शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
2
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
3
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
4
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
5
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
6
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
7
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
8
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
9
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
10
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
11
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
12
'पुष्पा 2'नंतर 'पुष्पा 3' येणार की नाही? अल्लू अर्जुनच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळालं उत्तर
13
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
14
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
15
गुरु प्रदोष: ८ राशींना अचानक धनलाभ योग, शुभ घडेल; इच्छापूर्ती, दत्तगुरु-महादेवांची कृपा!
16
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
17
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
18
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
19
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
20
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम

VR भविष्यातलं आभासी वास्तव

By admin | Published: March 04, 2016 11:51 AM

45 अब्ज अमेरिकन डॉलर्सची संपत्ती दान करणारा अतिश्रीमंत, अतिबिझी झुकेरबर्ग एका इव्हेंटला हजेरी लावण्यासाठी थेट युरोपात जातो, तो का? कारण त्याला माहिती आहे, जगण्याचा अनुभव बदलून पैसे कमावण्याची एक ‘आभासी’ संधीच नव्या जगाची भाषा असेल!

बार्सिलोनात दरवर्षी भरणा:या मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये यावर्षी सॅमसंगच्या इव्हेण्टने वेगळीच रंगत आणली. गॅलेक्सी S7 लॉन्चच्या या इव्हेंटमध्ये सॅमसंगने शेकडो उपस्थितांसाठी एक डेमो दिला. तोही चक्क व्हच्यरुअल रिअॅलिटीमध्ये! चित्रपटासाठी थ्रीडी गॉगल असतात तसे शेकडो व्हीआर हेडसेट यासाठी उपस्थितांना दिले गेले होते. आणि डेमोच्या आभासी सत्यामधून बाहेर पडता पडताच  उपस्थितांना स्टेजवर दर्शन झालं ते फेसबुकचा संस्थापक मार्कझुकेरबर्गचं! आता सॅमसंगच्या इव्हेण्टमध्ये मार्क झुकेरबर्गचं काय काम?
 
तुम्हाला माहिती नसेल कदाचित पण फेसबुकने 2014 मध्ये दोन मोठय़ा खरेद्या केल्या. त्यातली एक कंपनी म्हणजे आपलं व्हॉट्सअॅप आणि दुसरी होती ऑक्युलस. व्हॉट्सअॅपने जगातल्या कोटय़वधी मोबाइल युजर्सवर त्यावेळी आधीच गारुड केलं होतं. पण ऑक्युलस हे व्हच्यरुअल  रिअॅलिटीच्या अगदीच नवीन असलेल्या जगातलं  एकमेव नाव ! मोबाइल वर्ल्ड कॉँग्रेसच्या सॅमसंगच्या इव्हेंटमध्ये जे व्हच्यरुअल रिअॅलिटी हेडसेट वापरले होते, गिअर VR त्यांचं नाव, ते या ऑक्युलसने पुरवले होते. खास सॅमसंगसाठी बनवलेल्या या हेडसेटसाठी सॅमसंगच्या S6, S7 किंवा Note 5 यासारखे टॉप रेंज फोन लागतात. म्हणजे हा व्हच्यरुअल रिअॅलिटी प्रकार टॉपच्या फोनमध्ये काम तर करेलच पण ती व्हच्यरुअल रिअॅलिटी आपल्याला खरं वाटण्यासाठी जी कंपनी उपकरणं बनवणार आहे, ती आता झुकेरबर्गच्या मालकीची आहे. म्हणजे आपल्या आयुष्यात फेसबुक, व्हॉट्सअॅपसह हे जे काय नवीन व्हच्यरुअल रिअॅलिटी प्रकरण येऊ घातलं आहे त्याच्यात झुकेरबर्ग आणि कंपनीचा मोठा वाटा तर आहे, पण आपल्या सगळ्या व्हच्यरुअल जगण्याचा कोराचिठ्ठाही आपण त्यांच्या स्वाधीन करत आहोत.
आणि पुढे जे होणार आहे ते अधिक रंजक तर आहे, पण तंत्रज्ञानाचा एक वेगळा आयामही आहे.
 
