शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

खोटया स्टेटसचे बळी

By admin | Published: December 24, 2015 5:19 PM

अनेकदा मी माझ्या मित्र-मैत्रिणींना विचारते, तुम्ही दारू का पिता? काहीजण म्हणतात, मज्जा म्हणून! काही म्हणतात, मोठे झालोय म्हणून! आता सांगा, आपल्या मोठं होण्याच्या संकल्पनेचा ‘पिणं’ हा भाग कसा काय असू शकतो?

 

 - मृण्मयी अग्निहोत्री

(मृण्मयी मुंबईत एसएनडीटी विद्यापीठात मानसशास्त्रत एम. ए. करते आहे. पुण्याच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात तिने स्वयंसेवक म्हणून काम केलं आहे.)

अनेकदा मी माझ्या मित्र-मैत्रिणींना विचारते,

तुम्ही दारू का पिता? 
काहीजण म्हणतात, मज्जा म्हणून!
 काही म्हणतात, मोठे झालोय म्हणून!
आता सांगा, आपल्या मोठं होण्याच्या संकल्पनेचा
 ‘पिणं’ हा भाग कसा काय असू शकतो?
 
 
 
थर्टीफस्ट म्हणजे सेलिब्रेशन.
नव्या वर्षाचं स्वागत करणा-या,
आणि ‘चार बज गए लेकीन पार्टी अभी बाकी है’
असं म्हणणा:या पाटर्य़ा,
‘बेहोश’ आणि ‘बेदरकार’ही!
दारू पिऊन दंगा, रॅश ड्रायव्हिंग,
त्यामुळे होणारे अपघात
हे सारं दरवर्षीच होतं,
पार्टीमूडच्या नावाखाली!
एकच पेग म्हणत होणारी सुरुवात 
आऊट ऑफ कण्ट्रोल होते
आणि दारूच्या नशेत नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच
जगण्याचा विचका होतो.
तो टाळायचा तर सेलिब्रेशनच्या संकल्पनेतूनच
दारूला बाद करायला हवं असं सांगणारे
तीन मित्रंचे हे लेख.
मृण्मयी, रंजन आणि धवर.
तिघंही तरुण मुलामुलींसाठी व्यसनांसदर्भातल्या
जाणीव-जागृतीचं काम करतात.
ते सांगताहेत,
सेलिब्रेशनच्या नव्या (विना दारू) आरंभाची गोष्ट!!
 
