शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
4
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
5
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
6
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
7
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
8
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
9
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
10
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
11
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
12
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
13
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
14
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
15
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
16
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
17
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
18
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान
19
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
20
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

ट्रॅप

By admin | Published: April 02, 2015 6:21 PM

भरघोस पगार, राहाण्याची विनामूल्य सोय. सोन्यासारखी संधी दवडू नका, त्वरा करा,

-  रवींद्र राऊळ
विदेशात नोकरी
भरघोस पगार, राहाण्याची विनामूल्य सोय.
सोन्यासारखी संधी दवडू नका, त्वरा करा,   
विमानप्रवासाच्या तयारीला लागा..
अशा आशयाच्या जाहिराती अधूनमधून नजरेस पडतात तेव्हा आकाश कवेत घ्यायची आकांक्षा बाळगणारा युवावर्ग हरखून जातो. रोटी, कपडा और मकान या आयुष्याच्या गरजा भागवण्यासाठी नोकरी तर पाहिजेच. त्यात ती विदेशात असेल, तर सोने पे सुहागा. चपला झिजवूनही गावात नोकरी मिळाली नाही की वाटू लागतं चला, आपल्या हुशारीचं भारतात काही चीज नाही. मग परदेशातील नोकरीची स्वप्नं पडू लागतात. पाच- दहा वर्षे विदेशात नोकरी करू आणि मगइथे परतून काहीतरी उद्योगधंदा करू, असे विचार मनात येऊ लागतात. अशी स्वप्ने पाहणारा तरुणवर्ग काही थोडथोडका नाही. हाच वर्ग टॅप करून त्यांना आपल्या जाळ्यात अडकवणारे दबा धरून असतात. शंभर कोटी लोकसंख्येच्या आणि तरुण बेरोजगारी बरीच असलेल्या भारतात विदेशी नोकरीची स्वप्नं पाहणार्‍या तरुणांची कमतरता नाहीच.
त्यात काही असेही की, ज्यांना हा देश भुक्कड वाटतो. विदेशात गेल्याशिवाय आपल्या गुणवत्तेचं चीज होऊच शकत नाही, अशी ठाम खात्री. त्यासाठी मग पैसे भरून का होईना त्यांना विदेशात नोकरीसाठी जायचंच असतं! अशा अति आतुरांना गंडवून आपलं उखळ पांढरं करण्याच्या एका फार मोठय़ा गोरखधंद्याचं जाळं जगभरात पसरलंय. (फ्लेश ( चामडी-देहव्यापार), ड्रग्स ( अमली पदार्थ) आणि वेपन (शस्त्रास्त्र) मार्केटनंतर बहुदा या जॉब रॅकेटचाच नंबर लागत असावा.
ओव्हरसीज जॉबच्या शोधात असलेल्या तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी पावलापावलावर सापळे अडकवलेले असतात. हायली क्वालिफाइड तरुण सहसा अशा आमिषांना भुलत नाही. भुलली तरी सावधगिरी बाळगतात. म्हणूनच बहुतेकदा अनस्कील्ड तरुणच यासार्‍याचं टार्गेट ठरतात. कौशल्य, अनुभव नसला तरी विदेशात टर्नर, फिटर, वेल्डर, मशीन ऑपरेटर इथपासून वेटर, हेल्परची नोकरी मिळवून देऊ अशी आमिषं दाखवत ही गिर्‍हाईकं जाळ्यात अडकवली जातात. ही गिर्‍हाईकं गाठायचे मार्गही वेगवेगळे. कधी कुणाला बसल्याजागी विदेशात नोकरी देण्याचे ई-मेल येतात. कधी पेपरात जाहिराती वाचायला मिळतात, कधी रेल्वेडब्यात, बसस्टॉपवर पोस्टर डकवलेली दिसतात, तर कधी अचानक थेट मोबाइलवर कुठल्यातरी मुलीचा कॉल येतो आणि फॉरेन जॉब हवाय का, असा सवाल केला जातो.  आणि अनेकदा तर कुणी ओळखीचाच सांगतो, की तमक्याला भेट, विदेशात जॉबचं काम होऊन जाईल!
