- अमृता कदमबुरहान वानी या दहशतवाद्याच्या हत्त्येनंतर उफाळलेली काश्मीरमधली धगधग अजून विझत नाही.हातात दगड घेऊन रस्त्यांवर उतरलेली तरुण पोरं अजून रस्त्यावरून हटत नाहीत. लष्करी दलांच्या बंदुकांमधून उडणारे छर्रे घुसून डोळे फोडून घेणारा काश्मिरी तारुण्याचा अंगार अजून शांत होत नाही.कोण ही पोरं? हातात दगड घेऊन सारखी रस्त्यावर उतरणारी? त्यांच्या आयुष्यातून दुसरे मार्ग, दुसरे पर्याय पुसून कसे गेले? कुणी पुसले?पंतप्रधान म्हणाले, ‘‘ज्यांच्या हातात लॅपटॉप असले पाहिजेत, क्रिकेटच्या बॅट्स आणि बॉल असले पाहिजेत, नजरेत भविष्याची स्वप्नं असली पाहिजेत त्या तरुणांच्या हाती दगड यावेत; हे दुर्दैव आहे आपल्या देशाचं!’’- व्यवस्थेलाही इतकं हतबल वाटावं,असं काय बिघडलं आहे या नंदनवनात?हातात दगड घेऊन रस्त्यावर उतरलेली ही दिशाहीन तरु णाई पाहताना तुम्हाला आठवेल ‘हैदर’ नावाचा सिनेमा... आणि त्यातला हैदर.काश्मीरच्या चौकात उभं राहून प्रश्न विचारणारा हैदर...‘हम है के हम नहीं है?हम है तो हम कहाँ है? हम नहीं है तो कहाँ गये?और किसलिए गये? हम थे भी, या हम थे ही नही?’
हम है, के हम नहीं है...?
By admin | Published: August 18, 2016 4:00 PM