-अर्चना राणो-बागवान
सहज कट्टय़ावर बसून गप्पा-टप्पा मारताना एखादी भन्नाट कल्पना डोक्यात लखलखावी अगदी तसंच त्या चौघांचं झालं. शॉर्टफिल्म बनवायची का, असा प्रश्न पडला आणि काही मिनिटांत हा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी धडपड सुरू केली. जुळवाजुळव झाली नि गंमत म्हणून त्या चौघांनी एक शॉर्टफिल्म बनवलीही. खरं तर आपण किती पाण्यात आहोत, हे शॉर्टफिल्मचं भूत आपल्याला ङोपेल की नाही हे तपासून पहायचं म्हणून त्यांनी अगदी सहज म्हणून एक प्रयोग केला आणि तो भलताच यशस्वीही ठरला.
शुभम शेवडे, योगेश भट, अक्षय घिमे, अक्षय येलुरीपती.
हे चार मित्र. आकुर्डीतल्या पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे विद्यार्थी. त्यांनी तयार केलेल्या ‘मल्टिपल्स ऑफ अननोन’ या पहिल्या शॉर्टफिल्मची निवड मुंबई विद्यापीठाच्या इंटरनॅशनल शॉर्टफिल्म फेस्टिव्हलसाठी करण्यात आली.
शुभम यासा:या शॉर्टफिल्मचा मास्टरमाइंड. तो इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशनचा शेवटच्या वर्षात शिकतोय. तो सांगतो, ‘‘2क्14 मध्ये शॉर्टफिल्म तयार करण्याच्या विचारानं आम्हाला पछाडलं होतं. शॉर्टफिल्मसाठी बॅनर/प्रॉडक्शन हाऊसचं नामकरण करावं लागणार होतं. म्हणून मग फेबल क्र ाफ्ट नाव ठरलं. फेबल क्र ाफ्ट म्हणजे, स्टोरी विच इज क्र ाफ्टेड विथ युवर ओन क्रिएटिव्हिटी अॅण्ड युनिकनेस. आमची प्रत्येक फिल्म पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी म्हटलंच पाहिजे, अरे ही कन्सेप्ट खरंच आउट ऑफ बॉक्स आहे. याच भावनेनं खरं तर ही शॉर्टफिल्म बनवली. ‘मल्टिपल्स ऑफ अननोन’ हा दारूविषयी जनजागृती करू शकेल, असा हा एक सस्पेन्स ड्रामा होता. फिल्म पूर्ण झाली आणि ही फिल्म मुंबई विद्यापीठाच्या इंटरनॅशनल शॉर्टफिल्म फेस्टिव्हलमध्ये सादर करायचं ठरलं. आणि विशेष म्हणजे फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात येणा:या 22 फिल्ममध्ये आमच्याही फिल्मची निवड झाली, हा आमच्यासाठी आश्चर्याचा धक्काच होता. आमच्या या शॉर्टफिल्मला फेस्टिव्हलमध्ये विशेष पुरस्कारही देण्यात आला. आम्ही बेस्ट नसू; पण दखल घेतली जावी इतपत चांगलं काम आपण करतोय, असा विश्वास त्यामुळे मिळाला. त्यानंतर पुणो शॉर्टफिल्म फेस्टिव्हलमध्येही आमची ही फिल्म दाखवण्यात आली.’’
सुरुवातीला ही चौघंच असलेल्या या टीममध्ये आता मात्न 3क् सदस्यांची भर पडलीय. विशेष म्हणजे अवघ्या काही महिन्यांच्या अवधीत त्यांच्या प्रोडक्शनने द डेरिव्हेटिव्ह, कब तक आणि कालयात्नम या तीन शॉर्टफिल्म्स आणि द साय फाय ट्रिब्यूट हा एक म्युङिाकव्हिडीओ बनवून पूर्ण केलाय. नुकत्याच पार पडलेल्या डीएमसीएस नॅशनल शॉर्टफिल्म फेस्टिव्हल व एमआयएसएफएफ इंटरनॅशनल शॉर्टफिल्म फेस्टिव्हलमध्येही त्यांची ‘कालयात्नम’ ही शॉर्टफिल्म दाखवण्यात आली. सध्या ही मंडळी इंजिनिअर्सच्या आयुष्यातलं चहाचं महत्त्व, आपल्या फिल्मच्या माध्यमातून दाखवण्याच्या प्रयत्नात आहेत. हा विषय जरी साधा सरळ आणि नेहमीचाच वाटत असला तरी तो आउट ऑफ बॉक्सच असेल, असा विश्वास शुभम व्यक्त करतो.