जॉब रॅकेटमध्ये पकडलेल्या एका आरोपीने तर कमाल केली होती. मंजुळ आवाजात बोलणार्‍या सहा मुलींना त्याने टेलिफोन ऑपरेटर म्हणून आपल्या कार्यालयात कामाला ठेवलं होतं. मोबाइल नंबरची लिस्ट घेऊन त्या सर्वांना फोन करत. विदेशात नोकरी हवी असेल तर आपल्या प्लेसमेंट कंपनीच्या बँकखात्यात पाच हजारांपासून पंचवीस हजारांपर्यंत तोंडाला येईल ती रक्कम त्या जमा करायला सांगत. इतक्या गोड आणि प्रोफेशनली बोलत की, समोरच्याला संशयही येऊ नये. त्यात गरजवंताला अक्कल नसते म्हणतात. दररोज पाच-सहा तरी मासे त्यांच्या गळाला लागत. रक्कम जमा झाल्यानंतर महिन्याभरात तुम्हाला विदेशी नोकरीचं ऑफरलेटर मिळेल, असं सांगण्यात यायचं. संपर्क बहुदा फोनवरूनच असे. पैसे भरले की काही दिवस वेगवेगळी कारणं सांगून तंगवत ठेवलं जाई आणि नंतर तो फोनच आउट ऑफ सर्व्हिस होई. तब्बल ४ हजार जणांना गंडवल्यानंतरच ते टोळकं पोलिसांच्या जाळ्यात सापडलं. 
हे असं रितसर ऑफिस थाटून ओव्हरसीज जॉबचं रॅकेट चालवणार्‍यांची बातच वेगळी. चार-सहा महिन्यांसाठी कुठं तरी कार्यालय भाड्याने घ्यायचं. वर्तमानपत्रात आकर्षक जाहिराती द्यायच्या आणि कार्यालयाबाहेर उमेदवारांची रांग लागली की खोर्‍याने पैसे ओढायचे. उमेदवारांची खात्री पटावी यासाठी त्यांचे पासपोर्ट डिटेल्स घ्यायचे, व्हिसासाठी अर्ज भरून घ्यायचा. बर्‍यापैकी पैसे जमा झाले की एक दिवस कार्यालयाचं शटर डाउन करून पळून जायचं, हा तर अत्यंत कॉमन प्रकार. एका ठिकाणचं दुकान बंद केलं की दुसर्‍याच दिवशी कुठल्यातरी दुसर्‍या शहरात कार्यालय भाड्यानं घेऊन पुन्हा टोपी लगाव सुरूच. पकडले गेले तरी सुटल्यावर पुन्हा तोच प्रकार. केवळ एकाच राज्यात नाही तर वेगवेगळ्या राज्यात गरजू तरुणांच्या शोधात फिरणार्‍या हॅबिच्युअल जॉब रॅकेटअर्सच्या आंतरराज्यीय टोळ्या काही कमी नाहीत. 
याशिवाय मोठं आणि धोकादायक रॅकेट असतं इंटरनॅशनल टोळ्यांचं. जगाच्या पाठीवरील कुठल्या तरी देशात बसून त्यांचे हे उद्योग इंटरनेटवरून चालतात. देशोदेशीच्या बेकार, विदेशी नोकरीच्या शोधात असलेले तरुण हे यांचं हमखास गिर्‍हाईक. थेट कुणालाही नामांकित मल्टीनॅशनल कंपनीच्या नावाने ऑफर देणारा बनावट ई-मेल पाठवायचा. यासाठी बड्या कंपन्यांच्या नावाशी साधम्र्य असलेल्या बनावट वेबसाइटही तयार करून ई-मेलमध्ये त्या वेबसाइटचा हवाला बेमालून द्यायचा. लोगोही असे बनवायचे की, फरक कुणा तज्ज्ञालाही पटकन समजू नये. या नामसाधम्र्यामुळे भोळ्याभाबड्या उमेदवारांची भलतीच फसगत होते. एकदा का उमेदवार जाळ्यात अडकला की एकमेकांना रिप्लाय सुरू. दोन-तीन मेलनंतर हळूहळू रकमेची मागणी. एकदा पैसे भरले की ते वाया जाऊ नयेत म्हणून उमेदवार पुढच्या मागण्याही मान्य करीत बर्‍यापैकी अडकत जातो. भरभक्कम रक्कम मिळाली की अगदी बनावट अपॉइंटमेण्ट लेटरही ई-मेलने पाठवलं जातं. एव्हाना विश्‍वास बसलेला उमेदवार घायकुतीला येऊन मग व्हिसासाठीही रक्कम भरतो. बनावट लॉटरी रॅकेट चालवणार्‍या नायजेरियन टोळ्या असे जॉब रॅकेटही चालवत असल्याचं पोलिसांना आढळलं आहे. 
हे सारं कमी, इथे तरी फक्त पैशानं फसवणूक होते; मात्र धोकादायक बाब म्हणजे काही बनावट प्लेसमेंट सर्व्हिसवाले मोठमोठय़ा रकमा घेऊन व्हिसा मिळवून देत थेट विदेशात नोकरीला पाठवूनही देतात. तेथे गेल्यावर खरी बाब उघडकीला येते. अपॉइंटमेण्ट लेटर मिळालेली कंपनी अस्तित्वातच नसते. मग प्रसंगी साफसफाईचं काम करून परतीच्या प्रवासासाठी पैसे गोळा करायची पाळी येते. कसंबसं भारतात परतल्यानंतर प्लेसमेंट कंपनीच गायब झाल्याचं पाहून कपाळावर हात मारून घ्यायची वेळ येते. मागे अशाच एका कंपनीने चक्क टुरीस्ट व्हिसावर दुबईला नेऊन २२ तरुणांना तेथे वार्‍यावर सोडून दिलं होतं.  
हे सारं आपल्याबाबतीत घडू नये, म्हणून खरंतर पहिला सोपा उपाय एकच, भाळून जाऊ नका, फसू नका, खात्री करून घ्या. ई-मेलवरून आपला बायोडाटा सिलेक्ट करून विदेशात हमखास नोकरी देतो म्हणत आपल्याचकडे पैसे मागणार्‍या कंपन्या आणि माणसं खोटी असतात! हे एवढं जरी किमान लक्षात ठेवलं तरी अनेकांची फसगत नक्की टळू शकेल!
 
