शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
2
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंची जाहीरच करून टाकलं
3
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
4
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
5
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
6
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
7
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
8
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
9
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
10
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
11
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
12
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
13
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
14
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
15
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
16
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
17
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
18
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
19
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
20
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही

स्ट्रगलची नशा

By admin | Published: January 21, 2016 8:32 PM

‘मी स्ट्रगल करतोय’ असं अनेकजण वर्षानुवर्षे सांगतात, आणि ‘सामान्य’ आणि ‘जेमतेम’ असा शिक्का अनेक कामांवर मारून आपण वेगळे आहोत

‘मी स्ट्रगल करतोय’
असं अनेकजण वर्षानुवर्षे सांगतात,
आणि  ‘सामान्य’ आणि ‘जेमतेम’ असा शिक्का
अनेक कामांवर मारून आपण वेगळे आहोत 
हे स्वत:लाच सांगत स्ट्रगल करतच राहतात,
तर काही जणांना खरंच संधी सतत हुलकावणी देते
आणि त्यातून अपेक्षाभंगाचं दु:ख छळतच राहतं.
मग आपला स्ट्रगल नेमका योग्य रस्त्यावर चाललाय की नाही,
आपण खरंच स्ट्रगल करायला थेट मुंबई गाठावी की नाही,
गाठलीच आणि स्ट्रगल थांबवायची 
वेळ आलीच तर नेमकं कसं, कधी, कुठे थांबावं?
या प्रश्नांची स्पष्ट, प्रॅक्टिकल, खरीखुरी
उत्तरं देताहेत.
मुक्ता चैतन्य
त्यांनी शेकडो स्ट्रगलर्सना भेटून,
त्यांच्या मुलाखती करून 
‘स्ट्रगलर’ नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे.
पत्रकारिता, संहिता आणि संवाद लेखन
या क्षेत्रत त्या कार्यरत आहेत.
 