 
व्हर्च्युअल  रिअॅलिटी म्हणजे काय?
 
घरात बसून सिनेमा थिएटरचा आनंद देणारे टीव्ही सेट्स आणि म्युझिक सिस्टिम्स अस्तित्वात असल्या तरी 360 अंशात सिनेमा बघण्याचा आणि  आपण प्रत्यक्ष सिनेमातील वातावरणातच आहोत याची अनुभूती देणारी यंत्रणा क्चचितच काही ठिकाणी उपलब्ध आहे. व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेट्स वापरून एका नव्याच दुनियेचा अनुभव घेता येऊ शकतो. उदा. बाजीराव-मस्तानी फीव्हरमध्ये असणारी मंडळी प्रत्यक्ष शनिवारवाडय़ाच्या आत उभी राहून 360 अंशात 1735 मध्ये शनिवारवाडा कसा होता, याचा थेट अनुभव घेऊ शकतील. आपण एका वास्तवाचा व्हर्च्युअल अनुभव त्यातून घेऊ शकतो.  
 
 
 
व्हर्च्युअल रिअॅलिटी हे प्रकरण नेमकं काम करतं कसं? 
 
सध्या जे व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेट बाजारात उपलब्ध आहेत ते खरं म्हणजे व्हर्च्युअल रिअॅलिटीचं अगदीच प्राथमिक स्वरूप आहे. आपल्या थ्रीडी चित्रपटांचा थोडा प्रगत अवतार. यात तीन गोष्टी वापरल्या जातात. एक म्हणजे व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेट. यात दोन बायकॉन्वेक्स लेन्सेस वापरून टुडी दृश्यात तिस:या मितीचा म्हणजे खोलीचा (डेप्थचा) आणि स्टिरिओस्कोपीक दृष्टीचा आभास तयार केला जातो. स्टिरिओस्कोपीक दृष्टी म्हणजे आपल्या डाव्या आणि उजव्या डोळ्यांना दोन वेगवेगळी दृश्ये दिसत असतात. आपल्याला जे दिसते ते मेंदूत ही दृश्ये एकत्रित करून तयार झालेली प्रतिमा. 
पण मग हे तर अगदी थ्रीडी चित्रपटासारखंच झालं ना?
अगदी बरोबर. पण व्हच्यरुअल रिअॅलिटीत आणखी एक परिमाण असतं ते म्हणजे तुम्ही थ्रीडी चित्रपटासारखे इथे फक्त प्रेक्षक नसता. त्या आभासी विश्वात तुम्ही नजर फिरवू शकता, वळू शकता, चालू शकता. थोडक्यात हे आभासी विश्व धुंडाळण्याची क्षमता थ्रीडी चित्रपटात नसते. व्हच्यरुअल रिअॅलिटीमध्ये मात्र आपल्याला ती क्षमता मिळते.
हे साध्य करण्यासाठी व्हच्यरुअल रिअॅलिटीच्या संचातील दुसरी गोष्ट वापरली जाते. आपला स्मार्टफोन. आधुनिक स्मार्टफोनमध्ये बरेच आधुनिक सेन्सर बसवलेले असतात. व्हच्यरुअल रिअॅलिटी तयार करण्यासाठी यातले बरेच सेन्सर्स वापरले जातात. 
1) गायरोस्कोप 
बहुतेक हाय एण्ड स्मार्टफोनमध्ये गायरोस्कोप असतो. हा गायरोस्कोप वापरून आपण आपला फोन विमानातल्या किंवा एफवन कारच्या स्टेअरिंगसारखा वापरू शकतो. गायरोस्कोपचा वापर करणारे कार रेसिंग किंवा फ्लाईट सिम्युलेशनचे गेम्स तुम्ही कदाचित खेळलाही असाल.
 
2) अॅक्सेलेरोमीटर. 
आपण एका जागेवर स्थिर आहोत की गतिमान आहोत हे ओळखण्यासाठी अॅक्सेलेरोमीटर वापरला जातो.
 
