- अपर्णा पाडगावकर
खूप मुलं येतात रोज ऑफिसमध्ये ऑडिशन्स द्यायला. डोळ्यात स्वप्नं असतात, मनगटात बळसुद्धा असतं. वेगवेगळ्या त:हेच्या कपडय़ांनी भरलेली बॅग खांद्यावर उचलून उत्साहाने एका प्रॉडक्शन हाउसमधून दुसरीकडे जात असतात..एकता कपूरच्या बालाजी टेलिफिल्मचं ऑफिस माङया शेजारच्याच बिल्डिंगमध्ये आहे. बारातेरा वर्षापूर्वी तोही असाच तिथे आला असणार. उत्साहाने ऑडिशन दिली असेल. तो हजारात उठून दिसणारा होता. त्याला काम मिळालं. तो तिथे यशस्वी झाला. हजारातून एकपासून लाखात एकर्पयतचा प्रवास हा ख:या अर्थाने फिल्म इंडस्ट्रीमधला प्रवास. ज्यांनी तो केला नाही, त्यांना त्यातले खाचखळगे कळत नाहीत. ‘ये दुनिया बडी कुत्ती चीज है’ असा एक फिल्मी डायलॉग आहे. फिल्मी दुनिया हे त्याचं सर्वात वाईट असं टोक आहे. सगळ्यांची धडपड ही शिखरावर जाण्यासाठी असते, तिथे नेहमीच खूप कमी जागा असते. पुढे असलेल्याला केवळ मागेच नाही, तर थेट खालीच ढकलून दिल्याशिवाय तुम्हाला तिथं उभंच राहता येणार नसतं. हे जग कायमच भयंकर थंड डोक्याने हार्टलेस म्हणावं अशा पद्धतीने काम करतं. भावनांचा बाजार मांडलेल्या या इंडस्ट्रीच्या स्वत:च्या भावना दगडी आहेत. करोडो रु पयांचं प्रचंड मोठं भांडवल जिथे लागतं, तिथे फायदा ही एकमेव गोष्ट सगळ्यात महत्त्वाची ठरते, यात नवल नाही. त्यामुळेच कट थ्रोट म्हणावं अशी स्पर्धा इथे प्रत्येक पावलावर करावी लागते. आणि स्पर्धा केल्याशिवाय इथे टिकताच येत नाही. मला माङयापुरतं जगू द्या, असं म्हणण्याची सोय इथे नाही. इथला सगळा कारभार हा पर्सेप्शनवर आधारित आहे. तुम्ही जगाला कसे वाटता, यावर तुमची प्रतिमा उभी राहत जाते. या इंडस्ट्रीमध्ये आल्यावर इथल्या म्हणून मानल्या गेलेल्या ख:याखोटय़ा सवयी, लकबी, करना पड़ता हैं. कॅटेगरीत मोडणा:या अनेक गोष्टी अंगी बाणवाव्या लागतात. गांजा ओढणं ही त्यातली पहिली आणि सगळ्यात सोप्पी गोष्ट. कूल वाटावं म्हणून सिगरेट ओढणं कधीच मागे पडलं. गांजा तरी किमान ओढावाच. त्याने दोन गोष्टी साध्य होतात, एकतर भूक मरते, त्यामुळे तुम्ही आपोआपच कमी जेवल्याने बारीक (याला तंदुरु स्त मानलं जातं) राहता आणि दुसरं म्हणजे गांजा तुम्हाला काही काळ स्वप्नांच्या दुनियेत थोडं निवांतपण देतो, रमवतो, थोडं शांत करतो. या जगात प्रत्येक पावलावर स्पर्धा तर आहेच; पण अनिश्चितताही आहे. तुम्हाला एखादं प्रोजेक्ट मिळणार आहे का? मिळालं तरी तुमचा त्यातला रोल महत्त्वाचा राहील ना शेवटर्पयत? कापला तर नाही जाणार? प्रोजेक्ट पूर्ण होईल ना? झालाच तर यशस्वी होईल ना? यशस्वी झाला तरी तुमच्या कामाचं कौतुक होईल का? त्याचं