शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
3
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
4
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
5
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
6
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
7
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
9
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
10
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
11
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
12
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
13
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
14
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
15
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
16
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
17
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
18
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
19
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
20
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी

टीमवर्क! हार्मोन्सचं टीमवर्क, तंदुरुस्तीचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 3:48 PM

मानवी शरीरातील सर्व अवयव तसे स्वतंत्र काम करतात. एकमेकांच्या कामात लुडबूड करत नाही; पण असतं ते टीमवर्कच.

- डॉ. यशपाल गोगटे

मानवी शरीरातील सर्व अवयव तसे स्वतंत्र काम करतात. एकमेकांच्या कामात लुडबूड करत नाही; पण असतं ते टीमवर्कच. परस्परांवर काम अवलंबूनही असतं. टीमनं उत्तम काम करताना एकमेकांशी चांगला संवादही हवा. त्यासाठी माध्यम हवं. ते माध्यमही उत्तम हवं नाहीतर कम्युनिकेशनचे प्रश्न निर्माण होऊन कामावर परिणाम होतो. हे सारं जसं आपण अवतीभोवती पाहतो तेच आपल्या शरीर नावाच्या टीममध्येही चालतं. आणि अवयवांना संदेश पोहोचवण्याचं काम हे रासायनिक घटक करतात. तेच हार्मोन्स. ते मूलभूत संदेश वाहकाचं काम करतात. शरीरात एकोपा कायम ठेवतात.

तो एकोपा कायम ठेवायचा तर हार्मोन्सचं काम चांगलं व्हायला हवं. त्यांची निर्मिती विशिष्ट ग्रंथींमध्ये होते. त्यांना अंर्तस्त्रावी ग्रंथी म्हणतात. शरीराची वाढ, विकास व चयापचय करणं हे त्यांचं काम. त्यासाठी हार्मोन्सची रक्तामध्ये असलेली ठरावीक मात्रा अतिशय महत्त्वाची ठरते. ते बिघडलं की आजार अटळ. शरीराचं विपरीत वर्तनही अटळ. आता हे हार्मोन्स किती आहेत, त्यांची संख्या किती हे मोजावं लागतं. हार्मोन्सचं रक्तामधील प्रमाण विशिष्ट असतं हे जरी खरं असलं तरी आजाराचं निदान केवळ संख्याशास्त्रावर आधारित नसतं. गुणात्मक तपासणीही करावी लागते. म्हणून तज्ज्ञ डॉक्टर अनेकदा रक्त चाचण्या करण्याचा सल्ला देतात. रिपोर्ट आल्यानंतर विशिष्ट हार्मोन्सचं प्रमाण बघून त्याचा आजाराशी असलेला संबंध काय, याचा अभ्यास करतात. मग आजाराचं निदान होतं.

आजकाल होतं काय तरुण वयात केवळ जाहिरातींना भुलून झटकेपट उपचार करून घेण्याचा कल दिसतो. त्यातून काहीजण स्वत:च रक्ताच्या चाचण्याही करुन घेतात. त्यानं घोळ वाढतो. मात्र काही हार्मोनल घोळ आहे अशी शंका असेल तर योग्य डॉक्टरकडे जाऊन त्यांच्या सल्ल्यानं हार्मोन्सची केलेली तपासणी स्वस्त व श्रेयस्कर ठरते.

हार्मोन्सची रक्त चाचणी कधी? कशी?हार्मोन्सच्या चाचण्या योग्य लॅबमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जातात. संबंधित अवयवातील हार्मोन्सचे प्रमाण मोजण्यासाठी त्यानुसार लाळ, रक्त, किंवा मूत्र याची तपासणी करावी लागते. रक्तामधील वेगवेगळे घटक जसे की सिरम व प्लास्मा यामध्येही मोजमाप होत असते. त्यामुळे रक्त तपासणीच्या आधी तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याचे तंतोतंत पालन करायला हवे. रक्त तपासणी करताना वेळेचं पालन करणंही महत्त्वाचं असतं. हार्मोन्सचे प्रमाण जैविक घड्याळानुसार सक्रिय असतं. उदाहरणार्थ- पुरु षार्थाचे हार्मोन्स टेस्टोस्टेरॉन हे रक्तामध्ये सकाळी उठल्यानंतर ७ च्या सुमारास सर्वात सक्रिय असतं. त्यामुळे वेळा पाळणं महत्त्वाचं.