशी शिवून मिळते. त्यामुळे हव्या त्या रंगात, हव्या त्या स्टाईलची नऊवारी घालणं ( अर्थात घालणं, नेसणं नाहीच!) हे आता ‘इझी’ झालं आहे. अगदी लहान-लहान मुलीही नऊवारी साडीत खुलून दिसतात. नऊवारी साड्यांमध्येही वेगवेगळे प्रकार असून, प्रत्येक महिला आपल्या आवडीनुसार साडीच्या प्रकाराला प्राधान्य देते. या साड्या बेंगलोर सिल्क, बेळगाव सिल्क, प्युअर सिल्क, ओरिसा सिल्क अशा विविध फेब्रिक्समध्ये उपलब्ध आहेत. पैठणी, इरकल, टोपपदरी या नेहमीच्या साड्या तर आहेतच. नऊवारीला साथ म्हणून नथ, खोपा, खोप्याची फुलं, गजरे, सोनं किंवा चांदीची फूलं किंवा कळस, बोरमाळ, चपलाहार, मण्यांची माळ, कोल्हापूरी साज हे सारंच पुन्हा फिरुन नव्यानं तरुण आयुष्यात आलं आहे. यासगळ्या साड्यांबरोबर कोळी स्टाईल नऊवारीही नेसण्याची एक नवी क्रेझ आहेच. या प्रकारात साडी गुडघ्यापर्यंत नेसून पदर कमरेभोवती गुंडाळला जातो. तर वरच्या बाजूला दुपट्टा लावायची पद्धत आहेच. या साडीवर अंबाडा व त्यावर गुलछडीची वेणी, झुमके, लांब मण्यांच्या माळा, पुतळ्यांच्या माळा, बुगडी व खास कानातले काप हे सारंच मस्ट कॅटेगरीत वापरलं जातं आहे. चकचकीत, नेट, बिड्स, स्टोन्सनी सजलेली नऊवारी हे चित्र जरा पचायला अवघड होतं. पण या साड्या पाहाणाऱ्याची नजर खिळवून ठेवतात. यावर प्रिन्सेस ब्लाउज खूपच खुलून दिसते. अगदी माधुरी दीक्षित, सोनाली बेंद्रपासून ते विद्या बालनपर्यंत आणि कतरिना कैफपासून ते दीपिका पदुकोणपर्यंत सर्वांनीच अशी साडी नेसून, प्रेक्षकांना मोहिनी घातली आहे. या साडीवर स्टेप कट, लांब वेणी, अंबाडा अशी कुठलीही हेअरस्टाईल चांगली दिसते. मॅट आॅक्साइड किंवा डल गोल्ड दागिने अशा साड्यांवर अनेकजणी वापरतात.नऊवारी इज बॅक हेच खरं!