मोठय़ाच नाही तर छोटय़ा पडद्यावर ‘स्टार’ व्हायचं म्हणून मुंबई गाठणा:या धडपडय़ा स्ट्रगलर तरुण-तरुणींच्या आयुष्यात डोकावून पाहिलं तर काय दिसतं या संघर्षाच्या चौकोनी खिडकीतून?
- तेच सांगणारा एक विशेष अंक :
स्ट्रगलर्स!
‘कास्टिंग काऊच इज अ रिअॅलिटी इन द इंडस्ट्री!
आणि तरुणीच कशाला, तरुणांनाही या कास्टिंग काऊचचा सामना करावा लागतो.
मलाही करावा लागला होता आणि एका दिग्दर्शकानं ‘तस्ली’ मागणी माङयाकडंही केली होती. एका कास्टिंग डिरेक्टरनं मला बजावलंही होतं की, ‘शोबीझ’मध्ये राहायचं तर ‘स्मार्ट अॅण्ड सेक्सी’ असावंच लागतं. तमाम स्ट्रगलर्ससाठी हे असे अनुभव ही एक अतिसामान्य नेहमीचीच बाब आहे, आणि कामाच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी करणं या इंडस्ट्रीत सर्रास चालतं!’
- असं स्पष्ट सांगत आणि कास्टिंग काऊचचा चेहरा टराटरा फाडत अभिनेता रणवीर सिंगनं तरुणांच्या (फक्त तरुणींच्याच नाही) वाटय़ाला येणारा कास्टिंग काऊच प्रकार स्वानुभवातून उघड केला. आजच्या आघाडीच्या नायकानंच हे खुलेआम सांगितल्यानं मोठी खळबळ उडाली हे खरं; पण त्यानिमित्तानं पुन्हा सिनेजगतातल्या स्ट्रगलर्सच्या वाटय़ाला येणा:या जगण्याची चर्चाही ऐरणीवर आली!
‘स्टार’ व्हायला खेडय़ापाडय़ातून, लहान शहरातून मुलंमुली मुंबई गाठतात आणि मग आपलं नशीब आजमावत बडय़ा स्क्रीनवर झळकण्याचं स्वप्न पाहतात. बडा पडदा मिळाला नाहीतर छोटय़ा पडद्यावर तरी स्टार बनता येईल आणि रोज प्राइम टाइमला लोकांच्या घरातल्या टीव्हीच्या पडद्यावर झळकता येईल याचं स्वप्न पाहतात.
पण सगळ्यांनाच कुठं चेह:याला रंग लावून अभिनय करायचा असतो?
काहींना कॅमेरा खुणावतो, काहींना दिग्दर्शन, काहींना लेखन!
मात्र स्ट्रगल आणि स्पर्धा तिथंही चुकत नाहीच.
ती सतत वाटय़ाला येते. त्यातून काही सेलिब्रिटी बनतात, तर काही कधीच झगमगत्या पडद्यावर न झळकता कायम अंधा:या गर्तेतच राहतात.
काय असतं ते नेमकं जगणं?
कशी असते स्ट्रगलर्सची दुनिया?
तिथं स्ट्रगल करू म्हणणारे जगतात कसे?
कशाच्या भरवशावर टिकतात?
नेमकं असतं कसं हे जग?
याच प्रश्नांची उत्तरं थेट मुंबईच्या स्ट्रगलर गल्लीत गेलं,
यशराज स्टुडिओ, बालाजी टेलिफिल्म्सचा परिसर,
फन रिपब्लिकची गल्ली, लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट,
वर्सोवा, ओशिवरा या भागात फिरलं तर भेटतं ते स्ट्रगलर्सचं एक वेगळंच जग.
त्या जगातली ही एक खास भ्रमंती या अंकात आहेच;
पण बॉलिवूडसह टीव्हीच्या जगात ‘स्ट्रगल’ करणं
म्हणजे नक्की काय असतं, या प्रश्नाचं उत्तर म्हणून
उलगडत जाणारी एक भन्नाट गोष्टही आहे.
ज्या गोष्टीतले हे ‘हिरो-हिरॉईन्स’ खुलेआम सांगतात,
‘स्ट्रगल चल रहा है, और क्या?’
पान उलटा.
आणि भेटाच या स्ट्रगलर्सना!
- ऑक्सिजन टीम