एक मुलगा. सतत चिडचिडा. सतत भूणभूण. सतत गा:हाणं आज हे वाईट घडलं, ते वाईट घडलं.
रोज तेच ते. रोज रडरड.
एकदा तो आजीकडे गावीकडे जातो.
तिलाही सांगतो, माङयाच आयुष्यात कसं सगळं वाईट घडतं, मला जे आवडत नाही तेच घडतं.
आजी ऐकून घेते. एकीकडे ती केक बनवत असते.
नातवाला विचारते तुला केक आवडतो?
तो हो म्हणतो.
मग म्हणते घे, हे कच्चं अंड खा?
तो म्हणतो, श्शी!
मग म्हणते हे घे नुस्तं पीठ खा.
तो तोंड वाकडं करतो.
मग बेकिंग सोडा खातोस का?
नातू म्हणतो, काहीही काय विचारतेस?
‘पण तूच तर म्हणतोस ना, की तुला केक आवडतो, मग केक मध्ये हेच सगळं तर असतं.’
मग का नाकं मुरडतो?
नातू चक्रावतो. तेव्हा आजी सांगते,
‘ आपल्या सगळ्या नावडत्या वस्तूंतूनही आवडती वस्तू घडते याचं एक रूप म्हणजे हा केक. जे घडतं, वाटय़ाला येतं, त्या सगळ्यालाच नाक मुरडत राहिलं तर जे चांगलं जमून येतंय ते कसं दिसेल आपल्याला?’
-विचार कर!
-ऊर्जा