रोजच्या आयुष्यात घडणारे अनेक प्रसंग आपल्याला सतत काहीतरी शिकवत असतात असं अनेक जण म्हणतात. मानसशास्त्रची विद्यार्थिनी असल्याने अनेक प्रसंग माङया मनात कुतूहलदेखील निर्माण करत असतात. 
मी आणि माङो मित्रमैत्रिणी नुकताच एक हिंदी चित्रपट बघून येत होतो. अतिशय सुंदर चित्रपट होता. परंतु सिनेमाच्या सुरु वातीपासून ते शेवटपर्यंत त्यात सहजगत्या दाखवलेला मद्याचा वापर आम्हाला सगळ्यांनाच फार ठळकपणो जाणवून आला. काहींना तो खटकला, तर काहींना त्यात काही फार वावगे वाटले नाही. खूप विचार केल्यावर अशा अनेक गोष्टी माङया आजूबाजूला अगदी सहजपणो मला दिसू लागल्या. परीक्षा झाल्यावरची मित्रमैत्रिणींची पार्टी म्हणजे दारूचा समावेश हवाच. गोव्याला जायचं म्हणजे दारू हवीच. अगदी शहाणा, सरळ, साधा म्हणून ओळख असणा:या मुलाची आयुष्यात काहीतरी करण्याची इच्छा म्हणजेसुद्धा ‘एकदा दारू पिऊन पाहायची आहे राव’ अशीच!  मद्याचा/दारूचा एवढा सहज सोपा वावर आपल्या तरुण मुलांच्या आयुष्यात कधीपासून व्हायला लागला याचा विचार सतत मनात घोळू लागला.
माङया मते तरी सध्या तरुणांना भुरळ घालणा:या तीन अतिशय महत्त्वाच्या गोष्टी अस्तित्वात आहेत. क्रि केट, सिनेमा आणि टीव्ही या तिन्ही माध्यमांनी दारू  आपल्या जीवनाचा किती नैसर्गिक भाग आहे हे आपल्याला अतिशय सोयिस्कर पद्धतीने सतत पटवून दिले आहे. सिनेमाने तर आपल्याला आपण आनंदी असल्यापासून आपण दु:खी असेर्पयत दारू कशी प्रत्येक प्रसंगात महत्त्वाची आहे हे सांगायची एकही संधी सोडल्याचे दिसत नाही. ना कधी  हिरो आनंद झाल्याने कधी ट्रेकिंगला गेल्याचे दिसते, ना कधी दोस्तांशी गप्पा मारत मैफल जमवलेली दिसते. याला अपवाद नक्कीच असतात. परंतु आपल्याकडे सिनेमातील रंगकर्मींचे जे अंधानुकरण असते, त्यामुळे युवकांमध्ये सिलेक्टिव्ह अटेन्शन दिसू लागते. सिलेक्टिव्ह अटेन्शन ही मानसशास्त्रतली अतिशय प्रसिद्ध संज्ञा आहे. आपण फक्त अशाच गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो ज्या आपल्याला सोयिस्कर असतात. अथवा ज्या आपल्याला फायद्याच्या असतात. 
अनेकदा जेव्हा मी माङया मित्र-मैत्रिणींशी बोलते आणि त्यांना किंवा आणखी कुणाला विचारते की ते दारू का पितात तर लोकांना पटकन उत्तर सुचत नाही. काहीजण म्हणतात मज्जा म्हणून, मनाला शांत वाटण्यासाठी अशी अनेक उत्तरं नंतर यायला लागतात. एकदा तर एक जण म्हणाला, मी आता मोठा झालोय म्हणून मी दारू घेतो! मला जरा हसूच आलं. पण आता आपल्या मोठय़ा होण्याच्या संकल्पनेचा ‘पिणं’ हा एक भाग आहे का, असा प्रश्न पडला.
खूपवेळा ना अनेक जण असंही म्हणतात मला की मी कधीकधीच घेतो. मी काही दारु डा नाही. पण आपले हे कधी कधी आपण किती सोयिस्कररीत्या ठरवतो. घटनेची इंटेन्सिटी, फ्रिक्वेन्सी आपणच ठरवत असतो. एकदा तर माझी एक मैत्रीण मला म्हणाली माङया व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणू नकोस. लगेच माझं समुपदेशन वगैरे करू नकोस. हे सारं मी अवतीभोवती पाहते तेव्हा एक आठवण हमखास येते. एकदा डॉ. अभय बंग यांची मुलाखत ऐकत होते. ते सांगत होते, ‘मद्याचा पहिला घोट घ्यायचा का नाही एवढंच आपण ठरवू शकतो. त्यापुढे आपण पितो ते आपले व्यक्तिस्वातंत्र्य असतं हा अतिशय मोठा गैरसमज आहे.’     
व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये मी लहान वयातल्या, जेमतेम वयात आलेल्या कितीजणांना भेटलेय. त्यांच्याशी बोलताना हेच जाणवतं की, या विषयाबद्दलचं अज्ञान, गैरसमजुती यांचा पगडा आहे. नव्या जगण्यातून निर्माण झालेल्या प्रेस्टीज आणि स्टेटसच्या गैरकल्पनाही आहेत आणि सेलिब्रेशनच्या पोकळ संकल्पनाही! एकदाच घेतलेली दारूही आपल्या आयुष्याला कोणत्याही क्षणी विचित्र, कुरूप आणि भयानक वळण घेऊ शकते याचा काही अंदाजच तरुण मुलामुलींना आज नाही.
आणि सोशल ड्रिंकच्या नावाखाली पहिली फसगत इथेच होते आहे.