शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

यशस्वी व्हायचंय? मागे हटू नका!

By अमेय गोगटे | Published: September 28, 2018 5:09 PM

‘मी एकच सांगेन, ध्येय निश्चित असेल, मेहनतीची तयारी असेल तर कुणालाही घाबरू नका आणि सगळ्यांना सोबत घेऊनच पुढे जाता येतं, हे लक्षात ठेवा! मग यश दूर नाही.’ बालाजी वेफर्सचे संचालक चंदूभाई विरानी यांचा तरुणांना यशाचा मंत्र

ठळक मुद्देमन स्वच्छ असलं की यश मिळतंच

- अमेय गोगटे

आपल्याला सगळ्यांना शेतकर्‍याच्या चार मुलांची ‘एकीचे बळ’ ही गोष्ट माहीत आहे. लहानपणी ऐकलीये की, कसे चारही भाऊ एकत्र येतात आणि त्यातून उत्तम शेत पिकवतात. पण, ही बोधकथा ऐकत मोठय़ा झालेल्या शेतकर्‍याच्या तीन मुलांची यशोगाथा आजच्या स्टार्ट-अपच्या काळातल्या तरु णांनाही नक्कीच प्रेरणादायी ठरू शकते. थिएटरमध्ये वेफर्स विकणार्‍या तीन भावांनी स्वतर्‍ची वेफर्स कंपनी सुरू केली आणि 20 हजार रुपयांच्या भांडवलावर सुरू झालेला प्रवास आज 1800 कोटी रुपयांच्या ‘टर्न ओव्हर’र्पयत पोहोचलाय. 

जिद्द, चिकाटी, मेहनत आणि अर्थातच एकीचं बळ. या सार्‍याची ही एक कल्पक आणि अत्यंत प्रेरणादायी गोष्ट आहे.

वेफर्स तर आपण सगळेच खातो. त्यातही अत्यंत ओळखीचा ब्रॅण्ड म्हणजे बालाजी वेफर्स. रेल्वे स्टेशनांवरील स्टॉल्सपासून सुपर मार्केट्सपर्यंत आणि आपल्या घरापासून ते मनार्पयत बालाजीच्या उत्पादनांनी हक्काचं स्थान मिळवलंय. ग्राहकांना जे द्यायचं ते उत्तम दर्जाचं आणि रास्त किमतीत, हे तत्त्व ठरवून भिकूभाई, चंदूभाई आणि कनूभाई विरानी या त्रिकुटाने राजकोटमध्ये ‘बालाजी’चं बीज रोवलं होतं. त्याचा आज वटवृक्ष झाला आहे. या वाटचालीमागची गोष्ट चंदूभाईंकडून ऐकताना विरानी कुटुंबाची तपश्चर्या सहज जाणवते.

गुजरातच्या जामनगर जिल्ह्यातील धुन धोराजी हे विरानी कुटुंबाचं मूळ गाव. शेती हा पूर्वापार चालत आलेला व्यवसाय. पण, दुष्काळाचे ढग कायमच दाटलेले. ही अनिश्चितता दरवर्षी वाढतच चालल्याचं पाहून पोपटभाई विरानी यांनी आपली जमीन विकली आणि तीन मुलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी 20 हजार रु पये दिले. शेती बघतच मोठय़ा झालेल्या तिघा भावंडांनी खतांचा व्यवसाय सुरू केला. पण, तो निर्णय साफ चुकला. तिथेही दुष्काळाची दृष्ट लागली. आता गाव सोडून बाहेर पडणं अपरिहार्य होतं. भिकूभाई, चंदूभाई आणि  कनूभाईंनी राजकोट गाठलं. एका बोर्डिग मेसमध्ये कामाला लागले. साधारण दोन वर्षानंतर त्यांना अ‍ॅस्ट्रॉन थिएटरमध्ये नोकरी मिळाली. तिथेही पडेल ते काम त्यांनी अगदी इमाने-इतबारे केलं. त्याचं त्यांना मोठं बक्षीस मिळालं. थिएटर मालकाने त्यांना नफ्यातील वाटा दिला आणि कॅन्टीन चालवण्याची जबाबदारी सोपवली. तिथे ग्राहकांना वेफर्स विकताना त्यांना या व्यवसायाची अगदी खडान् खडा माहिती झाली. त्यामुळे तयार वेफर्स आणून विकणारे भाऊ स्वतर्‍च वेफर्स तयार करू लागले आणि थिएटरमधील बालाजीच्या आशीर्वादाने 1994 साली बालाजी वेफर्स कंपनीची मुहूर्तमेढ रोवली गेली.

