शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

टर्मरिक लेट्टे - हेल्दी ड्रिंक्सच्या जगात एक नवाच ट्रेण्ड

By admin | Published: June 11, 2016 10:35 AM

नेहमी पिझ्झा, बर्गर अशा जंक फूडवर ताव मारणारे आपण आजारी असलो की मात्र चुपचाप आई जे सांगेल ते ऐकतो. हळदीचे गरमागरम दूध नाक मुरडत का होईना पितो

नेहमी पिझ्झा, बर्गर अशा जंक फूडवर ताव मारणारे आपण आजारी असलो की मात्र चुपचाप आई जे सांगेल ते ऐकतो. हळदीचे गरमागरम दूध नाक मुरडत का होईना पितो. हळद-दुध हे कायम सर्दी-खोकला झाला की नाक दाबून प्यायचं हा अनुभव आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांचाच.
कधीकधी तर रोज पिवळी पिवळी ती हळद घातलेली भाजी खाऊनही कंटाळा येतो. पण आई-आजीच्या सल्ल्यानुसार तर हळद ही फार पौष्टीक. म्हणून तर कितीही कंटाळा आला असला तरी ते दूध, भाजी मुकाटय़ानं शरीरात पचवावीच लागते.
पण सध्या याच हळदीचं जगभरात महत्व एकाएकी खूपच वाढत चाललं आहे. एवढंच नाही तर गुगलवर स्पाईस असं सर्च केलं तर हळद आणि तिचं महत्व शोधणा:यांची संख्या सर्वाधिक आहे.
सध्या जगभरात एक नवीनच खूळ आलंय.
ज्याची आपण कल्पनाच करु शकत नाही.
परदेशात ( विशेषत: अमेरिकेत) कोल्डड्रींक्सप्रमाणो हळदीचं बाटलीबंद दूध विकत मिळायला लागलं आहे.
परदेशात हेच दूध टर्मरिक लेट्टे (turmeric latte) नावाने मिळतं आहे. आरोग्यास अत्यंत उत्तम म्हणून तरुण जनताही अगदी आनंदानं हे टर्मरिक लेट्टे पीत आहे. याशिवाय ज्या पदार्थात हळद वापरली जात नाही त्यातही आता थोडीशी हळद घालून तो पदार्थ करण्याचा ट्रेंडही वाढला आहे. बर्गरच्या पॅटीसमध्ये इतर भाज्या आणि मसाल्यांबरोबर हळद घालण्याकडे आजकाल ब:याच हॉटेलांचा ओढा आहे. 
हळदीच्या पदार्थाबरोबरच हळदीचे सूपही लोकप्रिय आहे. थाई क्युङिानमध्ये केल्या जाणा:या या सूपमध्ये नारळाच्या दूधात हळद पावडर आणि भाज्या मसाले घालून सीम टॉम टॉम थाई सूप केलं जातं.  हळद आणि नारळाच्या मिश्रणामुळे या सूपची लच्चत खूप छान लागते. 
हळदीमध्ये अनेक शक्तीवर्धक गुणधर्म असल्यानं तसेच ती अॅण्टीऑक्सीडीन असल्यानं आता नव्यान लोकांना तिचं महत्व आता खूप पटायला लागले े हळदीचा  प्रभाव गेल्या काही वर्षात खूप वाढत असल्याचं आहारतज्ज्ञ कांचन पटवर्धन सांगतात.
लोकांनी कितीही आधुनिक पद्धतीचा आहार स्वीकारला असला तरी पारंपारिक गोष्टींचं महत्व लक्षात घेता आता पुन्हा जुनं ते सोनं म्हणायची वेळ आली आहे. त्यामुळे उद्या हेच टर्मरिक लेट्टे आपल्याकडेही बाटलीत मिळायला लागलं आणि त्याची क्रेझ आली तर चकीत होऊ नका.
 
-भक्ती सोमण