श्रेय तुम्हाला मिळेल का? मिळालंच तरी प्रश्न शिल्लक राहतोच की तुम्हाला दुसरं एखादं प्रोजेक्ट मिळेल का? प्रश्नांची मालिका पहिल्यापासून तशीच निरंतर सुरू राहते. ही मालिका केवळ स्टार होऊ पाहणा:या अभिनेत्यांसाठी नाही, ती प्रत्येकासाठीच आहे. लेखक, दिग्दर्शकपदाचं ग्लॅमर जितकं जास्त, तितकं जीवघेणोपण अधिक मोठं, इतकंच. पण स्पर्धा अटळ आहे.गांजा एकदा रक्तात मुरला की मग पुढचा प्रवास सुरू होतो. बाकीचे ड्रग्ज वगैरे गांजाची फक्त बदलती रूपं आहेत. ज्याच्या खिशात जितका दाम, तितकं वरचं, अधिक शुद्ध आणि अधिक नशीली पावडर जो तो वापरतो. इथे फिट होण्यासाठी, तसं दिसण्यासाठी, भासण्या-भासवण्यासाठी तसे कपडे, शूज, घडय़ाळं, गाडय़ा इत्यादींचे शौक पाळले जातात, हेही तसं सहजसाधारणच म्हटलं पाहिजे. यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे सतत आतल्या वर्तुळात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत राहणं. त्यासाठी (कु)प्रसिद्ध बॉलिवूड पाटर्य़ाची आमंत्रणं मिळवणं हा स्ट्रगल सगळ्यात कठीण. या पाटर्य़ा खाण्यापिण्यासाठी नसतातच, त्या असतात सोशलायङिांगसाठी. काम देऊ शकणा:या लोकांशी ओळखी करून घेणं, जुन्या ओळखी रिव्हाइव्ह करणं, कुठलं नवं प्रोजेक्ट सुरू करणा:याच्या समोर घोटाळणं, जेणोकरून त्याला आपला चेहरा लक्षात ठेवता येईल. खानापिना तो होता रहता है.इथली निम्मी अफेअर्स या एका कारणासाठी होतात, ओळखी करून घेणं. ज्याला आपण प्रेमप्रकरण म्हणून कौतुकाने आंबटपणाने चघळतो, ती अनेकदा केवळ लायझनिंगसाठी सुरू झालेली असतात. इथपर्यंत साधारणत: बहुतेक सगळेच पोहोचतात. एखाददुसरं यशस्वी प्रोजेक्ट नावावर लागतंच. हा स्ट्रगल अधिक धारदार बनतो, जेव्हा तुम्हाला पहिलं यश मिळतं. यशाच्या इतकं चविष्ट दुसरं कोणतंच विष नाही. आता पुढचा स्ट्रगल हा स्वत:शी सुरू होतो तुमच्या स्वत:कडून असलेल्या अपेक्षा प्रचंड वाढलेल्या असतात. तुमच्यात आणि नंबर वनमध्ये टॅलण्ट म्हणून काहीच फरक नाही, हे तुम्हाला पटलेलं असतं शंभर टक्के ते जगाला पटवून देण्याचा प्रयत्न सुरू होतो याच टप्प्यावर तुमच्या घरचे तुमच्यापासून दूर होऊ लागतात. त्यांच्यासाठी यश हाती आलेलं असतं. पण तुम्हालाच केवळ कळलेलं असतं की, ती फक्त सुरुवात आहे. खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. स्ट्रगल म्हणून केलेली आधीची जागरणं, पाटर्य़ा, दिवसारात्रीचं बंधन नसलेलं शूटिंग शेडय़ूल, रिहर्सल्स आणि रीडिंग सेशन्स, प्रीप्रॉडक्शन मीटिंग्ज, लूक टेस्ट, होणार होणार म्हणत निसटलेली प्रोजेक्ट्स, काम होतं या सबबीखाली घराबाहेर काढलेला वेळ, कॉस्च्युम्स