चंदूभाई सांगतात, ‘आधी आम्ही आमचे वेफर्स फक्त थिएटरमध्ये विकत होतो. हळूहळू ते राजकोट शहरात आणि आसपासच्या गावांमध्येही जाऊ लागले. ग्राहकांना एकेक पॅकेट विकलेलं असल्यानं त्यांना नेमकं काय हवं असतं, हे आम्हाला ठाऊक होतं. पण, सिम्बा वेफर्स, हॅलो, अंकल चिप्स यांसारख्या अनेक कंपन्या बाजारात होत्या. त्यांच्यापेक्षा वेगळं आणि चांगलं देऊन ‘बालाजी’बद्दल विश्वास निर्माण केल्यानंच आज चार दशकांहून अधिक काळ आम्ही बाजारात टिकून आहोत!’

अर्थात ते सांगतात तेवढा हा प्रवास सोपा नव्हताच. पहिली 20 वर्षे खूप कठीण होती. कारण, पॅकबंद पदार्थावर ग्राहकांचा विश्वास नसायचा. कधी पॅक केलं असेल, कसं बनवलं असेल, ही भीती सगळ्यांनाच असायची. त्याकाळी बाहेरचं खाण्यासही फार पसंती नव्हती. मात्र तरी वेफर्सची ही चटकदार वाटचाल कशी जमवली असं विचारलं तर चंदूभाई सांगतात, ‘हळूहळू लोकांची मानसिकता बदलली, चवी बदलल्या आणि आम्ही पोटातून त्यांच्या मनात घर केलं. राजकोट, वलसाड आणि इंदूरमध्ये आज बालाजीचे मोठे प्लाण्ट आहेत. त्यात पाच हजार कर्मचारी काम करतात. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधील शेतकरीही ‘बालाजी’शी जोडलेले आहेत. हे नातं फक्त व्यावसायिक नसून कौटुंबिक आहे ! विश्वास वाढत गेला.’   आज वेफर्ससोबत बच्चेकंपनीसाठी व्हील्स, पॉप रिंग्स, तरुणांसाठी पिझ्झी मसाला, चटका पटकासारखे चटकदार पदार्थ, तर कुटुंबासाठी शेव, फरसाण, मसाला शेंगदाणे, मूग डाळ अशी अनेक उत्पादनं बालाजी तयार करतं. तिघं भाऊ आणि आता त्यांची पुढची पिढी हातात हात घालून हा व्यवसाय सांभाळतेय. व्यक्ती तितक्या प्रकृती असल्यानं सगळ्यांना सोबत घेऊन काम करत रहायचं असतं. काही मतभेद असले तरी ते किती ताणायचं हे आपल्याला समजलं पाहिजे. जे असेल ते समोरासमोर बसून सोडवलं की मनात राग राहत नाही आणि मन स्वच्छ असलं की यश मिळतंच, असा मंत्र   चंदूभाई देतात. 

नव्यानं व्यवसाय करू पाहणार्‍या धडपड्या तरुणांना काय सांगाल असं विचारलं तर चंदूभाई म्हणतात, ‘मी एकच सांगेन, ध्येय निश्चित असेल, मेहनतीची तयारी असेल तर मागे हटू नका. कुणालाही घाबरू नका आणि सगळ्यांना सोबत घेऊनच पुढे जाता येतं, हे लक्षात ठेवा ! मग यश दूर नाही.’