शहरं
Join us  
Trending Stories
1
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
2
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
3
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
4
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
5
माउलींनी संजीवन समाधी घेतली तेव्हा विठ्ठल रखुमाईलाही अश्रु अनावर झाले, तो आजचाच दिवस!
6
PPF ची जादू : ₹१.७४ कोटी व्याजातून कमावाल; मॅच्युरिटीवर मिळतील ₹२.२६ कोटी, पाहा सोपा फॉर्म्युला
7
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
8
खांदे पालट झाल्यावरही श्रेयस-अजिंक्य यांच्यात गोडी; पुणेकर ऋतुराज-राहुलवर भारी पडली मुंबईकर जोडी
9
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
10
बावीस वर्षांचे कोवळे वय, तरी इहलोकीचे अवतार कार्य संपवून माउलींनी परलोकीची धरली वाट!
11
"तिने याआधीही ४-५ वेळा...", जिया खान आत्महत्या प्रकरणावर सूरज पांचोलीच्या आईची प्रतिक्रिया
12
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
13
महाराष्ट्रात धक्कातंत्र? मुख्यमंत्री भाजपचाच होणार, पण नक्की कोणाला संधी?; पक्षातील ५ नावं स्पर्धेत
14
Cheetah Kuno: कुनोतून आली वाईट बातमी! चित्त्याच्या दोन पिलांचा मृत्यू, मृतदेहांवर जखमा 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
16
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
17
Stock Market Updates: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी; ऑटो शेअर्सवर दबाव
18
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....  
19
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
20
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ

टॅट्ट - Tired all the time

By admin | Published: March 11, 2016 12:11 PM

कायम थकवा. सतत अंगदुखी. डोकेदुखी. काही करून पाहण्याचा उत्साह वाटत नाही, कामात मन रमत नाही, उदास वाटतं, मूड जातो. हे सारं कशामुळे होतंय? अनेकांना नेमकं परीक्षेच्या काळातच कसा गाठतो हा प्रचंड थकवा?

ऊन वाढायला लागण्याचा हा काळ. त्यात परीक्षांचा मोसम.

