बायकांची असते ती फॅशन आणि पुरूष करतात त्याला म्हणतात स्टाइल. स्टाईल आणि पुरूष असं समीकरण नेहमीच इन असतं. त्यातही अलिकडच्या काळात पुरूषांमध्ये स्टायलिश रहाण्याबाबत फारच अवेअरनेस आला आहे .
रांगडा पुरूष ही कॉन्सेप्ट कधीचीच मागे पडली. त्यानंतरच्या काळात सभ्य,रूबाबदार दिसण्यास पुरूषांनी अधिक प्राधान्य दिलं. मात्न नव्या पिढीतील अनेक पुरूष रूबाबदार, घरंदाज, सभ्य दिसण्याबरोबरच स्टायलिश दिसण्यावरही अधिकाधिक भर देत आहेत. त्यासाठी कपड्यांपासून ते हेअर स्टाइल, दाढी मिशी स्टाइलर्पयत ते काम करता आहेत, त्यावर पैसे खर्च करता आहेत.
पूर्वी दाढी करून चिकनं चोपडं दिसण्यासाठी झटणारी मंडळी आता आपल्याला दाढी किंवा मिशी ‘कशी शोभून दिसेल याचा विचार करता आहेत.
अलिकडेच पुरूषांमध्ये स्टायलिश दाढी ठेवण्याचीही फॅशन आली आहे. बॉलीवूड सुपरस्टार्स, क्रि केट स्टार्समध्ये तर स्टायलिश दाढी ठेवणारे कित्येकजण सर्रास दिसू लागले आहेत. अगदी आमीर खान, रणवीर सिंह, विराट कोहली यांचच बघा ना.. स्टायलिश दाढी आणि पिळदार मिशा यांनी या स्टारमंडळीचा रूबाब अधिकच वाढला आहे. त्यामुळे त्यांना फॉलो करण:या त्यांच्या फॅन्सनीही त्यांचीच नक्कल करत स्टायलिश दाढी ठेवण्यास सुरूवात केली आहे.
दाढी मिशीच्या स्टाइलचे अनेक प्रकार आहेत. पण काही विशिष्ट प्रकार भारतीय पुरूषांमध्ये हिट असलेले दिसतात.
1) स्टबल ( गालांवर किंचित वाढलेली दाढी):- हा दाढी प्रकार अगदी प्रत्येक पुरूषालाच शोभून दिसतो. बारीक केस असलेली दाढी एकाचवेळेस एकदम पुरूषी आणि नीटनेटका असे दोन्हीही फील देते.
2) गोटी ( हुनवटीवरील छोटी टोकदार दाढी):- वर मिशी नासलेली आणि फक्त हुनवटीवर असलेली प्रमाणबध्द ‘गोटी दाढी’ अनेक पुरूषांना ठेवावीशी वाटते आणि ते ठेवतातही. पण ती प्रत्येकालाच शोभून दिसते असं नाही. उभ्या चेहेर्याच्या पुरूषांना ही दाढी शोभून दिसते.
3) गोटी आणि फेंच मुशस्टाच:- अनेकांना गोटी दाढी आवडते म्हणून ते ठेवतातही. पण शोभून दिसत नाही; अशा वेळेस वर फ्रेंच पध्दतीची मिशी ठेवून गोटी स्टाइलची दाढी कॅरी केली जाते.
4) बाल्बो:- कोरीव वाटावी अशा पध्दतीची ही दाढी. दिसते छान पण मेण्टेन करण्याचा पेशन्स असणारे पुरूषच अशा दाढीच्या वाट्याला जातात.
5) चीन स्ट्रिप:- वर बारीक मिशी असलेली किंवा नसलेली, खालच्या ओठाखाली केस ठेवून ते हुनवटीर्पयत नीटनेटके वाढवून ही चीन स्ट्रिप स्टाइल केली जाते. ज्या पुरूषांना आपला नीटनेटका लूक आवडतो तेच पुरूष अशी दाढी ठेवण्याचं धाडस करतात. ही दाढी बारीक आणि रेखीव असली तरच छान दिसते.
मोहिनी घारपूरे-देशमुख