सेलिब्रेशन म्हणजे असतं तरी काय? आनंदाची एक लाट.. जगण्याचे नवे थाटमाट..नुस्तं नाचणं, धिंगाणा, चांगले कपडे आणि खाण्यापिण्याची चंगळ.. असतंही हे सारं सेलिब्रेशनचा भाग.. पण सेलिब्रेशन इथं थांबत नाही आणि इथंच येऊन संपतही नाही.. तसं कुणी करत असेलतर त्याला सेलिब्रेशन कळलंच नाही.. काय असतं सेलिब्रेशन? पहाटे लवकर उठून डोंगरावर जाऊन बसा..डोंगरावर ना सही, घराच्या गच्चीत जाऊन उभं तर रहा..पूर्वेकडून एक लालसर गोळा..आकाशात डोकावतोत्या आधी पाखरं रोज करतात ना,ते असतं सेलिब्रेशन..गुलाबीलाल तो चेंडू आकाशाच्या कुशीतूनबाहेर पडतो तसा सारं निळं आकाशचआपला रंग बदलून टाकतं..त्याच्यासारखं गुलाबी होतं..ते असतं सेलिब्रेशन..आपण काहीक्षण का होईना ‘दुसऱ्यासारखं’ होणं,त्याच्या रंगात रंगणं,यात जी असते ना गंमत,ते खरं सेलिब्रेशन..उगवतीच्या रंगात रंगलेला त्यानंतरचा गरमागरम चहाआणि सोबत मस्त नाश्ता हे असतंदिवस सुुरू करण्याचं सेलिब्रेशन..वेळ काढून घरच्यांशी भरपूर गप्पाआणि डोळ्यात पाणी येवोस्तोर खळखळून हसणंेहेही असतं सेलिब्रेशनच..जिवाभावाच्या दोस्तांसोबत बाईक दामटत फिरत राहणं,भुकेनं खड्डा पडला पोटात तरी गप्पा मारत राहणं..उगीचंच हसणं, उगीच चिडणं, रुसणं, भांडणंआणि पुन्हा हसणं हे असतं सेलिब्रेशन..अशा किती तऱ्हा या सेलिब्रेशनच्या..रोज रोज करता येणाऱ्याप्रत्येक क्षणात आनंदाचे रंग भरणाऱ्याकितीतरी गोष्टींच्या..हे सारं आपण सांगा कधी सेलिब्रेट करतोआणि केव्हा केव्हा छोट्या गोष्टींसाठीैआनंदाची जंगी पार्टी करतो?सणवार आलेत आता,ही पार्टीही करायला हवी..आणि रोजच्या जगण्यात सेलिब्रेशन शोधण्याचीनिसर्गाचीच रीत शिकायला हवी..रोजचा सूर्य तिथं नवा असतोे..पाखरांचं गाणं नवं असतं..झिमझिमणारा पाऊस..ओला-कोरडा सुसाट वारा..ूउन्हाच्या झळाआणि थंडीच्या कुडकुडत्या रात्री साऱ्याहे सारं सेलिब्रेट केलंच आपण तर..जगणं वेगळं उरत नाही..सेलिब्रेशनची बातच न्यारी..पार्टी कधीच सरत नाही..
रोजचा सूर्य जिथं नवा असतो..
By admin | Published: October 27, 2016 4:03 PM