म्हणून घातलेले कपडे हे सगळं पहिल्या यशानंतर घरच्या लोकांनी पटवून घेतलेलं असतं. ज्यांना पटत नाही, त्यांच्यापासून हा यशस्वी स्ट्रगलर स्वत:च दूर झालेला असतो. इथून पुढे महत्त्वाचं असतं ते सतत बातमीमध्ये राहणं. याच्यासाठी मग शक्य आहे ते सगळं करावं लागतं. वर म्हटल्यातली उरलेली बहुतेक अफेअर्स या दुस:या कारणाने होत राहतात. मग अशाशी अफेअर करणं गरजेचे बनतं की ज्याची बातमी होईल. अनेक जेन्युइन हात या टप्प्यावर सुटतात. वास्तवाचं भानसुद्धा थोडं थोडं धूसर होऊ लागतं. आपण यशस्वी स्टार आहोत, तेव्हा या अमुक गोष्टी किंवा तमुक इतकं अटेन्शन आपल्याला मिळालं पाहिजे, यावर आपलाच विश्वास बसू लागतो. यात कुठल्या टाइपचा जोडीदार हवा, त्याच्या अपेक्षाही बदलत जातात. वधू पाहिजे या कॅटेगरीतल्या अपेक्षा इथेही लागू पडतात, त्याही अधिक तीक्ष्णपणो. अधिक साजूक तुपातली, अप्सरा किंवा गंधर्व गटातली व्यक्तीच इथे हवी असते. जी आर्म-कॅण्डी म्हणून मिरवता येईल. जेणोकरून जिथे जाऊ, तिथे कॅमे:याचे फ्लॅश माङयाच भोवती लखलखत राहतील. इथे मग या अपेक्षांचा वास्तवाशी झगडा सुरू होतो. इथले आतले आणि बाहेरचे यांच्यातला फरक थोडाथोडा नजरेला येऊ लागतो. स्टार आईबापाच्या पोटी जन्मलेल्यांच्या अपेक्षा मुळातच स्टारी किंवा फिल्मी असतात. खानदानची प्रतिष्ठा त्यांच्या लेखी एखाद्या बिझनेस एम्पायरवाल्या खानदानाइतकीच महत्त्वाची असते. त्यातही हा बेभरवशाचा धंदा. मग इथला गोरागोमटा म्हणून हीरो सिद्ध झालेलाच आपल्या लेकीला (किंवा उलटपक्षी) लाभावा, याची हूरहूर आईबापालाच लागत राहते. बाहेरून आलेल्या मुलांना इथेच पहिल्यांदा ठेच लागते. मग अफेअरमागून अफेअर्स तुटत बनत राहतात. याचं तिच्याशी किंवा हिचं त्याच्याशी टाइपच्या खुसखुशीत बातम्या आपण वाचत राहतो, त्याच्या मागचं बरंचसं सत्य हे असं नागडं असतं. इथे प्रत्येकाला जोडीदार आपल्यापेक्षा वरचढच हवा असतो. ही अपेक्षा स्री आणि पुरुष दोघांमध्येही समानच असते. फक्त ते वरचढ आहे, हे कळत नाही, कारण स्वत:च्या डोक्यातली स्वत:ची इमेज. मग ङिाडकारलं जाण्याचं दु:ख. त्यातून वैफल्य, त्रगा. ते वेळच्या वेळी जर सावरलं नाही तर उतारावरचा अटळ प्रवास सुरू होतो.हे क्षेत्र प्रचंड सबजेक्टिव्ह आहे. इथे वस्तुनिष्ठतेला अजिबातच थारा नाही. कोणता स्टार किंवा कोणती गोष्ट प्रेक्षकांना का आवडेल, याचं कोणतंही लॉजिक शंभर टक्के छातीठोकपणो देता येत नाही. म्हणूनच ज्याचे ठोकताळे सर्वाधिक वेळेला बरोबर ठरले आहेत, त्याची मर्जी संपादन करणं अपरिहार्य ठरतं. ही मर्जी म्हणजे केवळ होयबागिरी नव्हे. ती एक जीवनदृष्टीच ठरते, एका