दहावीच्या काही मुलांना भेटा, त्यांना साधी बाराखडी सुद्धा वाचता येत नसते.चांगलं वाचताही येत नाही, बाकी विषयांचा तर आनंदच. मग प्रश्न पडतो की ते दहावत कसे पोहचले?आणि अशी गत असेल तर शाळांचा निकल चांगला लागणार तरी कसा?गावखेड्यात तर विद्यार्थ्यांचं पायाभूत शिक्षण पक्कं झालं पाहिजे. मला तर असं वाटतं की जीवनाच्या परिक्षेत पास व्हायचं असेल तर प्रत्येकाच्या वाट्याला ही दहावीची पहिली पायरी येतेच. फक्त चांगले शिकवणारे शिक्षक चांगले असून चालत नाही. तर त्याच्यासाठी विध्यार्थी हा जिद्धीने,चिकाटीने शिकणारा असला पाहीजे. मला तर असं वाटतं शाळा म्हणजे एक शेती आहे व त्या शाळा, कॉलेजचे मुख्याध्यापक,प्राध्यापक,संस्थापक हे शेतकरी आहेत. शाळा नावाच्या या शेतीमध्ये जे विध्यार्थी शिकतात ते विध्यार्थी म्हणजे पीक आहे. काही शाळा कॉलेजची अवस्था ही बागायती शेती सारखी असते. ज्या प्रमाणे बागायती शेतीतून चांगले उत्पन्न मिळते त्याच प्रमाणे चांगल्या शाळातून चांगले विध्यार्थी घडतात व शाळांचे निकालही चांगले लागतात.काही शाळा या पडीक जमिनी सारख्या असतात म्हणजेच काही शाळातील विध्यार्थी हे बेशिस्त असतात. त्यात कॉपी नावाच्या रासायनिक खतांचा वापर हा कमी केला पाहिजे. त्यानं पिकांचं नुकसानच होतं. पण सांगणार कुणाला? आम्हा मुलांचं कोण ऐकतं? कोण पाहतं?आमचे आम्ही झगडतो आहोत, शिकतो आहोत..आणि प्रयत्न करतो आहोत शिकून सवरुन काहीतरी घडवण्याचा..- आबा काळे इयत्ता बारावी मु.पो. काटी. ता:- तुळजापूर
आम्ही शिकतोय खरे, पण खरंच शिकतोय का?
By admin | Published: April 04, 2017 3:25 PM