शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
3
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
4
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
5
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
6
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
7
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
8
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
9
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
10
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
11
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
12
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
13
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
14
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
15
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
16
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
17
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
18
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
19
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
20
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

मुंबई बुलेट ही फिल्म पाहिली का?

By madhuri.pethkar | Published: July 26, 2018 4:00 PM

मुंबईत फुटपाथवर राहणारे दोघे. एकमेकांच्या प्रेमात. नजरेत असंख्य स्वप्न; पण वास्तव मात्र कठोर. एक दिवस ती त्याला ‘बुलेट’चं स्वप्न सांगते.

ठळक मुद्दे मुंबई बुलेट या आपल्या शॉर्ट फिल्ममधून चिन्मयने साडेपाच मिनिटांत त्याला सुचलेली कल्पना मांडलेली आहे.

- माधुरी पेठकर

मुंबई म्हणजे स्वप्नांचं शहर. जो तो आपापली स्वप्नं घेऊन मुंबईत येतो. स्वप्नांसाठी धावतो. धडपडतो. कोलमडतो  आणि परत उठतो. मुंबईत कोटय़धीश उद्योगपतीचं जसं एक स्वप्न असतं तसं मुंबईच्या फुटपाथवर, मोठमोठय़ा झोपडवस्तीतल्या इटुकल्या-पिटुकल्या खुराडय़ांत राहणार्‍या माणसांचंही स्वप्न असतं. काहींची स्वप्नं पूर्ण होतात तर काहींची नाही. स्वप्नं सगळ्यांनी बघण्याची आणि त्यासाठी धडपडण्याची स्पेस ही मुंबईनगरी देतं. ‘मुंबई बुलेट’ या शॉर्ट फिल्ममधल्या राकेश आणि पिंकी यांचंही एक स्वप्न आहे. ही दोघं एकमेकांच्या प्रेमात आहेत.  मुंबईतल्या फुटपाथवर राहणारी, तिथेच काम करणारी ही दोघं. उत्तर गुजरातमधून जगायला मुंबईत आलेत. एकमेकांशी शिवराळ भाषेत बोलतात. भांडतात, एकमेकांना मारतात तरीही एकमेकांवर प्रेम करतात.फिल्म सुरू होते तेव्हा दोघंही एकमेकांच्या जवळ बसलेली दिसतात. राकेश पिंकीच्या जवळ बसण्याच्या संधीचा फायदा उठवण्याच्या बेतात असतो. आणि पिंकी तिच्या स्वप्नात हरवलेली. राकेशच्या स्पर्शानं ती भानावर येते. पण त्या स्पर्शानं तिची चिडचिडच होते. राकेशला पिंकीशी शारीरिक जवळीक साधायची इच्छा असते आणि पिंकी मात्र रस्त्यावर बुलेटवर फिरणार्‍या जोडप्यांचा आनंद बघण्यात  हरवलेली असते. तिच्या मनात बुलेटचं स्वप्न धावत असतं. राकेश तिच्या स्वप्नातल्या बुलेटला ब्रेक लावतो आणि पिंकीची सटकते. ती राकेशला झिडकारते. आधी माझ्यासाठी बुलेट आण आणि मग मला हात लाव अशी काहीशी विचित्र अट घालते. अर्थात पिंकीचा तो क्षणिक त्रागा असावा. न झेपणारी स्वप्नं पाहण्यातून येणारा त्रागा. पिंकीचा तो त्रागा राकेश फारच मनावर घेतो आणि एका संध्याकाळी थेट पिंकीसमोर बुलेट उभी करतो.

पाच मिनिटांच्या राइडमधून स्वप्नांची  बोचरी बाजू हलक्या फुलक्या उपहासातून चिन्मय दळवी लिखित व दिग्दर्शित ‘मुंबई बुलेट’ही फिल्म दाखवते. चिन्मय हा मूळचा मुंबईचा. परळमध्ये राहणार्‍या चिन्मयने मुंबई अनेक अंगांनी अनुभवली आहे. एका जाहिरातीच्या प्रोजेक्टदरम्यान त्याची ओळख मुंबईमधल्या फुटपाथवर राहणार्‍या, उत्तर गुजरातेतून आलेल्या एका समूहाशी झाली. दादरच्या कबूतरखान्याजवळच्या शाळेच्या फुटपाथवर आणि भायखळ्यातल्या झोपडवस्तीत राहतात. कामानिमित्तानं चिन्मयची या लोकांशी ओळख झाली. एकदा रात्री चिन्मयला एक दृश्य दिसतं. एक तरुण दिसतो. तो ऐटीत बुलेटवर येतो. आणि आपल्या मैत्रिणीला जोरात हाक मारून जवळ बोलावतो. आणि बुलेटवर फिरायला घेऊन जातो. प्रसंग इतकाच. पण, चिन्मयच्या मनात एक बुलेटची गोष्ट जन्म घेते. मुंबई बुलेट ही शॉर्ट फिल्म गुजराथी भाषेतील आहे. पण चिन्मयला काही गुजराथी येत नव्हती. पण आपली कथा याच भाषेत चांगली व्यक्त होईल हा त्याला विश्वास होता. मग त्याने गुजरातमधील आपल्या मित्राची मदत घेतली. मित्राने गुजराथी नाटकात काम करणार्‍या कलाकारांची गाठ घालून दिली. या कलाकारांनी फक्त अ‍ॅक्टिंगच केली नाही तर फिल्मच्या संवादांना उत्तर गुजरातमधल्या बोलीभाषेचा लहेजा देण्यासाठीही मदत केली. मुंबई बुलेटमधील राकेश आणि पिंकी अ‍ॅक्टिंग करता आहेत असं अजिबात वाटत नाही. जगण्यातल्या खस्तांनी वागण्या- बोलण्यात  आलेला कडवटपणा, रस्त्यावर जगताना दिसण्यात-राहण्यात आलेला  मळकटपणा आणि वागण्या-बोलण्यात दिसणारा रांगडेपणा या दोघांनी छान दाखवला आहे. एकवेळ तर शूटिंगदरम्यान स्वतर्‍ चिन्मयलाही पिंकी ओळ्खू आली नाही. दोन शॉटच्या अवकाशात पिंकी रस्त्यावरच्या त्या लोकांमध्ये जाऊन बसल्यावर चिन्मयला त्या लोकांमधून आपल्या फिल्ममधली पिंकी ओळखणं कठीण झालं होतं. चिन्मयला ही फिल्म जास्तीत जास्त वास्तवाच्या जवळ नेऊन ठेवायची होती. त्यासाठी चिन्मयसह त्यातल्या कलाकारांनीही प्रयत्न केलेले या फिल्ममधून दिसून येतं. चिन्मय इंजिनिअर पण फिल्ममेकिंगची आवड असलेला तरुण. मुंबई बुलेट या आपल्या शॉर्ट फिल्ममधून चिन्मयने साडेपाच मिनिटांत त्याला सुचलेली कल्पना मांडलेली आहे. चिन्मयच्या मते कोणतीही कल्पना तिचा फॉर्म घेऊनच जन्माला येते. तो फॉर्म दिग्दर्शकाला नीट ओळखता आला की त्यानं केलेली फिल्म प्रभावी होते, मग ती लॉँग लेन्थ फिल्म असो की शॉर्ट फिल्म. 

 ‘मुंबई बुलेट’ ही फिल्म पाहण्यासाठी ही लिंक

https://vimeo.com/142521283