पोटात खड्डे छातीत धडधड
आपण शाळेत जायचं, तेव्हा कुठं असं बोअरबिअर व्हायचं नी स्ट्रेसबिस यायचा, आता तर काय येता जाता ऐकावं लागतं, मला जाम टेन्शन आलंय, बोअर होतंय, तुम्ही मला आणखी डिप्रेस करू नका.’
आईवडील नेहमी करतात या वयातल्या मुलांविषयी ही तक्रार की, त्यांना कशाचं टेन्शन येतं नी काय बोललं म्हणजे त्यांचा मूड जातो, त्यांना ‘लो’ वाटतं, बोअर होतं नी कशानं ते इनसिक्युअर फील करतात हे कळतच नाही !
15 वर्षाच्या मुलांच्या जगातला हा तसा अंधारा कोपरा. एरव्ही अत्यंत उत्साही, आनंदी असणारी ही मुलं हा विषय बोलत नाहीत. उडवून लावतात. तसं काही नसतंच म्हणतात, पण जरा हळूच मनात शिरलं तर जे सांगतात, ते ऐकून खरंच टेन्शन यावं. त्यातलेच हे काही महत्त्वाचे मुद्दे.
मुलींपेक्षा ‘मुलगे’ या सा:या चक्रात जास्त पिसतात, आणि जास्त कुढतात मनातल्या मनात.
1)घरची आर्थिक परिस्थिती
आपल्याला घरी पैसेच मागता येत नाही, आपल्या घरच्यांकडे पैेसेच नाहीत, गरिबी आहे किंवा जेमतेम आहे याचंच अनेक मुलांना टेन्शन नाही तर राग येतो. आपल्याला हवं ते मिळत नाही, यातून भयंकर चिडचिड होते. त्यात घरात सतत भांडणं-मारामा:या होत असतील तर ही मुलंही चिडकी होतात.
2) गालावर पिंपल-फोड-पुळ्या
आपल्या दिसण्याचं अनेकांना भयंकर टेन्शन येतं, भीती वाटते की लोक आपल्याला हसतील. चेह:यावर फोड-पुळ्या-पिंपल आलेल्या मुलांना तर जास्तच इनसिक्युअर वाटतं.
3) मित्रंनी तोडलं तर.
मित्रंच्या ग्रुपमधे, टचमधे रहावं, त्यांनी आपली टिंगल करू नये, टोमणो मारून टार्गेट करू नये म्हणून अनेकजण मित्र जे म्हणतील तेच करतात. त्यासाठी रिस्क घ्यायला तयार होतात. मनात नसूनही. अनेक गोष्टी करतात.
4)अभ्यासबिभ्यास
अभ्यासाचं टेन्शन तसं जुनंच, मात्र आता आईवडील सतराशेसाठ क्लासेस लावतात, खूप लक्ष देतात, हवं ते देतात, मागितलं ते मिळतं, तरी आपल्याला अभ्यास कठिण जातो, घरचे काय म्हणतील याचं टेन्शन येतं.
5) आपल्या गरजाच भागत नाहीत.
कधीही विचारा नवीन ड्रेस घेऊन द्या, फोन द्या, सिनेमाला जायचं, मित्रचा बर्थडे, पार्टी, पिकनिकला जायचं, आपण फिरायला जायचं, मॉलमधे जायचं घरचे नाहीच म्हणतात. पैसे नाही म्हणतात. पण बाकीचे मित्र मात्र कुठंकुठं देश-विदेशात जातात, त्याचे फोटो पाठवतात, नवे मोबाइल दाखवतात, मग आपल्यालाच का काही मिळत नाही.