दहावीचा रिझल्ट परवाच लागला. आता पेढेवाटप सोहळ्यांत कुणाकुणाच्या मार्काची चर्चा होणार. जे नापासच झाले त्यांच्या नावानं चिक्कार टिंगल होते आणि ज्यांनी नव्वदी ओलांडली त्यांचं अपार कौतूक!
-या दोन्ही टोकाच्या ‘रिअॅक्शन’ मुलांचं नुकसानच करतात.
कारण ‘वास्तव’ हे यशअपयश आणि मानसन्मान यांच्या मध्ये कुठेतरी असतं, आणि त्याचा हात वेळीच धरला नाही तर मग ऐन सोळावं लागत असताना कायमसाठी जगण्याचा तोल घसरू सकतो.
तो घसरु नये म्हणून या काही खास गप्पा.
ज्यांनी दहावीत टप्पा खाल्ला त्यांच्यासाठी काही खास बात.
आणि ज्यांना ‘अतीच मार्क’ पडले म्हणून स्कॉलर असं लेबल लागलं, त्यांच्यासाठी काही धोक्याचे सिग्नल्सही!
सांगताहेत दिशा कौन्सिलिंग सेण्टरच्या कौन्सिलर करिअर कौन्सिलर समिंदरा हर्डीकर..
दहावीत नापास झालात? -घाबरु नका, हरु नका!
* ‘संपलं सारं!’
नापास झाल्यानंतर मनात येणारा हा पहिला नकारात्मक विचार. तो इतका जोरकस असतो की पुढचं काही दिसतचं नाही. पण धीस इज नॉट द एण्ड ऑफ द वर्ल्ड. नापास झालं म्हणून सारं संपलं असं काही होत नाही, हे एकदा चांगलं ठणकावून आणि मनापासून सांगा स्वत:ला!
* निराश तर वाटणारच, रडूही खूप येणार. इतरांसमोर जाण्याची लाज वाटते, घरातल्या मोठ्यांची भिती वाटते. आपले मित्र मैत्रिणी चांगल्या मार्कानी पास झाले त्यांच्याबद्दल असूयाही वाटते. त्यांच्यासोबत वावरण्याची, बोलण्याची शरम वाटते. हे सारं अत्यंत साहजिक आहे. पण असं स्वत:ला छळून आणि रडून आता आपला प्रश्न सुटणार नाही, हे एकदा मान्य करायला हवं.
* नापास झाल्यानं घरचे रागवणार, ओरडणार, झापणार, ते सारं शांतपणो ऐकून घ्यावं. त्यांचा ओरडा मनाला कितीही बोचत असला, त्याची भीती वाटत असली तरी आपलीच माणसं आपल्याला का बोलता आहेत याचा जरा विचार करावा. त्यांच्या बोलण्याचं, त्या शब्दांचं वाईट वाटून न घेता किंवा त्यामुळे आणखीनच निराश न होता शांतपणो ऐकून घ्या. झाल्या गोष्टींचे परिणाम पचवण्याची ताकद कमवा आणि नम्रपणो मनापासून सांगा की, मी यापुढे अधिक मनापासून प्रय} करीन.
* निराशेचा पहिला जोर ओसरु द्या आण मग शांतपणो विचार करा की आपण नापास का झालो? खरंच काही गोष्टी माङया हाताबाहेर होत्या का? की माङो प्रयत्न नेमके कुठे कमी पडले? मी काय करायला हवं होतं? उत्तर मिळालं तर मार्गही सापडेल!
* नापास होणं ही मोठीच ठोकर. पण अपयश हे आव्हान म्हणून स्वीकारा, आणि लागा कामाला, यश दूर नसतंच, नाहीये हे एकदा मान्य केलं की प्रय} सोपे होतील. अपयश हा अपमान नाही, आपण प्रय} बंद करुन कायमचं हारणं हा अपमान!
* बाकी काही प्रॅक्टिकल गोष्टी तर आहेतच, रिझल्ट मान्य नसेल तर रिचेकिंग किंवा रिव्हॅल्युएशनचा फॉर्म भरा.
* नापास झाल्यामुळे आत्महत्याच करावीशी वाटत असेल, घर सोडून जावंसं वाटत असेल तर चांगलं जागा करा स्वत:ला! असे नकारात्मक विचार तिथेच थांबवा. आपण मेलो तर आपल्या माणसांवर त्याचा काय परिणाम होईल याचा तर विचार करा. आणि सांगा स्वत:ला की, मी अपयशाला पाठ दाखवून पळणार नाही. मी यश कमवीन, सिद्ध करीन स्वत:ला, ते आव्हान जास्त मोठं आहे.
* सगळ्यात महत्वाचं म्हणजे यासा:या मानसिक चढउतारांच्या काळात जवळच्या एखाद्या वडिलधा:या माणसाशी सतत बोला. मन मोकळं करा आणि नव्यानं जिंकण्याची तयारी सुरू करा.
दहावीत नव्वदीचा स्कोअर? -सांभाळा स्वत:ला!
* अपयश पचवणं तुलनेनं सोपं, यश पचवणं अवघड. आणि ते थोडं अनपेक्षित असेल तर पचणं त्याहून महाकठीण.
* अनेकांचं या काळात असं होतं की 8क् टक्कयांची अपेक्षा असते एकदम नव्वदच्या पुढेच मार्क्स मिळतात. आणि हा मुलगा/मुलगी किती हुशार म्हणत सारे कौतूकाचा वर्षाव करतात. आपल्याला एकदम ‘स्कॉलर’ समजायला लागतात.
* अशावेळी पहिले एक गोष्ट करायची, आपल्याला उत्तम यश मिळालं म्हणजे आपण खूप कष्ट केले यासाठी आपणच आपल्याला शाबासकी देऊन टाकायची.
* पण खूप चांगले मार्क मिळाले, आता चांगलं कॉलेज, आवडीची साइड मिळणार म्हणून हुरळून जाऊन स्वत:ला परफेक्ट समजू नये.
* दहावीला चांगले मार्क हा तर करिअरचा पहिला टप्पा, पहिली पायरी. अजून खूप पुढे चालायचं आहे हे स्वत:ला आधी सांगा. कधी कधी याच आणि एवढ्याच यशाशी घुटमळायला होतं. त्याचा परिणाम म्हणजे दहावीत भरघोस मार्क मिळवणा:यांची लेव्हल आणि बारावीत एकदमच घसरते. आणि सीईटीत तर अनेकांच्या मार्काचं दिवाळं निघतं.
* आपण आपल्याच यशात बुडून जाणं हा स्वार्थीपणा झाला. आपल्या सोबतच्या ज्या मित्रंना- मैत्रिणींना परिक्षेत अपयश आलंय किंवा कमी मार्क मिळालेत त्यांच्याशीही आदरानंच वागावं. उडू नये.
* 35, 40, 60. 70. 85. 90. 95. 99 हे मार्क असले तरी शेवटी दोन अंक आहेत. त्या अंकाच्या पल्याड असतं अनेकदा यश अपयश त्यामुळे आपली आवड, आपली माणसं, आपले मित्र हे सारं जपून हे यश पचवा. नव्या तरुण जगण्याच्या वळणावर हा पहिला धडा शिकाच. यश पचवण्याचा!
(शब्दांकन-माधुरी पेठकर)