- ऊर्जा
एक शिक्षक. अत्यंत नम्र. मृदुभाषी.
अत्यंत शालीन.
वर्गातही ते मुलांना कायम यासाºयाविषयी सांगत. पण मुलं हसत त्यांना.
त्यात एक मुलगा तर जरा जास्तच वात्रट होता. एकदा सरांकडे गाडी नव्हती.
तो सरांना म्हणाला, सर मी देऊ का तुम्हाला लिफ्ट?
सर बसले त्याच्या गाडीत.
अत्यंत रॅश गाडी चालवत, अत्यंत वेडीवाकडी स्पीडमध्ये दामटत, लोकांना हॉर्न वाजवत, कट मारत तो धावत होता.
सर गप्पच. मग तो सरांना म्हणाला, ‘ सर पाहिलंत, नम्रपणाला काही अर्थ नसतो. मी असं चालवतो म्हणून लोक बाजूला होतात. आपल्याला पाहून हवा हादरली पाहिजे.. काय कामाचं हे नम्र दबलेपण?’
सर हसले, म्हणाले खरंय तुझं. पण एवढी सुसाट हवा तुझ्या टायरमध्ये नम्रपणे बसलीये, म्हणून तुझा हा आक्रमकपणा धावतोय..जरा तिलाही मोकाट सोड ना टायरमधून..’