शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

व्हिज्युअल रेप

By admin | Published: April 10, 2015 1:35 PM

मॉलमधले ट्रायल रुम, जीमचे चेंजिंग रुम, ब्युटी पार्लर, हॉटेल्सचे वॉश रुम, जरा सांभाळा, कुणीतरी पाहतंय तुम्हाला!

हावरट नजरांनी स्त्रीचं शरीर ‘पाहण्याचा’ एक नवा टेकसॅव्ही विकृत प्रकार
 
दस्तुरखुद्द केंद्रीय मंत्र्यांना जर एखाद्या बडय़ा नावाजलेल्या ब्रॅण्डेड शॉपमधे हीडन कॅमेरा आढळत असेल तर आपल्यासारख्यांचं काय, असा पहिला विचार तुमच्याआमच्या मनात आलाच!
तसंही मॉलच्या चेंजिंग रूममध्ये कॅमेरा लावलेला असणं, मोबाईलवर व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरू असणं हे सारं काही आपल्याकडे नवीन नाही. गोव्याच्या कॅमेरा प्रकरणानंतर तर उत्तर भारतात पोलिसांनी सर्वत्र धाडसत्र सुरू केली. अनेक मॉल्समध्ये रेग्युलर चेकिंग सुरू झालं!
हे सारं एकीकडे सुरू असताना आपल्या डोक्यात मात्र भीती पक्की बसते की, आता मॉलमध्ये जाऊन कपडे घेणंही सुरक्षित राहिलेलं नाही!
पण मॉलमधले ट्रायल रुमच कशाला वॉश रुम, हॉटेल्समधले वॉश रुम, ब्युटी पार्लर्स, जीम ही सारी ठिकाणंही तशी धोक्याचीच. कारण या सगळ्या ठिकाणीही कॅमेरे लपवले असल्याच्या अनेक घटना अधूनमधून उघडकीस येतातच!
आपल्या व्यक्तिगत आयुष्यावरचंच खरंतर हे आक्रमण. जे आपल्याला दिसतही नाही. यासगळ्याला एक नवीन शब्द हल्ली वापरला जातो, त्याला म्हणतात, व्हिज्युअल रेप!
म्हणजे प्रत्यक्षात काही घडत नाही पण आपले अत्यंत खासगी क्षण सदेह चित्रित करून कोणीतरी ते चोरून पाहतं, परस्परांना पाहतं, काहीजण तर चक्कं अशा क्लिप्स विकतातही!
भीती अशी की आपल्या संदर्भात असं काही घडलंय हे अनेकदा आपल्याला कळतही नाही. 
त्यामुळेच या ‘व्हिज्युअल रेप’पासून वाचायला हवंत, अशा प्रवृत्तींना खरंतर कायद्यानंही चाप बसायला हवाच, मात्र आपणही सजग रहायला हवं.
मात्र हे करणार कसं?
सतत आपण किती धाकधूक मनात ठेवून वावरणार? शॉपिंग करायचंच नाही का? किती घाबरायचं? कुठेकुठे, कुणाकुणाच्या भीतीनं स्वत:ला घरातच डांबायचं हे सारे प्रश्न डोक्यात थैमान करतातच!
त्यातल्या त्यात सावध राहता येईल आणि आपल्या आपण काही गोष्टींची काळजी घेता येईल अशा काही गोष्टींची ही यादी!
डोळे उघडे ठेवून, अत्यंत सावधपणो वावरणं, आणि सावध राहणं हाच सध्याचा या प्रश्नावरचा उपाय!
 
 
1) आरसा-दोन्ही बाजूने आरपार
फक्त कॅमे:याचीच भीती आहे, असं कुणी सांगितलं. काही ठिकाणी टू वे मिरर लावलेले असतात. म्हणजे काय तर आपल्याला वाटतं हा आरसा आहे, अनेकजणी त्यात आपलं प्रतिबिंब न्याहाळत असतात; मात्र पलीकडच्या माणसाला काचेतून आरपार सगळं दिसत असतं. यापैकी कोणता आरसा खरा, कोणता खोटा हे ओळखणं सोपं नसतंच.
नुस्त्या नजरेनं तर ते नाहीच ओळखू शकत.
फारतर काय आरशाला नख लावून पहा. त्याला फिंगर नेल टेस्ट म्हणतात. जर तुमचं नख आणि आरशातील गॅप प्रतिबिंबातही दिसली तर समजा की तो आरसाच आहे. पण जर तसं प्रतिबिंब दिसलंच नाही, थेट बोटच दिसलं तर समजा की, इथं काहीतरी गडबड आहे.
 
2)मोबाइलला रेंज आहे का?
काही कॅमेरे इतके छोटे असतात. त्यातही या प्रकारात पेन कॅमेरे वापरले जातात. ते सरळ व्हिडीओ शूट करतात. आपला मोबाइल घेऊनच चेंजिंग रुममध्ये जा. तर मोबाइलला नेटवर्कच मिळत नसेल किंवा फोन लागून कट होत असेल तर समजा की, इथं कुठंतरी कॅमेरा आहे. अनेकदा या हिडन कॅमे:यातले फायबर ऑप्टिक्स सिगAल ब्लॉक करतात. त्यामुळेही फोन लागत नाही. त्यामुळे शक्यतो ट्रायल रुममध्ये आपला मोबाइल घेऊन जायचं, रेंज चांगली आहे की नाही हे तपासून पहायचं. जर मॉलमधे रेंज चांगली मिळत असेल फक्त ट्रायल रुममध्येच मिळत नसेल तर धोका आहे, असं समजावं!
 
3) टॉर्च टेस्ट
टू वे मिरर आणि कॅमे:यासाठी एक टॉर्च टेस्टही करता येते. ट्रायल रुम शक्यतो डार्क-अंधा:याच असतात. ट्रायल रुममधला दिवा मालवून टाका. आपल्याला फिटिंग पाहायचंच असेल तर टॉर्च वापरा नाहीतर सरळ बाहेरच्या आरशात येऊन फिटिंग तपासा.
 
4) हॉटेलातले वॉश रुम, ब्यूटिपार्लर - सावध
तशा नेहमीच्याच जागा असतात पण हल्ली तिथंही मोबाइल व्हिडीओ रेकॉर्डर पोहचले आहेत. त्यामुळे अशा जागांत वावरताना सावध रहा. विशेषत: ब्यूटिपार्लरमधेही काळजी घ्या. शक्यतो भरवशाचे पार्लर, आणि सावध नजर हीच आपली खबरदारी!
5) स्वत:वर नियंत्रण
अनेक मुलींना हल्ली विंडो शॉ¨पंगच्या पलीकडे जाऊन शॉपिंग ट्रायलचा नाद लागलेला आहे. म्हणजे काय तर आवडलेले कपडे ट्राय करून पहायचे. फोटो काढायचे नाहीतर सेल्फी आहेतच. आणि मग ते कपडे न घेता बाहेर पडायचं;
मात्र या सा:या नादात आपण अशा व्ंिहज्युअल रेपचा बळी ठरणार नाही ना, हे लक्षातही येत नाही!
तेव्हा सावध रहा.सजग रहा!
- चिन्मय लेले