एका गावात एक गुरुजी रहायचे,
लोक त्यांच्याकडे येऊन सतत भुणभुण करायचे की, मला किती दु:ख, किती त्रस. बाकी लोकांचं आयुष्य किती सोपंय. अमक्याकडे पहा, किरकोळ त्रास. तरी किती कण्हतो. एवढं सुख मला असतं तर मी कधीच कुरकुरलो नसतो.
शेवटी कंटाळून एक दिवस ते गुरुजी गावच्या सगळ्या लोकांना बोलवतात आणि म्हणतात की, तुम्ही तुमचं नकोसं दु:ख एका कागदावर लिहा.
ते या झाडावर ठेवा.
मग जाताना जो हवा तो कागद उचला, त्यात येईल ते दु:ख तुमचं.
लोक तसं करतात.
कागद उचलतात.
आणि पाहतात तर काय वाटय़ाला आलेलं दु:ख आधीच्या दु:खापेक्षा जास्त भयानक वाटत होतं.
लोक कागद परत करतात आणि आपलंच दु:ख बरं होतं म्हणत जुनंच दु:ख स्वीकारतात.
आणि मग त्यांना कळतं, की दुस:याचे भोग कितीही किरकोळ वाटत असले तरी ते आपल्या वाटय़ाला आले तर सहन करणं अवघड.
-ऊर्जामन की बात
एका गावात एक गुरुजी रहायचे,
लोक त्यांच्याकडे येऊन सतत भुणभुण करायचे की, मला किती दु:ख, किती त्रस. बाकी लोकांचं आयुष्य किती सोपंय. अमक्याकडे पहा, किरकोळ त्रस. तरी किती कण्हतो. एवढं सुख मला असतं तर मी कधीच कुरकुरलो नसतो.

-ऊर्जा