असं वाटतंच ना अनेकदा,
की आपण कुणीच नाही.
आपल्यात खास काहीच नाही.
आपल्याला कुणी भाव देत नाही.
गर्दीनं आपल्याकडे पहावं,
असं विशेष आपल्यात काही नाही.
कुणीच, कधीच, कशाचंच कौतूक करत नाही,
आपण इतके सामान्य की, चारचौघात सुद्धा
कधी उठून दिसत नाही..
अशा ‘आपलं’ काय करावं?
आपल्याच मनाला कसं समजवावं?
***
उत्तर अगदी साधं आहे,
आपल्यासारखं जगात दुसरं कुणी आहे का?
आपल्यासारखा दुसरं कुणी दिसतं का?
रोज उगवता सूर्य आपल्यासाठी येतोच ना,
आणि रात्रीचं चांदणं आपल्यावर बरसतंच ना,
आपल्यासारखे आपणच असतो,
अगदी खासंम्खास!
मग तुलनेचं हे तागडं हातातून
फेकून द्यायचं आणि मनाच्या गाभाºयात
उजळत दिवा आपणच आपला प्रकाश व्हायचं!
-ऊर्जा