‘मुङो मुंबई जाना है, स्ट्रगल करने. किसके यहां जाऊ? आप कुछ कॉन्टॅक्ट्स दिजीये ना?’
- झारखंडमध्ये रांचीला काही कामानिमित्तानं गेले असता तिथल्या मास कॉमचे काही विद्यार्थी भेटले होते. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर त्यांनी मला विचारलेला हा प्रश्न आणि पुढे अनेक दिवस त्याचा केलेला फॉलोअप!
‘आधी शिक्षण संपवा, इथेच रांचीत थोडा अनुभव घ्या आणि मग मुंबईचा रस्ता धरा’ असं सुरुवातीला मी त्यांना अनेकदा सांगून बघितलं; पण ‘मुङो अमिताभ बच्चन बनना है’ नाही तर ‘इम्तियाज अली बनना है’ची भुतं मानगुटीवर बसली की तार्किक बुद्धी चालत नाही, याचा अनुभव मी अनेकदा घेतला होता. त्यामुळे दोन चार वेळा सांगून बघितल्यानंतर ऐकत नाहीत म्हटल्यावर मुंबईतल्या काही परिचित प्रॉडक्शन हाउसेसचे पत्ते आणि नंबर्स देऊन टाकले.
आठदहा वर्षापूर्वी ‘स्ट्रगलर्स’ नावाचं पुस्तक लिहिलं तेव्हाच्या परिस्थितीत आणि आताच्या परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. रोज हजारो तरुण-तरुणी डोळ्यात सुपरस्टार होण्याची स्वप्नं घेऊन मुंबईत येतात. पण त्यातल्या प्रत्येकाचं स्वप्न साकार होतं का? 
निदान त्या स्वप्नार्पयत पोचण्याचा प्रवास चालू होतो का?
या प्रश्नाचं उत्तर ‘हो’ आणि ‘नाही’ असं दोन्हीही आहे.
बॉलिवूडमध्ये काम करण्याचं स्वप्न साकार होतं, त्यामागे काय कारण असतात आणि होत नाही ते कशामुळे असं कुणी विचारलं तर उत्तर देणं अवघड आहे. कारण याचा कोणताही सक्सेस फॉम्यरुला नाही. प्रेक्षकांना काय क्लिक होईल आणि काय नाही हे कधीच कुणी सांगू शकत नाही. अर्थात आता चित्नपट हा एकमेव पर्याय नसल्यानं आणि टीव्हीची मोठी इंडस्ट्री उपलब्ध झाल्यानं काहीतरी करून हातपाय पसरत या क्षेत्नात विसावणं हल्ली अनेकांना शक्य झालं आहे. अभिनय करायला आलेले किती तरी स्ट्रगलर मग लेखक बनतात. अनेक जण एडिटिंगची मशीन्स टाकून व्यवसाय करतात. व्हाइस ओव्हर आर्टिस्ट बनतात. प्रॉडक्शनकडे वळतात. प्रॉडक्शन हाउसेसमधून नोक:या धरतात. टीव्हीमुळे या क्षेत्नाचा आवाका प्रचंड वाढला आहे. येणारे लोंढे जसे वाढता आहेत तशाच कामाच्या संधीही. 
पण तरीही स्ट्रगल उरतोच.
प्रसिद्धी, पैसे, यश याची धडपड अविरत चालू असते. स्वप्नाच्या मागे धावणं चालूच असतं. बहुतेकांनी स्वत:चे मागचे दोर तोडलेले असतात. त्यामुळे पुढे पुढे जात पर्याय शोधत राहणं इतकंच काय ते हातात उरतं. काही वेळा यश मिळतं, काही वेळा अपेक्षित नाही पण आयुष्य स्थिरावतं, तर काहीवेळा डोळ्यापुढे कायमचा अंधार दाटून राहतो.
कुणाचं काय होईल कधीच सांगता येत नाही..
पण म्हणून या क्षेत्नाकडे येऊच नाही असं नाहीये. पण या मार्गावर चालताना मनात जे प्रश्न समोर येतात त्यांची खरी आणि वास्तववादी उत्तरं मात्र आपल्याकडे असायला हवीत!
या चंदेरी दुनियेत येताना तुम्ही जितके वास्तववादी असाल तितकं इथं पाय रोवून उभं राहणं सोपं जाऊ शकतं. म्हणूनच ही काही तमाम स्ट्रगलर्सच्या आणि स्ट्रगल करू म्हणणा:यांच्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरं. थेट स्पष्ट, जरा कडवट वाटतीलही; पण खरीखरी आणि प्रॅक्टिकलही!
 
स्ट्रगल करायला जायचं असं ठरवलं, तर नेमकं काय हवं आपल्या व्यक्तिमत्त्वात? ते कसं ओळखायचं? कला क्षेत्रची काही पाश्र्वभूमी असावी का?
 
