एकदा एका भल्या माणसाला वाटेत एक भिकारी भेटतो.
तो भीक मागतो, हा भला माणूस म्हणतो, भीक कशाला मागतोस? मी तुला काम मिळवून देतो चल.’
असं म्हणून तो त्याला एका व्यापाºयाकडे नेतो आणि म्हणतो याला काम दे. व्यापाºयाचा या भल्या माणसावर विश्वास असतो. त्यामुळे तो त्या भिकाºयाला काही वस्तू देतो आणि म्हणतो वीक, जो नफा होईल तो तुझा!
काही दिवसांनी त्या भल्या माणसाला तोच भिकारी पुन्हा भेटला, भीक मागत होता.
भला माणूस म्हणाला, काय झालं? काम का सोडलंस?
तर तो भीकारी म्हणाला, ‘ त्यादिवशी मी सामान घेतलं. सरळ वाळवंटाच्या दिशेनं गेलो. तिथं एक आंधळा गरुड निपचित पडला होता. पाण्यासाठी तडफडत होता. तेवढ्यात एक दुसरा गरुड आला. त्यानं चोचीत अन्न आणलं होतं आणि तो त्या पहिल्याला खाऊ घालत होता. मग मला वाटलं की जर हा गरुड दुसºयाला खाऊ घालतो, तर इतर माणसांनी मला खाऊ घातलं तर काय बिघडलं? मिळेल मलाही बसल्या जागी..’
तो सभ्य माणूस हसला आणि म्हणाला, पण तुला तो दुसरा गरुड व्हावंसं का नाही वाटलं? जो दुसºयाला खाऊ घालतो, आधार देतो. शेवटी आपण कोण व्हायचं हे आपणच ठरवायचं असतं..’