दिवाळी म्हणजे रुटीनचा हात सोडणं.. आपण जी पुंजी, जे धन कष्टानं मिळवतो, त्याची पूजा करत ते सारं साजरं करणं, सजवणं आणि आपल्या कर्तृत्वाचे क्षण पुन्हा जगणं. स्वत:लाच नव्यानं भेटणं..आपल्याला आणि आपल्याच माणसांना भेटण्याचा असाच एक प्रवास उलगडत जातो तो यंदाच्या ‘लोकमत दीपोत्सव’ या दिवाळी अंकात! दिवाळी अंक म्हणजे जे जे त्यातलं शक्यतो काहीच न करता, काही वेगळी वाट धरता येईल का, याचा विचार करता करताच तर आम्हाला सापडला ठऌ 44 हा हायवे! नॉर्मली पत्रकारांनी प्रवास कसा करावा, ’असाईन्मेंट’वर असताना काय काय आणि कसं कसं करावं, हवी ती माहिती कशी जमवावी, याचे काही ठोकताळे ठरलेले असतात. - आम्ही ठरवलं, की हे सगळंच मोडून पाहू! पत्रकार म्हटलं, म्हणजे लोकांना प्रश्न विचारणं आलं. हल्ली तर अंगावर धावूनच जातात लोक.
आम्ही म्हटलं, की आपण ‘ऐकू’.समजून घेऊ.एरवी मान्यवर लोकांनाच भेटण्याचा रिवाज आहे.आम्ही म्हटलं, की मान्यवरच का?आपण सामान्य माणसांना भेटू.रस्त्यावर जो भेटेल त्याला/तिला भेटू.ते सांगतील ते ऐकू.आपण ठरवलेले प्रश्न घेऊन लोकांना भेटायला जायचं नाही आपण.एक साधी गोष्ट करायची :देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायचं,तेही रस्त्यानं, थेट प्रवास करत.कन्याकुमारी ते काश्मीर.वाटेत जे मिळेल ते खायचं.जिथं रात्र होईल तिथं मुक्काम करायचा.सकाळी उठल्यावर जी माहिती मिळेल, जी माणसं भेटतील, त्यांना भेटून, त्याप्रमाणे पुढे जायचं.वाचायला, ऐकायला फार सोपं, रोमॅण्टिक वाटतं हे,पण प्रत्यक्षात आपल्या मनाला इतक्या अनिश्चिततेची सवय नसते.आपण सारेच नाकासमोर जगायला,प्लॅन केल्याप्रमाणे गोष्टी पूर्ण करायला इतके सरावलेले असतो की,पुढच्या मिनिटाला काय करायचं?आज दिवस उगवला आता या दिवसभरात काय करायचं, हे माहितीच नाही.- ही अनिश्चितता आपल्या अंगावरच येते..जे घडेल ते घडू देणं, जे दिसेल ते पाहणं,जे आहे ते स्वीकारणं हे सारं खरं तर किती नैसर्गिक असतं..रोज उगवणाऱ्या आणि मावळणाऱ्या दिवसासारखं..पण असं नॅचरल जगणं विसरत, प्लॅण्ड आणि कण्ट्रोल जगण्यानं आपण आपले दिवस रुटीनच्या नावानंं भरून टाकतो.आमची रुटीनची डायरी फाडून टाकली ती या एका प्रवासानं.काही ठरवूच नका..चालत रहा, धावत रहा..लोक भेटत राहतील, ते सांगतील ते ऐकत रहा..आपल्याला काय ऐकायला आवडेल तेच ऐकायची कानाला लागलेली सवय मोडा.काय खायला आवडेल तेच खाण्याचीजिभेला लागलेली सवय तोडा.आणि कुठं रहायला आवडेल याचीसुरक्षित जाणीवही सोडा.आणि मग त्यानंतर जे तुमचं आणि इतरांचं आयुष्य तुम्हाला भेटेल,ते जगून पहा..- असं या प्रवासानंच सांगितलं!आणि आम्ही रस्त्यावर स्वार झालो.अनपेक्षितता आणि आश्चर्य मग इतकं सतत भेटायला लागलंकी सुरक्षित चाकोरीपेक्षा या अनपेक्षिततेचीच चटक लागली.रोज नवनवीन माणसं भेटत राहिली.ती आपापल्या कहाणीची हिरो-हिरॉईन्सच होती.कष्टानं झगडणारे, लढणारे,जिद्दीने आपली वाट तयार करणारे लोक.काही स्वत:पुरते हरलेले,पण आपल्या मुलाबाळांसह, भावाबहिणींच्या आयुष्यात उमेद पेरणारे.अनेकांकडे सांगण्यासारखं खूप होतं.इतक्या कहाण्या की शेकडो पुस्तकं वाचण्याचा अनुभव यावा.हे सारं घेऊन आम्ही परत आलोतेव्हा जाताना होतो, तसे उरलो नव्हतो.या दिवाळीत हा अनुभव, ही कमाईतुमच्या साऱ्यांसोबत वाटून घेतानाम्हणूनच श्रीमंत झाल्यासारखं वाटतं आहे.चला, या प्रवासाला.या वर्षीच्या ‘लोकमत दीपोत्सव’मध्ये....- टीम दीपोत्सव
अधिक माहिती :
sales.deepotsav@lokmat.com
स्वत:साठी घ्या, स्नेहीजनांना 'दिवाळी भेट' पाठवा !भारतभरात कुठेही घरपोच अंक मिळवण्यासाठी आॅनलाइन खरेदीची व्यवस्था :
deepotsav.lokmat.com