डोक्याला ताप आणि उन्हानं वाढणारा ताप या दोन्ही गोष्टींनी मनावरचा ताण वाढलेला असतो. एक प्रकारचा थकवा जाणवतो. कुणाकुणाचं डोकं दुखतं, कुणाला बॉडी पेन जाणवतो. कुणाला एक प्रकारचा फटीग असतो. आपल्याला बरं नाहीये असं वाटत राहतं. होत तसं काही नसतं, पण उत्साह वाटत नाही. मनावर एक औदासिन्याचा तवंग धरतो. झडझडून काही करावंसंही वाटत नाही.
पण करावं तर लागतंच, कारण कुणाला परीक्षांचा ताण, कुणाला मार्च एण्डचा ताण, तर कुणाला आपल्या धावत्या जीवनशैलीचा ताण आलेला असतो!
मनावरच नाही तर शरीरावरही या थकव्याची पुटं चढतच असतात. आपण कुरकुर करतो की, हल्ली बरंच वाटत नाही. पूर्वी कसा एकदम उत्साह असायचा. आता असं वाटतं की काही करूच नये. पण ऐन परीक्षांच्या काळात आपल्याला असं गळपटायला काय झालंय, नेमकं इतकं थकल्यासारखं का वाटतं आहे आणि ते सतत का वाटतं आहे, याचं उत्तर काही सापडत नाही.
मग घरचे किंवा आपण स्वत:ची समजूत घालतो की, स्ट्रेस वाढलाय, ऊन वाढलंय म्हणून होतं असं कधीकधी! थकल्यासारखं वाटतं, मनावर ताण येतो, दुपारी डुलकी लागते, कितीही झोपलं तरी झोप पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही, थकवा जात नाही. 
वाटेल बरं!
दोन चार दिवस कधीमधी असं अति थकल्यासारखं वाटत असेल तर त्यात काळजी करावी असं काही नाही.
पण कायम सतत, चोवीस तास, अनेक दिवस, काही महिने हीच भावना असेल, तर गोष्ट जरा गंभीर आहे, असं म्हणायला हरकत नाही.
जगभरातले अनेक लोक विशेषत: सध्या तरुण-तरुणी या सिण्ड्रोमनं ग्रासलेले आहेत.
ज्याचं नाव आहे, ‘टॅट्ट’! म्हणजे Tired all the time (tatt)
अटलांटा विद्यापीठानं तरुण मुलांसंदर्भात प्रसिद्ध केलेल्या विविध सिण्ड्रोममध्ये सध्या जगभरातल्या तरुणांना ग्रासलेला हा एक विचित्र सिण्ड्रोम अर्थात आजाराचं लक्षण आहे. काहीही कष्ट न करता, कुठलाही मोठा दु:खाघात न होता, कुठल्याही गंभीर आजारानं आजारी नसतानाही 20 ते 32 या वयोगटातील अनेक मुलामुलींमध्ये सध्या हे लक्षण आढळतं. या अभ्यासानुसार शंभरात सुमारे 62 जण आपल्याला सतत थकवा येत असल्याची, आळस वाटण्याची, बॉडी फटीग असल्याची, अंगदुखीची तक्रार वारंवार करत असतात. त्यांच्या शरीरावर आणि मनावर थकव्याचे तवंग कायम असतात. त्यामुळे त्यांना झडझडून काही काम करण्याचा उत्साह वाटत नाही. मात्र तरीही ते काम करतात, त्यांचं रुटीन चालू असतं, त्यामुळे आपल्याला आपल्या लाइफस्टाइलचाच स्ट्रेस आहे असं म्हणत ते स्वत:चा स्ट्रेस आणखी वाढवतात. एकाच चक्रात कायम फिरतात.
आणि मग हा सिण्ड्रोम वाढत राहतो आणि मनातली थकव्याची भावना वाढत राहते.
‘टायर्ड ऑल द टाइम’ असं म्हणत छंद, हौशी, भटकंती, प्रवास, इनिशिटिव्ह या गोष्टी मागे पडू लागतात आणि शक्यतो बसल्याजागी काम असं अनेकांचं सुरू होतं.
डॉक्टरांच्या मते, हा आजार लाइफस्टाइलचा तर आहेच, पण लाइफस्टाइल बदलूनही जर या लक्षणात काही फरक दिसत नसेल तर मग तब्येतीत अंतर्गत काही बिघाड झालेला आहे का? आणि त्या आजाराची लक्षणं म्हणून हा कायमस्वरूपीचा थकवा जाणवतो आहे का हे तपासून पाहायला हवं!
मात्र ते करण्यापूर्वी आपली लाइफस्टाइल कशी आहे, आणि त्यातून थकवा शरीरात भिनतो आहे का, हे पाहून निदान सलग दोन आठवडे तरी आपली जीवनशैली बदलून शरीराला उत्साहाचं टॉनिक पाजायला हवं. आणि ते करूनही जर थकवा गेला नाही तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा!
जीवनशैली, आजार आणि थकवा याचा एकमेकांशी संबंध असतो.
काही जीवनशैलीविषयक गोष्टी स्वत:शी तपासून पाहिल्या तर सततच्या थकव्याची कारणं लक्षात येऊ शकतात.
 
 
झोपेचं त्रांगडं OSA
 
आपण किती झोपतो आणि किती शांत झोपतो याचा आपल्या तब्येतीशी संबंध आहे, याचा आपण सहसा विचार करत नाही.
रात्र रात्र जागणं, रोज उशिरा झोपणं, उशिरा उठणं याचा आपल्या शरीरचक्रावर परिणाम होतोच; त्यातून झोप बिघडली तर ते चक्र अजूनच बिघडतं.
या लक्षणाला म्हणतात obstructive sleep apnoea. बिघडलेल्या झोपेची आणि त्यामुळे बिघडलेल्या तब्येतीची ही काही लक्षणं सांगता येतात. अर्थात ही लक्षणं तशी कॉमन आहेत. त्यामुळे आपली झोपेची तक्रार असेल तर वैद्यकीय सल्लाच घेतलेला बरा.
 
1) घोरणं. अनेकजण झोपेत घोरायला लागतात आणि आपण घोरतो हे ते मान्य करत नाहीत.
2) रात्री लघवीला लागणं आणि एकदोनदा उठावं लागणं.
3) सकाळी जाग आल्यावर ताजतवानं न वाटता उदास, अंग जड झाल्यासारखं वाटणं.
4) दुपारीच कशाला कधीही खूप झोप आल्यासारखं वाटणं, जांभया येणं, डुलकी लागणं.
5) कामात लक्ष नसणं, अभ्यासात लक्ष नसणं, लक्षात कमी राहणं.
6) सकाळी उठल्या उठल्या डोकं दुखणं.
7) सतत मूड स्विंग्ज होणं.
8) उदास वाटणं, सतत मूड जाणं.
9) धाप लागणं, श्वास फुलणं.
 