अर्थी. तुमचं उठणं, बसणं, चालणं, बोलणं, विचार करणं हे एका विशिष्ट पद्धतीने होणं इथे अपेक्षित होऊ लागतं. स्ट्रगल कठीण होतो तो त्यामुळे. या टप्प्यावर येईपर्यंत आपण आपले म्हणून जे काही असतो, ते बाजूला पडलेलं असतं. ते आता आतून धडका देऊ लागतं. स्ट्रगल म्हणून केलेल्या तडजोडी टोचू लागतात. त्या जर तोवर अंगी मुरलेल्या नसतील तर पुढचा प्रवास कठीण..मग डिप्रेशन. थोडी जरी अधिक सेन्सिटिव्हीटी, थोडी अधिक क्रिएटिव्हिटी, थोडंसं बुद्धिचातुर्य मग प्रश्न विचारायला भाग पाडू लागतं. प्रश्न विचारणारा कोणत्याच सिस्टीमला नकोसा असतो. इथून मग सामान्य आयुष्याकडे परत जाण्याची वाट संपलेली असते. तरीही टेकडीच्या चढावर जाण्याच्या रस्त्यावर बरीच जागा असते. वर जाण्याची संधी कधीही मिळू शकतेच. आपण आहोत, तसे स्वत:ला स्वीकारलं, तर आयुष्यात थोडं निवांतपणही मिळू शकतं.
पण बेचैनी संपतेच असं नाही. इथेही तडजोड करत अनेकजण समाधान मानतात. फस्र्ट क्लासमधून प्रवेश करण्याची ऐपत आणि दानत असूनसुद्धा थर्ड एसीवर स्वत:ला अॅडजस्ट करतात. हीच वेळ असते स्वत:ला सावरायची. काहींना जमतं, काहींना नाही जमत. एक तर स्वत:च्या टॅलेण्टवर अतिविश्वास असतो. तो खोटा नसूही शकेल. पण केवळ टॅलेण्टवर यश मिळत नाही. त्यासाठी परिस्थिती फेव्हरेबल असावी लागते. तिच्याशी केवळ आपण जुळवून भागत नाही, तिनेही आपल्याला तिच्यात सामावून घ्यावं लागतं. हे कोणत्याही क्षेत्रसाठी तितकंच खरं आहे. फिल्मी क्षेत्रसाठी तर कैकपटीने अधिक खरं. स्वत:कडून असलेल्या अपेक्षा किती ताणायच्या, याचं उत्तर प्रत्येकानेच आपल्या आपल्याला द्यायचं आहे. आपल्या यशाचे मापदंड आपणच ठरवायचे असतात. ते हासील करण्यासाठी किती वेळ द्यायचा, तेही आपलं आपणच ठरवायचं असतं. पण कितीही उत्तम रनर असेल तरीही तो एका तासात मॅरेथॉन नाहीच पूर्ण करू शकणार, हेही आपल्याला माहीत हवंच. आणि समजा, तेही नाहीच मिळालं, तरीही जितकं मिळालं आहे, त्याचं मोल तर नाहीच ना कमी होत. पण पंचाण्णव टक्के मिळवणाराच अजून दोन मार्क मिळाले असते तर पहिला आलो असतो, म्हणत अधिक दु:खी होतो. त्याने पस्तीस टक्के वाल्यांकडे पाहावं, असं मुळीच म्हणणं नाही. पण तुला मिळालेलं यश किती लखलखीत आहे, हे त्याने एकदा तरी जगाच्या नजरेतून पाहायला हवं. इथे जगाच्या नजरेत भरण्यासाठीच सगळा संघर्ष सुरू असतो.भरलेल्या ट्रेनमध्ये आत शिरण्याची धडपड यशस्वी झाली की तोच माणूस पुढच्या स्टेशनवर आगे जाव, उधर डब्बा खाली है, म्हणत सगळ्यात आधी ओरडतो. तसंच आहे हे.
(अपर्णा दशमी स्टुडिओजमध्ये क्रिएटिव्ह प्रोडय़ुसर आहे.)
aparna.padgaonkar@gmail.com