एक रुपयाचे कॉईनबॉक्स होते ना आपल्याकडे तेव्हाची ही गोष्ट.
एक मुलगा एका दुकानात जातो. तिथून फोन करतो.
म्हणतो, ‘ तुमच्याकडे बागकामासाठी माणूस हवाय असं कळलं, मी येऊ का?’
पलिकडून एक महिला- नाही. आमच्याकडे आहे माणूस.
मुलगा- पण मी उत्तम काम करतो, फार तर पैसे कमी द्या. त्याला देता त्याच्यापेक्षा कमी द्या.
पलिकडून..- नको, तो मुलगा उत्तम काम करतो. फार प्रेमानं सांभाळतो बाग.
मुलगा- मी पण चांगलं काम करतो. वाटलं तर अजून काही घरकाम सांगा, ते ही करीन.
पलिकडून- नको, आमच्याकडे कामाला येणारा मुलगा, फार चांगलं काम करतो. त्याच्याकडून मी नाही काम काढून घेणार, तुम्ही कमी पैसे घेत असला तरी नाही..
***
हा मुलगा फोन ठेवून देतो. ते सारं ऐकणारा दुकानदार म्हणतो. माझ्याकडे आहे काम, माझ्याकडे येशील का?
मुलगा म्हणतो, नको! माझ्याकडे काम आहे.
दुकानदार-मग आत्ता तू एवढा गयावया का करत होतास?
मुलगा- त्या बार्इंच्या बागेत मीच काम करतो. माझं काम नक्की कसं होतंय, त्यांना माझ्याकामाविषयी काय वाटतं हे समजून घ्यायचं म्हणून मी तो फोन केला होता. माझं मीच सेल्फ अप्रायझल करत होतो! आपलं काम नक्की कसं चाललंय हे आपणच तपासून पाहिलं पाहिजे ना!
-ऊर्जा