थकवा आलाय, लाइफस्टाइल कशी आहे तुमची?
 
1) उशिरा उठता?
रोज सकाळी सूर्योदयानंतरच उठता तुम्ही? आठ-नऊ-दहा वाजता उठता? त्यानंतर चहा पिता? मग कधीतरी जेवता? उशिरा उठल्यानं खाणंपिणं-झोप यांचं चक्रच बदलतं, आणि ते सतत बदलत गेल्यानंही सतत थकवा जाणवतो. त्यात दिवसभराची कामं तुबंतात, उशीर होतो, त्यानं स्ट्रेस वाढतो. काहीजण रात्री अभ्यास करून सकाळी उशिरा उठतात, त्यानंही थकवा जाणवतो.
रोज सूर्योदयापूर्वी उठणं हा एक नियम करून पाहायला हवा.
 
2) व्यायाम नाहीच?
उशिरा उठता त्यामुळे सकाळी व्यायामाचा प्रश्नच नाही. दिवसभरातही तो कधी करत नाही.
त्यामुळेही थकवा जात नाही. जड होतं सगळं शरीर. त्यामुळे निदान रोज वीस मिनिटं व्यायाम, सूर्यनमस्कार, सायकलिंग, ब्रिस्क वॉकिंग, जॉगिंग एवढं तरी करायला हवंच!
 
3) वाढलेलं वजन
वजन वाढणं हेदेखील थकल्यासारखं वाटण्याचं एक कारण आहे. वजन सतत वाढत असेल तर डाएट, व्यायाम या दोन गोष्टी तातडीनं करायला हव्यात.
 
4) कमी पाणी पिणं
गोष्ट तशी क्षुल्लक वाटते वरकरणी, पण महत्त्वाची आहे. कमी पाणी प्याल्यानं शरीर डिडायड्रेट होतं. शरीरात पाण्याचं प्रमाण कमी होतं. रक्त कमी पातळ होतं, त्यानंही सगळ्या अवयवयांना होणा:या रक्तपुरवठय़ावर परिणाम होतो. शरीराला थकवा जाणवतो.
त्यामुळे पाणी भरपूर प्या. काहीजण पाणी प्यायचंच विसरून जातात. त्यांनी चक्क स्मार्टफोनवर पाणी पिण्याची आठवण करणारे रिमाइण्डर लावणं योग्य.
 
5) डोळ्यासमोर सतत स्क्रीन
डोळ्यासमोर सतत कुठला ना कुठला स्क्रीन असणं, चोवीस तास ऑनलाइन, झोपतानाही डोळ्यासमोर मोबाइलचा स्क्रीन यामुळेही शरीर आणि मनाचा थकवा वाढतो. मेंदूवर आपण सतत कसला ना कसला भडिमार करत राहतो. त्यानं मनाचा आणि पर्यायानं शरीराचाही फटीग वाढतो. टॅट्टनी पछाडलेले अनेकजण या स्क्रीनचे बळी असतात, असं अनेक अभ्यासक सांगत आहेत.
निदान झोपण्यापूर्वी किमान दोन तास तरी आपल्या डोळ्यासमोर कुठलाही स्क्रीन असता कामा नये. त्याऐवजी गाणी ऐकणं, पुस्तक वाचणं असे पर्याय शोधता येऊ शकतात.
 
सतत थकवा, आपण आजारी तर नाही?
 
‘चेहरा का असा थकल्यासारखा दिसतोय, आजारी आहेस का?’
- असा प्रश्न विचारला की, अनेकजण सांगतात, काही नाही रे, जरा थकवा आलाय, धावपळ आहे इतकंच. आजारबिजार काही नाही. चांगला ठणठणीत आहे.
मात्र चोवीस तास, कायम थकवा जाणवत असेल तर खरंच आपण आजारी नाही ना, याची एकदा खात्री करून घ्यायला हवी.
कारण हा थकवा कुठल्या ना कुठल्या आजाराचं, कमतरतेचंही लक्षण असू शकतो.
 