कुठल्याही करिअर निवडीचा पाया हा स्वओळख असतो. आपल्याला नेमकं काय करायचं आहे याबाबत मनात स्पष्टता हवी. कारण हे क्षेत्न बाहेरून दिसतं तितकं सोपं नाही. राग, लोभ, मत्सर, असूया या मानवी भावनांनी गच्च आहे. त्यामुळे आपल्याला नक्की काय करण्याची इच्छा आहे याबाबत मनात स्पष्टता असायलाच हवी. अभिनय करायचा असेल तर आपला चेहरा कसा आहे यापेक्षा आपल्यात अभिनय क्षमता आहे किंवा नाही याचा अंदाज असायला हवा. आपली ङोप काय असू शकते, याचा अंदाज बांधणं आवश्यक आहे. हा अंदाज चार वेळा काम करून बघितल्याशिवाय येऊ शकत नाही. आपल्याला स्वत:विषयी जे काही वाटतं तो एक भ्रम असू शकतो ही शक्यता गृहीत धरण्याची तयारी हवी. 
हे प्रचंड कष्टाचं क्षेत्न आहे. जितकं ग्लॅमर दिसतं त्याच्या चौपट कष्ट इथे करावे लागतात. प्रामाणिक  कष्टांची तयारी असेल तर मार्ग सोपा होतो. शॉर्टकटमधून दीर्घकाळ कुठल्याही क्षेत्रत टिकण्याच्या शक्यता कमी होत जातात हे लक्षात घेतलं पाहिजे.
अनेकांचा असा समज असतो की इथे गॉड फादर लागतो. तो काळ आता राहिला नाही. संपर्क लागतो, पण संपर्क असेल तरी काम होतंच आणि योग्य संधी मिळतेच असं नाही. त्यामुळे संपर्क आणि गुणवत्ताही हवी. त्यात कला पाश्र्वभूमी असेल तर त्याचा नक्कीच उपयोग होतो. त्यातून निदान काही संकल्पना तरी आपल्या आपल्याला नीट कळलेल्या असतात. या क्षेत्नात विविध कंपू आहेत. संपर्क आणि पाश्र्वभूमी असेल तर या कंपूत तुम्ही सहज बोलावले जाता किंवा प्रवेश मिळतो. पण संपर्क नसणा:यांचं काहीच होत नाही असं मुळीच नाही. टॅलण्टला कोणीही कधीही रोखू शकत नाही, हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. मात्र संपर्क नसल्यानं वेळ लागू शकतो, योग्य संधी चटकन मिळत नाही, नकार पचवावे लागतात; पण जर तुमच्याकडे टॅलण्ट असेल तर तुमची नोंद घेतली जातेच. 
नक्कीच घेतली जाते.
मात्र वाट पाहण्याची, कष्ट करण्याची तयारी हवी, तीही वर्षानुवर्षे!
 
 स्ट्रगल करायला येणा:या शहरी मुलामुलींना काय प्रॉब्लेम येतात? आणि खेडय़ापाडय़ातून आलेल्या मुलामुलींचं काय? त्यांना जमतं इथं स्ट्रगलरच्या दुनियेत तरी टिकणं?
 
अनेकदा ग्रामीण भागातून येणा:या मुलांना आपली भाषा ही सगळ्यात मोठी अडचण वाटते. पण खरंतर असा विचार करण्याची आवश्यकता नसते. अडचणींचा पाढा इथं सगळ्यांसाठी सारखाच असतो. संधी न मिळणं ही सगळ्यात मोठी अडचण असते. आत्मविश्वासाचं म्हणाल तर  तो ही दोन्हीकडे कमी अधिक असतो. लहान गावातून येणा:या तरु ण तरुणींना काहीवेळा शहराची भीती असते. मोठय़ा  शहरात वावरण्याबद्दल मनात नाही नाही त्या कल्पना असतात. भ्रम असतात. आणि संकोच असतात. पण प्रत्यक्षात तशी काहीच आवश्यकता नसते. आपला हेतू, आपली नजर स्वच्छ असायला हवी. तेवढं जरी असेल तरी बाकी गोष्टी सहज होत जातात.
दुसर सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रश्न असतील तर ते आहेत हे मान्य करणं आणि उत्तरांचा शोध घेणं. अनेकदा आपल्या महत्वाकांक्षांना अधोरेखित करणारे प्रश्न उपस्थित होतात आणि मग त्यांची उत्तर शोधण्यापेक्षा पळवाटा शोधल्या जातात. जे करण्याची गरज असते तेच टाळलं जातं. कुणी आपल्यावर टीका केली तर ती का केली याचा विचार करण्याचं सोडून अनेकदा टीका करणा:याला कसे काही कळत नाही किंवा तो आपल्याला कसा पाण्यात पाहतो असा विचार करून आपण स्वत:चं नुकसान करून घेत असतो हे लक्षात ठेवलं पाहिजे. घडणा:या प्रत्येक गोष्टीकडे तटस्थपणो बघता आलं तर त्यातून संधी शोधता येते. तुम्ही छान, आम्ही छान आपण सगळे किती छान अशा एकमेकांचे निव्वळ कौतुक करणा:या कंपूतून प्रगती होऊ शकत नाही आणि संधीही मिळत नाही. त्यामुळे पॅ्रक्टिकल व्हा. टीका झाली तर ती का झाली, कुणी भाषेवरून बोललं तर त्याला काय उत्तर द्यायचं याचा विचार केला पाहिजे. आणि आत्मविश्वास हवा पण अति आत्मविश्वास नको. तो  घातक ठरू शकतो. अनेकदा ठरतो.
 
