- डॉ. राम ताकवले
1) कोरोनाकाळात ऑनलाइन शिक्षण अचानक स्वीकारावे लागले. आदिवासी, दुर्गम भागातील अनेक तरुण शिक्षक जिवाचा आटापिटा करून ऑनलाइन शिकवणं स्वीकारत आहेत, या तरुण शिक्षकांना तुम्ही काय सांगाल?ज्यावेळेला आपण एका युगातून दुसर्या युगात जातो, तेव्हा हे असं होतंच. हा लास्ट माईल प्रॉब्लेम उद्भवतच राहतो. प्रतीकात्मकरीत्या बोलायचं, तर मोठय़ा शहरात पोहोचण्याचे रस्ते चांगले, गुळगुळीत, डांबरी असतात. लहान वाडय़ावस्तीवर जायच्या वाटा मात्न दुर्गम, खाचखळग्याच्या. तिथे पोहोचणं अवघड होऊन बसतं. हा सगळा संक्रमणाचा काळ असल्याने एकाच वेळेला आपण दोन युगं पाहतो आहोत. डिजिटल युग, आर्टिफिशियल इंटलिजन्सचं युग आपल्याला स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही.अर्थात यात निर्माण झालेला डिजिटल डिव्हाइड मोठा आहे. त्याची सोडवणूक टाळता येणार नाही. भारतासारख्या देशात एकीकडे स्मार्ट रोबोज, इंटरनेट ऑफ थिंग्ज आहे. दुसरीकडे आदिवासी-ग्रामीण भागात इंटरनेटची रेंज नाही ही स्थिती आहे. मात्र समस्या सोडवायला पुन्हा तंत्रज्ञानाकडेच जावं लागेल. डिजिटल तंत्नज्ञान वापरूनच डिजिटल डिव्हाइड कमी करता येईल.पंढरपूरजवळच्या एका लहानशा शाळेत मी भेट द्यायला गेलो होतो. तिथे मला दिसलं की शिक्षकांपेक्षा मुलंच जास्त टेक्नोसॅव्ही असल्याचं जाणवलं. फक्त त्यांना तंत्रज्ञान सहज उपलब्ध झालेलं नव्हतं. त्यांच्या हातात टॅब्लेट्स दिली तर त्यांनी त्याचं ऑपरेटिंग सहज अॅडॉप्ट केलं. हे शासनाने लक्षात घेत मोठा पुढाकार घेतला पाहिजे. शासनाच्या अनेक योजना मला आशादायी वाटतात. शिवाय अजून एक पर्याय म्हणून सॅटेलाइट तंत्रज्ञान वापरता येऊ शकतं.पण पुन्हा असं आहे, की शासनाची जोडणी टॉप टू बॉटम अशी असते. अनेकदा तळातल्या माणसार्पयत सुविधा पोहोचायला वेळ लागतो किंवा त्या पोहोचतच नाहीत. अशावेळी हा प्रश्न समाजाने सोडवायचा असतो. शासनानेही आता लास्ट पर्सन फस्र्ट असं धोरण ठेवा. ज्यांचं दुखतंय त्यांनी पुढे येऊन सांगावं लागतं. तेव्हाच शासनाचं लक्ष जाईल.
2) पोस्ट-कोरोना शिकवण्याच्या पद्धतीत बदल म्हणून तरुण शिक्षकांना काय नवा दृष्टिकोनही अंगीकारावा लागेल?
- आपण माहितीच्या आधारावर आपली शिक्षणपद्धती बनवलीय. ती आता बदलली पाहिजे. परीक्षाही ओपन बुक पद्धतीने घेतली पाहिजे. इन्फर्मेशन बेस्ड एज्युकेशनपासून आपण थिंकिंग बेस्ड एज्युकेशनकडे जाऊया. तिथून पुढे मग लर्निग बेस्डकडे जायचंय. लर्निगचे प्रकार असतात. युनेस्कोने पूर्वी शिक्षणासाठी एक चार पिलर्स मॉडेल दिलं होतं. लर्निग टू नो, लर्निंग टू डू, लर्निग टू लिव टुगेदर अॅण्ड वर्क टुगेदर. सध्या आपला सगळा भर केवळ लर्निग टू नो वरच आहे.ट्रान्स्पोर्टेशन, कम्युनिकेशन आणि ऑपरेशन या तिन्ही क्षेत्रात आज मोठी क्रांती झालीय. त्या क्रांतीचा योग्य तो वापर करून घ्यावा लागेल. आपले अप्रोचेस वीस वर्षांपूर्वीचे असतील तर चालणार नाही. ज्यावेळी परिवर्तन घडतं तेव्हा फॉर्म, रिफॉर्म, ट्रान्सफॉर्म या तीन संकल्पनांना खूप महत्त्व प्राप्त होतं हेही लक्षात घेतलं पाहिजे.
3) याकाळात जे संभ्रम, गोंधळ होतात, ते कसे सोडवायचे?
जगच खुलं होतं तेव्हा अनेक संभ्रम निर्माण होता, प्रश्न पडतात. शिक्षकाला आता त्याची भूमिका बदलावी लागेल. केवळ फोनच नाही तर अनेक गोष्टी आजच्या काळात स्मार्ट बनल्या आहेत. इंटरनेटने जग खूप जवळ आणलंय. इ-लर्निंगच्या या काळात फक्त माहिती सांगतो तो खरा शिक्षक असं आता नाही तर जवळ आलेल्या जगाकडे कसं बघावं ही दृष्टी देणारा शिक्षक चांगला अशी व्याख्या आता केली पाहिजे. विद्याथ्र्यासाठी आता पुस्तक नाही तर जग हे ज्ञान मिळवण्याचं साधन बनलंय हे शिक्षकांनी ध्यानात घ्यावं.
4) शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी या काळात काही प्रमाणात नैराश्यात, संभ्रमात जाताना दिसताहेत. त्यांच्याकडे स्मार्टफोन, इंटरनेट या बाबींची वानवा दिसते. ऑनलाइन काळाशी जुळवून घेताना त्यांना इतरही अनेक अडचणी आहेत. त्यांना तुम्ही काय सांगाल?
आज शिक्षकांसह विद्याथ्र्यापुढे अनेक आव्हानं आहेत. मात्न आता हरेकाला स्वतर्चा मार्ग शोधावा लागेल. शाळा, शिक्षक, पालक सगळ्यांचीच आता जबाबदारी मोठी आहे. मानसिकदृष्टय़ा खंबीर होणं हे आता कधी नव्हे ते महत्त्वाचं झालं आहे. पालकांनी शाळांकडे काही बाबींना घेऊन आग्रही असलं पाहिजे. शिवाय स्वाध्याय आता महत्त्वाचा झाला आहे. सतत शाळा-शिक्षक यांच्यावर अवलंबून राहण्याचे दिवस आता संपलेत. विद्याथ्र्यानी शिक्षणाचा निर्मिती आणि वॅल्यू क्रि एशनशी संबंध लावला पाहिजे तरच येत्या काळात टिकून राहता येईल.
लेखक शिक्षणतज्ज्ञ आहेत.मुलाखत आणि शब्दांकन - शर्मिष्ठा भोसले