शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
4
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
5
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
8
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
9
SSY की SIP…मुलीच्या भविष्यासाठी कुठे गुंतवावा पैसा, कनफ्युज असाल तर समजून कुठे मिळेल जास्त पैसा?
10
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
11
१६ दिवसांत ४८ लाख जोड्या अडकणार रेशीमगाठीत, ६ लाख कोटींची उलाढाल?
12
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
14
'कार्तिकी' यात्रेसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या, भाविकांसाठी मध्य रेल्वेचे नियोजन
15
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
16
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
17
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
18
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
19
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
20
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल

स्वप्नाच्या दिशेनं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 4:34 PM

नाशिक सोडून मुंबईत गेलो, डॉक्टर झालो. कॅन्सरचा स्पेशालिस्ट डॉक्टर या प्रवासानं बरंच शिकवलं.

-डॉ. रोशनकुमार पाटील

मी अभिनव बालविकास मंदिर, नाशिक येथे मराठी माध्यमातून शिक्षण घेत होतो. इयत्ता चौथी म्हणजे स्कॉलरशिप. माझी तब्येत साधारण. स्कॉलरशिपच्या अभ्यासाचे ओझे पेलवले जाणार नाही म्हणून या परीक्षेला बसू द्यायचे नाही, असा आईचा अट्टाहास. पण अभिनव बालविकास शाळेचे तांदळेसर यांनी मला स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसवण्याबद्दल आई-वडिलांची समजूत घातली. मला परीक्षेला बसवले गेले. या परीक्षेअगोदर सावित्रीबाई फुले म्हणून रुंग्ठा हायस्कूलला परीक्षा होती, तिचे स्वरूप स्कॉलरशिपच्या परीक्षेसारखेच असल्याने पूर्वतयारी म्हणून ही परीक्षा घेतली जायची. ती परीक्षाही मी दिली. परीक्षेच्या निकालाची तारीख दिली गेली. त्या दिवशी मी माझे आई-वडील असे रुंग्ठा हायस्कूलला गेलो. तेथे निकाल ऐकण्यासाठी बरीच गर्दी. कोणी चारचाकी, कोणी दुचाकीवर आलेले. आम्ही या गर्दीत हरवून गेलो. आपला नंबर वैगेर नसणार म्हणून शेवटी एका कोपºयात स्थिरावलो. शेवटी निकाल जाहीर झाला. माझा पहिला नंबर आला होता. आम्हाला स्टेजवर बोलावले गेले. सत्कार समारंभ पार पडला. त्यावेळचा तो क्षण आम्ही कदापिही विसरू शकणार नाही. पुढे स्कॉलरशिपची मुख्य परीक्षा झाली. निकालाच्या दिवशी पहाटे वडिलांना दूरध्वनी आला की रोशन जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. सर्वांना आनंद झाला. त्यावेळी मात्र आई-वडिलांची खात्री झाली की हा शिक्षणात मागे नाही. पुढेही वर्गात पहिला येण्याचा मान मी सोडला नाही.

मी एनटीएस नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षेला उत्तीर्ण होऊन स्कॉलरशिपला पात्र ठरलेलो होतोच. मला सीईटी या परीक्षेला चांगले गुण प्राप्त झाल्याने मला कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणार होता. मी माझ्या निर्णयाने मुंबईमधील केईएम या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. नाशिक सोडून मुंबई गाठली. पदव्युत्तर शिक्षणासाठी मी नाशिक शहरातील सर्व नामांकित डॉक्टरांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यात डॉ. राज नगरकर यांनीही मला चांगले मार्गदर्शन केलं. मी एम.डी. या पदव्युत्तर शिक्षणासाठी टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई येथे प्रवेश घेतला. कॅन्सर या रोगावर अभ्यास करू लागलो. आज मितीस मी तीन वर्षे कालावधीचे कॅन्सर या रोगावर शिक्षण घेऊन रेडियशन अ‍ॅन्कोलॉजी या विषयात एम.डी. झालोय.

एक प्रसंग सांगतो, साधारण ५ ते ६ महिन्यापूर्वी जोडून सुट्टी होती म्हणून मी एकदा आई-वडिलांना भेटण्यासाठी नाशिकला यायचं ठरवलं. तिकीट आरक्षित करून ठेवलं. बॅग घेऊन टाटा हॉस्पिटलमध्ये आलो. तोच एक माता तिच्या मुलाला घेऊन टाटा हॉस्पिटलमध्ये आली. मी तिच्या मुलाची परिस्थिती जवळून पाहिली. त्याला तत्काल उपचारांची गरज होती. नाशिकचं तिकीट रद्द केलं आणि कामाला लागलो.स्थलांतराच्या या प्रवासात असे कर्तव्याचे क्षण जागोजागी भेटले. माझे आई-वडील, बहिण डॉ. धनश्री, डॉ. भाग्यश्री सोबत होतेच. आमच्या घराण्यात कोणीही डॉक्टर नसताना मला माझ्या वडिलांनी त्यांच्या लेखनिक या पेशात न अडकवता मला डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू दिलं..

त्या प्रवासाचा आनंद आहे.