स्ट्रगलर म्हणून स्ट्रगल करत कुठवर ट्राय देत रहायचा, हे कसं ठरवायचं, मुळात असं ठरवता येतं का?
इथे येणारे बहुतेक परत जायचंच नाही असा निश्चय करून येतात. सर्वसाधारणपणो आपण नोक:याही बदलतो पण इथे मात्न तसं होत नाही. एक गोष्ट ठरवली की त्याच्या मागे लागणं ही चांगली गोष्ट आहे पण बरीच वर्ष प्रयत्न करूनही काही जमले नाही तर दुसरं काहीतरी करून बघण्याची तयारी असायला हवी. पण तसं होत नाही. हार मान्य करणं खूप अवघड असतं आणि ते कुणालाही आवडत नाही. त्यामुळे अपयश मान्य होत नाही. आणि धडपडाट चालू राहतो. पण हे आपलं आपल्याला कळायला आणि पटायला हवं की, आता पुरे ट्राय करणं किंवा अजून थोडा ट्राय, जमेल आपल्याला! त्यासाठी आपल्या मनाचा प्रॅक्टिकल कौल घेणं महत्वाचं!
 
आता स्ट्रगल करण्याऐवजी थांबावं आणि जे त्यातल्या त्यात आवडतंय ते काम करावं असं वाटलं तरी  कुठं आणि का थांबायचं, हे लक्षात येतं का? ते मान्य करता येतं का?
 
बहुतेकदा बहुतेक जणांना कुठं थांबायचे ते समजत नाही. किंवा असं म्हणू की  स्ट्रगल ची नशा त्यांना तो विचारच करू देत नाही. मुळात कुठल्याही करीअरची सुरु वात करताना त्या करिअरला काही वर्ष देणं आवश्यक असतं. सर्वसाधारणपणो अस मानलं जातं, की कुठल्याही नव्या कामाला  तुम्ही सातत्यानं आणि पूर्ण प्रयत्नानं 1क्क्क् दिवस जर दिलेत तर ती गोष्ट तुम्हाला जमतेय कि नाही याचा नक्की अंदाज येतो. जर जमत नसेल तर का जमत नाहीये हे पण लक्षात येऊ शकतं. या क्षेत्नात येणारे बहुतेक जण मी दुसरं काही करणार नाही हेच ठरवून येतात, म्हणजे बहुतेकदा आपण अभिनयाहून वेगळं काही करायला जन्माला आलेलो नाही अशा पवित्र्यात ते असतात. त्यामुळे होतं काय की मागचे सगळे दरवाजे खटाखट बंद होतात आणि डोळ्यांवर झापडं बसतात. आपल्याला जमत नाहीये ही गोष्ट मान्य होत नाही. वेळीच थांबता येत नाही. दुसरं काही करण्याच्या शक्यता असल्या तरी तो कमीपणा वाटायला लागतो. त्यापेक्षा एखादी गोष्ट जमली नाही हे मान्य करून पुढे गेलं तर निराळे पर्याय मिळू शकतात. त्यातही, हल्ली टीव्हीमुळे  आणि सोशल  नेटवर्किग साईट्समुळे आपण ठरवलेल्या क्षेत्नापेक्षा वेगळे असे कितीतरी पर्याय उपलब्ध आहेत. कुठे ना कुठे तरी पाय रोवून उभं राहता येऊ शकतं. अनेक जण तसं करतात ही पण ब:याच जणांना आपल्याला जमलं नाही, ही गोष्ट मान्य होत नाही आणि गुंता वाढत जातो. आणि त्यांचा स्ट्रगल सुरुच राहतो.
 
स्ट्रगल करताना आपला एक प्लॅन ए असेल तर  प्लॅन बी असावा का? असावा तर काय, आणि तो मनात असला तर प्लॅन ए जमत नाही,असं म्हणतात, ते खरं का?
 