1) अॅनिमिया
भारतीय उपखंडातच मुली आणि महिलांमध्ये हा आजार मोठय़ा प्रमाणात आढळतो. अॅनिमिया. रक्तात लोहाचं प्रमाण कमी असणं, हिमोग्लोबिन कमी असणं ही कमतरता आपल्याकडे अनेक मुलींना जाणवते. त्याचा थेट संबंध आपल्या खाण्यापिण्याशी आहेच. त्यामुळे अनेक जणींना अॅनिमियाचा, अशक्तपणाचा त्रस होत असतो. अगदी वरकरणी धष्टपुष्ट दिसणा:या मुलीही अॅनिमिक असू शकतात.
त्यामुळे आपल्यात लोहाची कमतरता तर नाही ना, हे तपासून पाहायला हवं.
 
2) डिप्रेशन
शरीराचे आजारच जिथं आपल्याकडे लवकर मान्य केले जात नाहीत, त्यावर पटकन उपचार केले जात नाहीत तिथं मनाच्या आजारांकडे कोण लक्ष देणार?
मात्र स्ट्रेस, डिप्रेशन, शरीरात विविध व्हिटॅमिन्सची कमतरता याचा परस्पर संबंध असतो. ज्यांना डिप्रेशनचा आजार आहे, मनावर औदासिन्याचं मळभ आहे, त्यातून स्वत:चं स्वत:ला बाहेर पडता येत नाहीये अशा सगळ्यांना सतत अतीव थकवा जाणवतो. आपल्याला डिप्रेशन आहे हे ते मान्यच करत नाहीत, हा भाग वेगळा. त्यामुळे आपल्याला मनातल्या मनात काही खातंय का? कसला त्रस आहे का हे तपासून पाहिलं पाहिजे. डिप्रेशनचा आजार असेल तर त्यावर योग्य वैद्यकीय सल्ला घ्यायला हवा. त्यात कसलाही कमीपणा नाही, हेदेखील स्वत:ला सांगायला हवं! डिप्रेशन यशाच्या कालखंडातसुद्धा येऊ शकतं, हे अलीकडेच दीपिका पदुकोनने पण जगजाहीर सांगितलं आहेच.
 
3) मधुमेह
अत्यंत तरुणपणातच बीपी आणि मधुमेहाचा त्रस सुरू होणं हे जीवनशैलीचे आजार आपल्याहीकडे आता अनेकांना पंचविशीतच गाठत आहेत. त्यामुळे नियमित आपली शुगर तपासून घेण्यात काही तोटा नाही. त्याकडे लक्ष ठेवायला हवं. मुख्य म्हणजे शुगरचे रिपोर्ट नॉर्मल आले म्हणून ते फेकून न देता, जपून ठेवायला हवेत. म्हणजे पाच वर्षात त्यात काही बदल आहे का हे पुढे तपासून पाहता येतं. त्यामुळे मधुमेहाची चाचणी महत्त्वाची!
 
4) हाडांची झीज
व्हिटॅमिन डीची कमतरता हा आणखी एक नवीन आजार आता तारुण्यातच वाटय़ाला येत आहे. त्यामुळे बी 12, व्हिटॅमिन डीच्या चाचण्या, सांधेदुखीची चाचणी, आर्थरायटिसची चाचणी हे सारं डॉक्टरांच्या सल्ल्यानं करायला हवं. आपल्या अंगदुखीची कारणंही शोधायला हवीत.
 
5) झोपेचे विकार
सततच्या थकव्याचं कारण बदललेली झोप हेदेखील असू शकतं. म्हणजे काय तर अनेकांना रात्री लवकर झोपच लागत नाही किंवा अजिबातच झोप लागत नाही. एकदा जाग आली की पुन्हा झोप येत नाही. कितीही झोपलं तरी झोप लागली होती असं वाटत नाही. डोकेदुखी, मसल्स आणि सांध्याचं दुखणं, अशक्तपणा, पायात पेटके येणं, कामात लक्षच न लागणं हे सगळं या झोपेच्या विकाराशी संबंधित असू शकतं. त्यामुळे आपल्या झोपेकडेही लक्ष ठेवून त्यासंदर्भातही वैद्यकीय सल्ला घ्यायला हवा!