3) व्हच्यरुअल रिअॅलिटी अॅप्स.
अॅप्स, गेम्स, व्हिडीओ आणि पुढे चालून अगदी संवादसुद्धा. अॅण्ड्रॉईड प्ले स्टोअरवर असंख्य व्हच्यरुअल रिअॅलिटी अॅप्स आणि गेम्स आजही  उपलब्ध आहेत. मात्र या व्हच्यरुअल रिअॅलिटीची पूर्ण अनुभूती घ्यायची असेल तर अर्थातच एक व्हच्यरुअल रिअॅलिटी हेडसेट लागतो. (जे झुकेरबर्गच्या कंपनीनं नुकतेच वापरले.)
 पण सध्या मात्र तुम्ही मोबाइलवर असे अॅप्स इन्स्टॉल करून व्हच्यरुअल रिअॅलिटीचा अंदाज देणारा अनुभव घेऊ शकता. 
अट एकच - तुमचा फोन व्हच्यरुअल रिअॅलिटी कंपॅटिबल असला पाहिजे.
तो असला तर उद्याच्या जगात काय होणार आहे, आणि ही व्हच्यरुअल रिअॅलिटी आपला एक्सपिरीअन्स कसा बदलणार आहे, याचा अनुभव येऊ शकतो.
 
 
- गणोश कुलकर्णी
(लेखक इ499140 या डिजिटल स्ट्रॅटेजी सल्लागार कंपनीचे संस्थापक आहेत.)
 
 
आजच्या घडीलाही बाजारात काही व्हर्च्युअल रिअॅलिटी हॅण्डसेट उपलब्ध आहेत. त्यापैकी काहींची ही ओळख.
 
गुगल कार्डबोर्ड
 
व्हच्यरुअल रिअॅलिटीच्या सद्य स्वरूपात खरे म्हणजे स्मार्टफोनमधल्या सेन्सर्समुळे निम्म्यापेक्षा अधिक काम झालेले आहे. तुम्हाला फक्त लागेल एक बायकॉन्वेक्स लेन्सेस असणारा हेडसेट. गूगलने हीच बाब हेरून गूगल कार्डबोर्ड व्ह्युअर (Cardboard Viewer) आणि गूगल कार्डबोर्ड नावाचे अॅप विकसित केले. कार्डबोर्ड म्हणजे पुठ्ठाच. गूगलचा हा कार्डबोर्ड व्ह्युअर खरोखरीच पुठ्ठय़ाचा बनलेला असतो. फोनच्या मापात बनलेल्या या पुठ्ठय़ाच्या व्ह्युअरमध्ये सर्वात महागडी गोष्ट म्हणजे बायकॉन्व्हेक्स लेन्सेस. अशा दोन लेन्सेसचा संच अगदी 125 ते 150 रुपयांपर्यंत ऑनलाइन मिळतो. गूगल कार्डबोर्ड किट वापरून तुम्ही अगदी घरच्या घरीदेखील हा व्ह्युअर तयार करू शकता. तुमचा कम्पॅटेबल असणारा स्मार्टफोन, गूगल कार्डबोर्ड अॅप आणि व्ह्युअर असले की झाले. आपण आभासी दुनियेत सफर करायला मोकळे.
 
गिअर व्हीआर 
 
सॅमसंग गिअर व्हीआर आणि नुकतेच लॉन्च झालेले HTC Vive आणि LG G3 हे व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेट गूगल कार्डबोर्ड व्ह्युअरच्याच तत्त्वावर काम करतात. पण ते अधिक पॉलिश्ड असलेले आणि महागडेही आहेत. 
 