प्लॅन बी असलाच पाहिजे. फक्त याच क्षेत्नात असं  नाही, कुठेही गेलात तरी पर्यायी विचार करून ठेवलेला हवाच. अशावेळी तुमचं शिक्षण तुमच्या उपयोगाला येतं. शिक्षण कधीही वाया जात नाही हे खरंच. आणि प्लॅन बी असला तर ए जमत नाही असं अजिबात नाही. प्लॅन बी हा विचारात असतो, प्रत्यक्षात नाही. त्यामुळे ए वर संपूर्ण लक्ष केंद्रित करून बी चा विचार करून ठेवलेला असणं कधीही शहाणपणाचं असतं. अर्थात याबाबतीत मतमतांतरे असू शकतात. पण हा कौलही ज्यानं त्यानं आपली परिस्थिती, मर्यादा, शक्यता, संधी यांना साक्षी ठेवूनच घ्यायचा असतो.
 
 सक्सेस स्टोरीजचं एक प्रेरणादायी भूत असतं, अमक्या तमक्याला जमलं आपल्याला का नाही असं वाटतं, पण या कहाण्या प्रॅक्टिकली कशा स्वीकाराव्यात?
 
जगात अशक्य काहीच नाही. हे अगदी खरं आहे, पण प्रत्येक व्यक्तीच्या स्वभाव-अनुभव-विचारांच्या कक्षा-बौद्धिक समज-संधी शोधण्याची तयारी आणि क्षमता या गोष्टी निरिनराळ्या असतात. शिवाय ग्लॅमर  जगतातले ट्रेंड्स झपाट्यानं बदलत असतात आणि ते ज्या पद्धतीने बदलतात त्यानुसार माणसांची गरज बदलते. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे नवाजुद्दिन सिद्दिकी. तो इंडस्ट्रीत अनेक वर्ष स्ट्रगल करत होता. पण ज्या क्षणी चित्नपट सृष्टीचा ट्रेंड बदलला, नवाजुद्दिन सिद्दिकिसारख्या अभिनेत्याचं महत्व या जगताला समजलं. या जगाचे कुठलेही ठोस नियम नाहीत. त्यामुळे यशस्वी लोकांचे आदर्श डोळ्यासमोर जरूर असावेत पण त्यांना जमलं तर मलाही जमेल या तर्काला काहीही अर्थ नाहीये. यशस्वी झालेली व्यक्ती ज्या काळात होती तो काळ, मिळालेल्या संधी,तशाच प्रकारच्या कामाची असलेली गरज आणि प्रेक्षकांनी केलेला स्वीकार अशा अनेक गोष्टी एकाच वेळी कार्यरत असतात. त्यातशा आपल्या बाबतीतही नक्कीच होतील ही आशा असावी पण त्यात भाबडेपणा नसावा.
त्यापेक्षा, यशस्वी व्यक्तीने घेतलेली मेहनत, काम मिळवण्यासाठी स्वत:वर घेतलेले परिश्रम याचा अभ्यास जास्त उपयोगी पडू शकतो. कोणी काय केलं, यापेक्षा स्वत:ला सज्ज करण्यासाठी स्वत:वर भरपूर मेहनत घेणं हे अधिक महत्वाचं आहे. एकदा ही गोष्ट मनाशी पक्की झाली की वत:ची तुलना इतर कुणाशीही करावीशी वाटत नाही आणि यशस्वी व्यक्तींकडे तटस्थपणो बघता येऊ शकतं. अमतिाभ बच्चन यांची कहाणी प्रेरणादायी नक्कीच आहे, पण त्याच बरोबर अमिताभ बच्चन एकच होत असतो हेही लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे मै भी अमिताभ बच्चन बनना चाहता हुं किंवा मै माधुरी दीक्षित बनना चाहती हुं, या विचारला काहीच अर्थ नाही. असा विचार करून यशस्वी होता येत नाही. मुळात कुणासारखं तरी आपण का बनायचं?
आपण प्रत्येकानं  स्वत:सारखं बनण्यात मजा आहे !