---
नोकरीच्या फसव्या ऑफर पसरवण्याचे मुख्य माध्यम म्हणजे ई-मेल. एकतर ई-मेल आयडी तयार करायला काहीही पैसा किंवा कागदपत्रे लागत नाहीत. ई-मेल कुठल्याही देशातून पाठवला जाऊ शकतो, त्यामुळे तक्र ार करणे किंवा पाठपुरावा करणं अवघड. पण, अशा ई-मेल ओळखता येऊ शकतात.
१) कोणतीही कंपनी ई-मेल पाठवते तेव्हा तो ई-मेल आयडी त्या कंपनीच्या स्वत:च्या डोमेनवरून आलेला असतो. उदा. abcd@infosys.co  किंवा xyz@ibm.com. फसव्या जॉब ऑफर पाठवणारे साहजिकच कंपनीचा ई-मेल आयडी वापरू शकत नाहीत. त्यामुळे dreamjobz@yahoo.com वरून तुम्हाला टाटा कंपनीमध्ये जॉब ऑफर केला जात असेल, तर त्यात काहीतरी काळंबेरं असण्याचीच शक्यता जास्त.
२) ई-मेल : ज्याला पाठवला आहे, त्याचा ई-मेल आयडी, एखाद्या ई-मेलबद्दल शंका असल्यास त्या ई-मेलमध्ये तो कुणाला पाठवला आहे ते बघा. फसवाफसवीचे ई-मेल तुम्हाला उद्देशून पाठवलेले नसतात. ई-मेलच्या डिटेल्समध्ये To हे फिल्ड चेक करा. फसव्या ई-मेलमध्ये To नंतर रिकामी जागा असते किंवा दुसराच कुठलाही ई-मेल आयडी असतो. त्याशिवाय बर्‍याच फसव्या ई-मेलमध्ये तुमचा ई-मेल आयडी Bcc नंतर लिहिलेला असतो. To नंतर तुमचा ई-मेल आयडी नसेल तर तो सावधान होण्याचा इशारा समजा.
 
३) गूगल सर्च : शंका असल्यास खातरजमा करण्याचा सगळ्यात सोपा आणि परिणामकारक मार्ग म्हणजे गूगल सर्च. फसवणूक करणारी मंडळी एकच ई-मेल किंवा तीच पद्धत हजारो नोकरीच्या शोधात असणार्‍यांसाठी वापरतात. त्यामुळे तुमच्याआधी त्याच प्रकारे फसवले गेलेले किंवा त्याबाबतीत सावध झालेले दुसरे कुणीतरी असण्याची मोठी शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला ई-मेल किंवा फोनवर मिळालेली माहिती जशीच्या तशी गूगलवर सर्च केल्यास त्याबाबतीत अधिक माहिती नक्की मिळते.
- गणेश कुलकर्णी