गूगल कार्डबोर्ड व्ह्युअरवर आधारित व्हच्यरुअल रिअॅलिटी हेडसेट तुम्हाला अगदी 200 ते 250 रुपयांपर्यंत अॅमेझॉनवरून विकत घेता येईल. फक्त तो विकत घेण्याआधी फोनची कंपॅटीबिलिटी तपासावी लागते. अॅमेझॉनवर सारख्या एखाद्या साइटवर जाऊन तुम्ही प्रश्न विचारू शकता किंवा दुस:यांनी विचारलेल्या शंका आणि त्याला मिळालेली उत्तरे पाहूनदेखील तुम्ही तुमच्या फोनची कंपॅटीबिलिटी तपासू शकता.
काही दिवसात 8 ते 9 हजारात हे गिअर भारतात मिळू लागतील. त्यामुळे हे नवं जग आपल्यापासूनही फारसं दूर उरलेलं नाही.
 
 
 
ऑक्युलस रिफ्ट
 
ऑक्युलस रिफ्ट ही एक परिपूर्ण व्हर्च्युअल रिअॅलिटी एण्टरटेनमेण्ट सिस्टीम आहे. यात गूगल कार्डबोर्डप्रमाणो स्मार्टफोनची गरज नसते. यासाठी एक कंपॅटिबल कॉन्फिग्युरेशन असलेला पीसी मात्र लागतो. या पीसीमधून ऊटक केबल वापरून व्हच्यरुअल रिअॅलिटी ऑडिओ-व्हिडीओ ऑक्युलस रिफ्ट हेडसेटवर स्ट्रीम केला जातो. ऑक्युलस रिफ्ट हेडसेटमध्ये स्क्रीन, इअरफोन्स आणि आभासी परिणामासाठी लागणारे सेन्सर्स असतात. त्याशिवाय प्लेस्टेशनमध्ये असतो तसा एक गेम कंट्रोलर आणि एक मोशन सेन्सर आहे.
ऑक्युलस रिफ्ट भारतात अजून लॉन्च झालेला नाही. पण परदेशात मात्र तो साधारण 4क् हजारांच्या आसपास उपलब्ध आहे.
 
 
झुकेरबर्गचा या रिअॅलिटीशी संबंध काय?
 
आता आपण मूळ प्रश्नाकडे वळूया. 
45 अब्ज अमेरिकन डॉलर्सची संपत्ती दान करणारा हा अतिश्रीमंत, अति-बिझी माणूस या इव्हेंटला का हजेरी लावतो?
आणि आवर्जून युरोपात त्यासाठी जातो म्हणजे त्याच्या व्यवसायासाठी या व्हच्यरुअल रिअॅलिटीचं मोल किती असेल याचा विचार करा. 
सर्वसामान्य माणूस ज्याची कल्पना करू शकत नाही ते तंत्रज्ञान फेसबुक, अॅपल, गूगल यासारख्या कंपन्या विकसित करत काही अफलातून गोष्टी करतात. त्यानं जग, माणसांचा अनुभव तर बदलतोच पण ते स्वत: डोळे फिरतील एवढा अमाप पैसा कमवतात.
अॅपलने 2007 मध्ये आयफोन आणला आणि जग बदलवून टाकले. आजतागायत तब्बल 82 कोटी आयफोन्स अॅपलने विकले आहेत. 2004 मध्ये सुरू झालेल्या फेसबुकला तब्बल दीड अब्ज युजर्स महिन्यातून किमान एकदा तरी भेट देतात. गूगल तर इंटरनेटच्या महाजालाचे जणू प्रवेशद्वारच. अशा सगळ्या महारथी कंपन्यांना पुढची 10-20 वर्षे आपले साम्राज्य शाबूत ठेवायचे असेल तर जगातल्या जास्तीत जास्त लोकांर्पयत पोहोचू शकेल अशा क्रांतिकारी प्रॉडक्टची गरज आहे. व्हच्यरुअल रिअॅलिटीमध्ये जगभरातल्या तुमच्या-माझ्यासारख्या सामान्यांना अविश्वसनीय अशा मनोरंजनाची चटक लावायची क्षमता तर आहेच; पण ज्या पद्धतीनं आज आपण संवाद साधतो, माहितीची देवाणघेवाण करतो त्यात क्रांतिकारक बदल घडवायचीदेखील क्षमता आहे.
म्हणून तर भविष्य हे आभासी आहे.