शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
3
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
4
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
5
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
6
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
7
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
8
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
9
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
10
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
11
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
12
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
13
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
14
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
15
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
16
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
17
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
18
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
19
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
20
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर

यंदाच्या आयपीएल 2020कडून तुम्ही काय शिकलात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 7:55 AM

आयपीएल मुंबई इंडियन्सने जिंकली; पण त्या जिंकण्या-हरण्यापलीकडे यावर्षी जे स्पष्ट दिसलं, ते नक्की काय होतं?

- अभिजित पानसे

एप्रिल-मेच्या सुमारास रोहित शर्माची एक जाहिरात टीव्हीवर सतत झळकली होती. त्यात गमतीने म्हटलं होतं की मुंबई इंडियन्स फक्त विषम क्रमांक वर्षातच जिंकते त्यामुळे २०२० वर्षांत मुंबई इंडियन्स जिंकणार नाही. पण मग रोहित शर्मा म्हणायचा की हे आयपीएलचं १३ वे वर्ष म्हणजे विषम संख्या, मग तर आयपीएल मुंबई इंडियन्सच जिंकणार. उद्घाटनाच्या पहिल्याच सामन्यात चेन्नई विरुद्ध सपशेल हरल्यावर मुंबई इंडियन्सवर शेरेबाजी झाली; पण पुढे मुंबई इंडियन्स संघाने आपला खेळ उंचावला. स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात रोहित शर्मा जखमी झाला. त्याच्या अनुपस्थितीमध्ये पोलार्डने कप्तानी केली; पण शेवटी रुबाबात अंतिम सामन्यात धडक देऊन अनुभवी मुंबई इंडियन्सने तोऱ्यात आयपीएल चषक जिंकला. पहिला सामना हरून शेवटचा निर्णायक सामना जिंकलाच; पण या दूरदेशी झालेल्या आयपीएलने काय काय आपल्या समोर ठेवलं?

१. तुम्ही धोनी असलात तरी लोक तुमच्या वर्तमान खेळावर टीका करतातच. कालचा परफॉर्मन्स आजचं भांडवल होत नाही. या स्पर्धेत धोनी कधीच ‘इन’ वाटला नाही. खेळाडूचा खेळ कमी-जास्त होऊ शकतो; पण त्याची देहबोली महत्त्वाची असते. महेंद्रसिंह धोनीची देहबोलीच यावेळी उत्साहित करणारी नव्हती. त्याच्या चेहऱ्यावरील भाव व देहबोली ही कॅप्टनची नसून ‘प्रशिक्षकाची’ वाटत होती. त्यामुळे पिवळ्या जर्सीतील धोनीचा मिडास गोल्डन टच गेला असं वाटलंच. मात्र तो धोनी आहे, तो हेच शिकवतो की, बॅड पॅच येतोच. अपयश येतंच, पण म्हणून आपण हार मानायची नसते. शेवटचे सलग तीन सामने चेन्नई संघ जिंकला तेव्हा त्याला मुलाखतीत विचारण्यात आलंच की, पिवळ्या जर्सीतील तुझा हा शेवटचा सामना आहे का? तो स्पष्टपणे म्हणाला, ‘डेफिनेटली नॉट’. जिंकण्याची ही जिद्द म्हणजे धोनी हे कुणी विसरू नये.

२. श्रेयस अय्यर. हा तरुण मुलगा खणखणीत नाणं वाजवून येईल असं वाटलं तरी होतं का? तेही एक कर्णधार म्हणून. दिल्लीच्या संघात विदेशी जायंट्स व देशी समवयस्क मोठे खेळाडू असताना त्यांना नीट सांभाळत स्वतःच्या बॅटिंगनेही विलक्षण कामगिरी करण्याचं मोठं काम श्रेयस अय्यरने केलं आहे. आयपीएलच्या तेरा वर्षांत दिल्ली कॅपिटल्सने आजवर प्ले ऑफचा उंबरठा ओलांडून फायनलमध्ये प्रवेश केला नव्हता. तो यावर्षी श्रेयस अय्यरच्या कप्तानीमध्ये करून दाखवला. अंतिम सामन्यात श्रेयस अय्यरची खेळीही लक्षात राहील. श्रेयस अय्यरला भारताचा भावी कर्णधार म्हणून बघितलं जातंय ते उगीच नव्हे.

३. २०१९ मध्ये करण जोहरसोबत कॉफी पिताना भावनेच्या भरात बरंच काही ओघात बोलल्यावर के. एल. राहुलवर सडकून चौफेर टीका झाली; पण त्यानंतर राहुलने जणू कात टाकली. तो परिपक्व बॅट्समन खेळाडू झाला. या आयपीएलमध्ये के.एल. राहुल लीग टप्प्यातीलच १४ सामने खेळून सर्वाधिक रन करणारा बॅट्समन ठरला. याशिवाय त्याने विकेट किपिंग करताना किंग्स इलेव्हन पंजाब संघाची धुरा सांभाळली. या आयपीएलमधून के. एल. राहुल आता एक संपूर्णपणे भरीव खेळाडू म्हणून समोर आला हे सत्य. स्वत:वर कठोर मेहनत करणं आणि झाल्या चुका मागे टाकणं हाच राहुलचा धडा.

४. यावर्षीच्या आयपीएलने टी. नटराजन या लो प्रोफाइल बॉलरचे हाय क्वाॅलिटी यॉर्कर्स जगाने बघितले. भारतीय गोलंदाजाच्या ताफ्यात सर्व अस्त्र असतात; पण अचूक यॉर्कर्सचा मात्र कायमच तुटवडा असतो हा आजवरील इतिहास आहे. टी. नटराजन मात्र ती उणीव भरून काढू शकतो. संपूर्ण आयपीएलमध्ये त्याने अचूक यॉर्कर बॉल टाकलेत. प्ले ऑफमध्ये रॉयल्स चॅलेंजर्स बंगलोरविरुद्ध खेळताना नटराजनने ए.बी. डिव्हिलयर्सचा यॉर्करने मिडल स्टंप उडवल्याचं नयनरम्य दृश्य हे या आयपीएलचं सिग्नेचर क्षणांपैकी एक आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे नटराजनचा समावेश ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ट्वेन्टी-ट्वेन्टी मालिकेसाठी आता झाला आहे. तिथे तो आपल्या यॉर्कर्सने कांगारूंची भंबेरी उडवेल अशी आशा आहे. संधीचं सोनं करणं काय असतं ते या मुलानं दाखवून दिलं.

५. तुम्ही विराट कोहली असलात तरी सदैव जिंकता येत नाहीच. आता तर कोहलीवर अपयशाचं आणि टीकेचं प्रेशर आहेच. मुख्य म्हणजे आपण प्रेशर असताना कसं वागतो यावर अनेक गोष्टी ठरतात. कोहली चुकलाच या काळात. सूर्यकुमार यादवसोबत विराट कोहलीच्या अपरिपक्व वागण्यानं त्यावर टीका झालीच. ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शर्माला कसोटी संघात संधी मिळाली आहे. विराट कोहली पहिल्या कसोटीनंतर भारतात परतणार आहे. सोपं नाही कोहली असूनही आपलं स्थान टिकवून ठेवणं.

( अभिजित ब्लॉगर आहे.)