शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

‘वजन’दार

By admin | Published: August 07, 2014 9:39 PM

ओंकार मूळचा चिपळूणचा. तिसरीत असतानाच तो मामाकडे कुरुंदवाडला रहायला आला. त्याचे वडील एका खासगी कंपनीत ड्रायव्हर होते. ओंकार दहावीत असतानाच त्यांचं निधन झालं

ओंकार मूळचा चिपळूणचा. तिसरीत असतानाच तो मामाकडे कुरुंदवाडला रहायला आला. त्याचे वडील एका खासगी कंपनीत ड्रायव्हर होते. ओंकार दहावीत असतानाच त्यांचं निधन झालं. ओंकारचा मामेभाऊ प्रशांत ओतारी राष्ट्रीय स्तरावरील वेटलिफ्टिंगचा खेळाडू. त्याचा खेळ पाहून ओंकारनंही हा खेळ शिकायचं ठरविलं. पंकजनं ३00 किलो वजन उचलून आदर्श निर्माण केला होता. त्याचे मामा ज्ञानेश्‍वर आणि विश्‍वास ओतारी यांनी त्याला शिकण्याला प्रोत्साहन तर दिलंच पण त्याच्या कुटुंबाचा सांभाळही केला. ओंकारची आई साड्यांना पिको फॉल करून चरितार्थासाठी पैसे कमवत होती, परिस्थिती हलाखीची पण तिनं ओंकारला खेळण्यापासून अडवलं नाही. दुर्दैवानं २0१२ मध्ये तिचंही कॅन्सरनं निधन झालं. त्या काळात ओंकार अगदी एकेकटा झाला, त्याची मनस्थिती ठीक नव्हतीच पण त्याला त्याची बायको नम्रता प्रशिक्षक प्रदीप पाटील, विजय माळी, विश्‍वनाथ माळी, रवींद्र चव्हाण, सासरे नंदकुमार दळवी यांनी खूप उभारी दिली. सध्या ओंकार पुण्यातील क्रीडा प्रबोधिनीत मानधन तत्त्वावर प्रशिक्षक म्हणून काम करतो. पश्‍चिम रेल्वेत मुंबईत तो नोकरीही करतोय.
ओंकारला जंटलमन वेटलिफ्टर म्हणत सगळे व्यायामशाळेत.
२00८ च्या कझाकिस्थानात झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यानं प्रथम भाग घेतला. २00९ च्या मलेशियातील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये त्यानं रौप्यपदक मिळविलं होतं. २00९ मध्येच बांगला देशात झालेल्या साउथ एशियन फेडरेशन कप स्पर्धेत सुवर्णपदक मिळविलं. २0१0 मध्ये चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यानं भाग घेतला होता. दिल्लीत २0१0 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्यानं ६२ किलो वजनीगटात भाग घेतला. त्यावेळी २६५ किलो वजन उचललं. बॉडीवेटमुळे त्याचं कांस्यपदक हुकलं. 
यंदाही गेले चार महिने ओंकारला  गुडघेदुखीचा त्रास होत होताच. परंतु तरीही त्यानं केवळ मनोबलाच्या जोरावर राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकलंच.
जिद्द आणि मेहनत एवढय़ा दोनच गोष्टींच्या जीवावर ओंकार इथवर पोहचला.