- प्राची पाठक
आपली कामं आपण कुणाच्या तरीधक्क्याला पार्क करून ठेवतो.वेळ काढतो, दोष देतो,कारणं सांगतो.पण कामं करत नाही.का?आणि मग आपल्यालाकाय झेपणार नाही,हे आपणच ठरवूनकामांची ढकलगाडी करतो.‘हो, हो... करेन. जरा लक्ष द्यावे लागेल... पण करेन’..असं काही कामांबाबत आपल्याला वाटत असतं. कधी खरोखर ते काम करायला वेळ नसतो. कधी प्रायोरिटी वेगळी असते. कधी वाटतं, ते काम स्पेशल आहे. जरा नीट वेळ देऊन, नीट लक्ष देऊन केलं पाहिजे. ज्या कामाला आपण स्पेशल दर्जा देऊन टाकतो, तेच काम मग लांबणीवर पडत जातं. होईल- करू- बघू चक्र सुरू होतं. त्या कामाला एकतर आपल्याला अजून थोडं समजून घ्यायचं असतं किंवा काहीतरी गाळलेली जागा भरायची असते आणि मग ते होणार असतं. किंवा आपल्या हातात थेट नसलेल्या अजून एखाद्या गोष्टीवर ते अवलंबून असतं. कधीही करू, आपल्याच हातात आहे, असाही काही कामांबाबत अति आत्मविश्वास असतो. असे वेगवेगळे कॉम्बो एकत्र काम करतात आणि ते काम नाही तर नाहीच होत.दरवेळी अशीच परिस्थिती असते, असं नाही. अनेकदा अनेक गोष्टी आपण टाळतो, तेव्हा त्या गोष्टी आपल्याला करता येणार नाहीत, असंही आत कुठेतरी वाटत असतं. आपल्याला काय झेपेल आणि काय झेपणार नाही, याचे पक्के ग्रह होऊन गेलेले असतात. ‘नकोच बाबा ते’, अशी पक्की हाक मनाने दिलेली असते. कधी आपल्या आजूबाजूच्या वातावरणानंदेखील हे आपलं काम नाही, असे आपल्यावर बिंबवलेलं असतं. ‘एवढे मोठे झालात, तरी हे कळत नाही’, असं वाक्य कुठूनही अंगावर येऊन आदळू शकतं. त्यामुळे, इतके मोठे झालो, तरी एखादी बेसिक गोष्ट आपल्याला कळलेली नाहीये, हे विचारायची सोयच राहात नाही. जणू काही अमुक वय झालं की तमुक गोष्टी आपोआप डोक्याच्या हार्ड डिस्कमध्ये इन्स्टॉल होऊन अॅक्टिव्हेट होतात. एखादी गोष्ट नीट माहीत करून घ्यायची सोय राहिली नाही की नेटवर आपण काहीतरी शोधतो. तिथली माहिती त्या-त्या गोष्टींचे सर्व पैलू मांडेलच, आपल्या संदर्भात ती माहिती लागू होईलच, असं नसतं. काय आपल्याला लागू होतं आणि काय लागू होत नाही, हेही माहीत नसतं. फार खोलात कोण जाणार? मग त्यापेक्षा ते काम टाळलेलं उत्तम, असा शॉर्टकट मनात घेतला जातो. मनालादेखील त्याची ऊर्जा वाचवायची असते.एक विचार करू.चालत अर्धा किलोमीटर जाऊन चार फेºया करून एखादी गोष्ट आणणं हे काम आहे.सायकलवर अर्धा किलोमीटर जाऊन चार फेºया करून एखादी गोष्ट आणणं असंही ते होऊ शकतं.स्कूटीवर अर्धा किलोमीटर जाऊन दोन फेºयांमध्ये एक काम करणं आणि आपल्याकडे गाडी आहे यार, एकदम आणून टाकू ती गोष्ट, चार फेºया करायची आपल्याला गरज नाही, असं मनाला सांगत राहणं.हे टप्पे इमॅजिन करा.यात आपण चालायची क्षमता, सायकल, स्कूटी, कार या सर्वांची उपलब्धता गृहीत धरली आहे. आपण गेलो आणि ती गोष्ट मिळाली, हेदेखील गृहीत धरलं आहे. तिथे आपण कुणाला पाठवणार नसून आपणच जाणार आहोत, हेही लक्षात घेतलेलं आहे. आपण तिथं सुखरूप जाणार आहोत, निवडलेल्या पर्यायाने नीटच पोहोचणार आहोत, वाटेत काहीही अडचणी येणार नाहीत, हेही सगळं गृहीत धरलेलं आहे. आपल्याला अमुक गोष्ट अर्ध्या किलोमीटरवरून आणण्याची गरज आहे, हे पक्कं केलेलं आहे.इथेच आता सायकल कुणाकडे मागून ते काम होणार आहे, हा टप्पा गृहीत धरा. मग आपण मनात त्याचंच गणित मांडून बसतो. त्यानं आपल्याला सायकल दिली, तर ते काम होईल. ‘आपलं काम का होत नाही, तर ते करायला सायकल लागते. ती सायकल तो अमुक-ढमुक आपल्याला देत नाही.’सगळं एकदम सोपं होतं मग. सगळा फोकस त्याच्यावर. त्याच्या आयुष्यात काय बरं वाईट आहे, त्यातून काय मिळवलं थोडा वेळ का होईना, तर आपलं काम होईल, हे मन शोधत राहतं. ते तसंच पूर्ण होत नाही, तोवर ते काम लटकून राहतं. हे काम आपलं आपण करू शकतो, ही शक्यताच आपण गृहीत धरत नाही. आपण अजून काही आयडिया लढवून ही जी चार फेºया मारायची मेहनत होणार आहे, ती कमी करू शकू का यावर विचार होणं तर दूरच राहते. ‘करू-करू’च्या चक्र ात ते काम अडकून पडतं. या-या गोष्टी नसतील, तर अमुक काम होणारच नाही, असंही आपल्या मनात घट्ट बसतं अनेकदा. म्हणून पण आपण ते काम करायला धजावत नाही. आपल्याला कोणीतरी रस्ता दाखवला, तरच आपण ते करू शकू, नाहीतर आपल्याकडून ते काम होणं नाही असा ग्रह होतो. नुसता रस्ता दाखवून भागत नसतं. आपल्याला त्या रस्त्याने जातानादेखील समोरच्याने साथ दिलेली, गाणी म्हटलेली, त्या रस्त्यात खड्डे नाहीत ना याची सोय करून दिलेली हवी असते. इतके परावलंबित्व आलं की ते काम करायचं थ्रिलच निघून जातं. काम करण्यापेक्षा ते किती खुबीने टाळलं, हे आपल्याला महत्त्वाचं होऊन जातं. मग अगदीच हातातोंडाशी आल्याशिवाय आणि तशी गरज असल्याशिवाय आपण ते काम करत नाही.आपल्या कुवतीचे कुंपण पुरेशी जाण नसताना स्वत:भोवती आखून घेतलं की तेच कुंपण आपल्याला स्वत:हून काही करण्यापासून रोखतं. ‘हो, हो करेन’ वर ते गाडं अडतं मग.हे टप्पे समजून घेणं हीच आपली काम मार्गी लागायची पहिली पायरी असते!करूयात यादी, आपल्या अडलेल्या कामांची. शोधू जरा की कोणाकोणाच्या धक्क्याला आपण ती कामं नेऊन पार्क करून ठेवली आहेत. मगच ती कामं मार्गी लावायचा रस्ता दिसू लागेल.