दिवाळीत सुरसुरी लावतो आपण.. गोलगोल.. सरसर.. फिरवतो.. ती तडतडते.. सुरसुरते.. पांढरी प्रकाशफुलं उधळते.. आणि क्षणात विझून जाते.. तेच त्या प्रकाशाच्या झाडाचंही.. उंच जातं सुरसुरत..पाऊस पाडतं प्रकाशाचा..आणि मग हळूच निवतं..जमिनीच्या पोटाशी लागतं..आणि शांत होतं..***क्षणभराचा सारा प्रकाशखेळ..पण आपण हरखून जातो..लहानपणापासून पाहतोत्या तडतडीला, सुरसुरीलापण तिचं चांदण्या उधळणंदरवर्षी हवंहवंसं वाटतं..***आपण तिला विचारतो का,किती वेळ उजळलीस?आकाशदिव्यासारखीखूप वेळ का नाहीप्रकाशात रंगली?***प्रत्येकाचा प्रकाशत्याच्यापुरता असतो..कुणाचा कमी, कुणाचा जास्त नसतो..ज्याची त्याची आपापली खासियत असतेआणि म्हणूनचदिवाळीतआकाशदिव्याइतकीचसुरसुरी महत्त्वाची असते..**रॉकेट, डबलबारकी आकाशदिवालवंगी लड कीआपटबारयाची तुलना कशाला?आनंदाच्या तागड्यातप्रकाशाचं माप कशाला?