शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
2
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
3
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
4
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
5
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
6
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
7
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
8
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
9
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
10
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
11
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
12
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
13
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
14
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
15
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
16
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
17
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
18
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
19
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
20
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?

ट्रॅडिशनलला स्टायलिश तडका

By admin | Published: October 16, 2014 6:38 PM

दिवाळी आली आणि कपडे घेतले असं कधी होतं का? कपड्यांनी कपाटं भरून वाहिली तरी दिवाळीत आपण नवे कपडे घेतोच.... पण नेहमीचा अवघड प्रश्न घ्यायचं काय? जे ट्रेण्डी असेल, ट्रॅडिशनलही, फंक्शनलही आणि फॅशनेबलही! त्यासाठीच तर हा एक फॉर्म्युला... मुली आणि मुलांसाठीही.

- प्राची खाडे (स्टायलिस्ट आणि पर्सनल शॉपर)

‘तिनं’ काय घ्यावं? फुललेन्थ अनारकली मस्टच !तुम्ही नेहमीप्रमाणं पंजाबी ड्रेसच घेणार असाल तर फार विचारबिचार न करता फुललेन्थ अनारकली घेऊनच टाका.उत्तम फिटिंग असेल तर काहीशा ठेंगण्या मुलींनाही हा ड्रेस मस्त  खुलून दिसतो. अनारकली पॅटर्नमुळे मुली आहे त्यापेक्षा अधिक उंच वाटतात. पोट थोडं सुटलं जरी असेल तरी त्यात ते  आपोआपच लपून जातं. लांब केसांची उंच पोनी, कानात झुमके आणि अनारकली पॅटर्नचा ड्रेस हा लुक अत्यंत क्लासी दिसतो. लांब बाह्यांचा अनारकली असेल तर हातात बांगड्या घालायचीसुद्धा काही गरज नाही. प्रिंटेड सिल्क साडीक्रे झी डिझाईन्स असलेल्या डिजिटल प्रिंटेड क्रे प साड्यांची सध्या फॅशन जगतात चलती आहे. काहीशा चित्नविचित्न असलेल्या या साड्या मुलींना खूप शोभून दिसतात. अशी एखादी प्रिंटेड सिल्क साडी, त्यावर हॉल्टरनेक ब्लाऊज किंवा बॅकलेस फुलस्लीव्हज ब्लाऊज असं कॉम्बिनेशन एकदम हॉट. एकदम ट्रेण्डी.मस्त ब्राईट चुडीदार-कुर्तागडद रंगांचे कुर्ता आणि त्यावर कॉन्ट्रास्ट कलरचा चुडीदार हे कॉम्बिनेशनही दिवाळीसाठी मस्त लुक देऊ शकतं. अशा कुर्त्यावर दुपट्टा घेण्याऐवजी जर मोठा नेकपिस घातला आणि त्याबरोबर एखादी सिल्कची क्लचबॅग हातात घेतलीत तर एकदम स्मार्ट लुक कॅरी करता येईल. किंवा कॉन्ट्रास्ट कलर किंवा प्रिंटचे शॉर्ट, क्र ॉप्ड जॅकेटदेखील शोभून दिसेल.लॉँग स्कर्टसघेरदार घागरा किंवा घेर असलेला लॉँग स्कर्ट आणि टॉप किंवा टी-शर्ट असं कॉम्बिनेशनही एकदम हटके दिसू शकतं. त्यावर स्लीव्हलेस जॅकेट किंवा दुपट्टा आणि एथनिक ज्वेलरी घाला, सगळ्या गर्दीत तुम्ही वेगळ्या दिसाल.‘त्यानं’ काय घ्यावं?बंडीबंदगळ्याचे स्लीव्हलेस जॅकेट वा नेहरू जॅकेट सध्या इन आहे. कुर्ता किंवा जिन्सवरदेखील हे तुम्ही घालू शकता. जिन्सवर फॉर्मल शूज , ज्यूट किंवा लेदरच्या स्टायलिश मोजड्या, सँडल्सदेखील घालू शकता.पठाणी गडद रंगाचा पठाणी ड्रेस, रोलअप केलेल्या स्लीव्हज या कपड्यात तरुण काहीसे उंच वाटतात. सुटलेलं पोटही त्यात दिसत नाही.लीनन जॅकेटएखादा कुर्ता, जिन्स किंवा धोती  आणि त्यावर लिननचे जॅकेट, और क्या चाहिए? गो ट्रॅडिशनलसर्वात बेसिक स्टाईल म्हणजे प्लेन सिल्क वा कॉटनसिल्कचा कुर्ता आणि त्यासोबत घातलेली चुडिदार किंवा जिन्स हा लुक कायमच ईन. पण एक लक्षात ठेवा जिन्सवर एम्ब्रॉयडरी केलेला कुर्ता घालू नये, ते वाईट दिसतं.