- प्रसाद सांडभोर‘‘लोअर परेल चलोगे?’’‘‘हाँजी! आईये!’’परफेक्ट टायमिंग. कसली जोराची सर आली एकदम! छत्री असूनसुद्धा चिप्प भिजवेल असला पाऊस. बरं झालं ही टॅक्सी मिळाली...‘‘स्टुडैण्ट हो?’’ड्रायव्हरकाका गप्पीष्ट दिसताहेत.‘‘अं... नहीं. इंटर्न हूँ. इधर एक कंपनी में.’’‘‘अच्छा अच्छा. सॅलरी अच्छी मिलती है?’’‘‘अं... इंटर्नशिप में सॅलरी नहीं स्टायपेंड मिलता है. यहाँ - मुंबई में रहने-खाने के लिये काफी हो इतना तो है.’’‘‘मेरी भी वैसे कॉमर्स में तालीम है. पर डायरेक्ट बिझनेस चालू करा. एक गाडीसे इस्टार्ट किया. आज सांत गाडियॉँ है अपनी! ड्राइव्हर रख्खे है सब पे. घरपे खाली बैठने में कुछ मजा नहीं. तो दिन में एकाध सवारी खुद घुमा लेता हूँ.मग तो गप्पा मारत राहिला. सांगत राहिला स्वत:विषयी. मी ऐकत होतो.बोलता बोलता म्हणाला, ‘‘चायमें जितनी शक्कर मिलाओगे, उतनी चाय मिठी बनेगी. वैसे जितना पैसा डालोगे, कम्फर्ट उतना बढता जाएगा. आदत होगी, फीर बाहर निकलना मुश्किल होगा. जवान हो, नये दिखते हो, इसलिये बताया..तेवढ्यात उतरायचं ठिकाण आलंच..मी उतरलो..डोक्यात नवीन फिलॉसॉफी घेऊन...( xprsway@gmail.com )
अनाउन्समेण्टछोटीशी गावं. त्यापेक्षा मोठी; पण छोटीच शहरं. या शहरात राहणारी जिद्दी मुलं.आपल्या स्वप्नांचा हात धरून, संधीच्या शोधात मोठ्या शहरांकडे धावतात. काय देतात ही मोठी शहरं त्यांना? कसं घडवतात-बिघडवतात? आणि जगवतातही..?- ते अनुभव शेअर करण्याचाहा नवा कट्टा. तुम्ही केलाय असा प्रवास?आपलं छोटंसं गाव, घर सोडून मोठ्या शहरात गेला आहात शिकायला? मोठ्या शहरात? दुसºया राज्यात? परदेशातही?काय शिकवलं या स्थित्यंतरानं तुम्हाला? काय अनुभव आले? कडू-वाईट? हरवणारे-जिंकवणारे? त्या अनुभवांनी तुमची जगण्याची रीतबदलली का? दृष्टिकोन बदलला का? त्या शहरानं आपलं मानलं का तुम्हाला? तुम्ही त्या शहराला? की संपलंच नाही उपरेपण?या साºया अनुभवाविषयी लिहायचंय?
तर मग ही एक संधी !लिहा तुमच्या स्थलांतराची गोष्ट.१. लिहून पाठवणार असाल, तरपाकिटावर ‘वन वे तिकीट’ असा उल्लेख करा.सोबत तुमचा फोटो आणि पत्ता-फोन नंबरहीजरूर लिहा..२. ई-मेल- oxygen@lokmat.com