शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
2
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
Vinod Tawde: तावडे आलेल्या त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
5
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
6
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
7
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
10
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
11
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
12
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
13
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
14
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
15
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
16
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
17
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
18
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
19
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
20
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?

कुणी तुमच्याशी मनातलं बोललं तर तुम्ही काय करता ? मदत  कि गॉसिप ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 3:48 PM

मनातलं बोला-बोला मी आहे, कधीही फोन करा, माझं दार उघडं आहे, असं स्टेटस सोशल मीडियात टाकणं सोपं आहे. पण कुणी बोललंच मनातलं तर काय करतात अनेकजण? ‘त्याची’ कुंडली कशी आपल्यालाच माहिती आहे म्हणत गावभर गॉसिप करतात. टिंगल करतात? जो आपल्याशी मनातलं बोलतो, त्याला कमी लेखतात. उपदेशाचे डोस पाजतात?

ठळक मुद्देकुणी आपल्याशी मनातलं बोललं तर ते पोटात ठेवण्याचं बळ आहे आपल्याकडे?

- प्राची पाठक

असं का केलं असेल त्यानं?- असं विचारत आपण आपल्याही नकळत माहिती काढत असतो. गॉसिप ऐकतो, त्यातून काही माहिती मिळते का पाहतो. आणि काहीजण तर लगेच सल्ले द्यायला पुढे सरसावतात की, अमुक बघा किती भयानक  परिस्थिती तरी नाही जीव दिला, तमुक बघा कसं माणसांना सोबत घेऊन पुढे गेला म्हणून एकटा नाही पडला.’- हे सगळं ठीकच; पण अनेकदा सोशल मीडियातही लाट येते, कधीही वाटलं, काहीही बोलावंसं वाटलं तर एक फोन करा, माङयाशी बोला असंही सोशल मीडियात व्हायरल होतं.तसेही आपल्याकडे अनेकांकडे दुस:याच्या दु:खांवर, प्रश्नांवर चटचट उत्तरं तयार असतात. ते प्रॉब्लेम्स आपल्याला पुरेसे प्रॉब्लेम्स वाटत नसतात. आपण क्षणात मानसतज्ज्ञदेखील झालेलो असतो. आपण तर त्याहून गंभीर प्रसंगांना सामोरे गेलेलो असतो, हे तर काहीच नाही, असंही मनात येऊन जातं. आपल्या आणि इतरांच्या आयुष्याबद्दल आपल्याला इतकं काही अचानक कळायला लागतं की आपण इतरांनी आपल्याशी त्यांची संकटं बोलावी, अशी जाहीर ऑफरदेखील देऊन टाकतो!‘एकटं वाटलं तर माङयाशी बोला’, असे स्टेटसवर स्टेटस पडतात.लोक टाळ्या वाजवतात, लाइक्स ठोकतात, काय संवेदनशील आहे म्हणतात.पण खरं सांगा, कोणी धाडस करून मनातलं तुमच्याशी बोलायला आलंच, तर तुम्ही नेमकं काय करणार?त्या माणसाला केवळ शब्दांनी धीर देणार की त्याला चटचट त्याच्या समस्येवर उपाय देणार? तेही तुमच्या नजरेला जे उपाय वाटत असतात तेच सुचवणार की अभ्यास करून उत्तरं देणार?दुस:याचं आयुष्य चालवायला घेणार का? की फक्त ऐकून घेणार? नुसतं ‘ऐकून घेणं’ हेच किती श्रेष्ठ असं स्वत:ला सांगणार का? काय करणार काय नेमकं? काही जणांना तर एक भलताच इगो असतो.लोक माङयाकडे येऊन मनातलं बोलतात, मग मी कसे त्यांचे प्रॉब्लेम सोडवतो/सोडवते. पण मग तो आपला इगो सुखावण्यासाठी दुस:यांनी आपल्याशी बोलायला हवं का? बरं, माङयाशी मनातलं बोला, असं आपण सांगितलं आणि लगेच लोक आले आणि मनातलं बोलायला लागले, असं होतं का? आपण स्वत: तरीअसं करू का? करतो का?कितीही कुणी वाटलं तरी अनेकदा जवळच्या मित्रमैत्रिणींशीही अनेकजण बोलत नाहीत.ते का बोलत नाहीत, याची अजून एक बाजू असते ती म्हणजे भीती. आपण जे सांगतो ते गावभर होण्याची. आणि तसं होत नाही का?अनेकजण आपल्यालाही असं सहज सांगतात की, ‘मी तर बाबा त्या अमक्याचं इतकं ऐकून घेतलं, त्याला अमुक मदत केली. पण त्याने मी सांगितलेलं काही केलंच नाही!’ज्याने कोणी विश्वासाने, हक्काने आपल्याशी काही शेअर केलं, ते चार लोकांना उघडपणो सांगायचं लायसन्सच मिळालं असं वागतात अनेकजण.त्यांचं लगेच दुस:याला सांगणं सुरूहोतं.‘तुला म्हणून सांगतो/सांगते’ करत जो कोणी हक्काने आपल्याशी काही बोलतो, त्याची कशी आख्खी ‘कुंडली’ आपल्याला माहीत आहे, तो कसं आपल्याला सगळं सांगतो, जे इतरांना माहिती नाही ते मलाच कसं माहिती आहे, या थाटात गप्पा सुरू होतात. त्या अमक्यातमक्याची कुंडली चव्हाटय़वर आणली जाते. त्यावर भरपूर चर्चा केल्या जातात. नको ती माहिती सर्वत्र पसरवली जाते.अशाने कोण कोणाशी हक्काने बोलायला जाईल? कोणीही कोणाशी बोलायला जाताना दहा वेळा विचार करेल. मुळात आपल्या मनातलं योग्य व्यक्तीपाशी, योग्य वेळी, नेमक्या शब्दांत बोलता येणं ही एक कला आहे. अनेकांना ती नीटशी कळत नसते. मनात भीती असते. चुकून काही बोललं गेलं तर दुसरा काय विचार करेल हे मोठं दडपण असतं. अमक्याशी बोलून काय फायदा होईल, काय तोटा होईल, याचे अंदाजदेखील आपण बांधत असतो. आपलं आणि त्याचं पटतंय तोवर ठीक. पण काही भांडण झालं, तर तीच माहिती कोणी आपल्याविरुद्ध वापरेल, याची प्रचंड भीती मनात असते. अनेक शंका असतात. त्या पार करून कोणीतरी तुमच्यावर विश्वास टाकतो आणि काही सांगू पाहतो. म्हणजे आपल्या मनाच्या तिजोरीची चावीच जणू आपल्याकडे हक्काने देतो. तर, त्या गोष्टीबद्दल आदर ठेवून काहीही झालं, तरी ही तिजोरी मी चव्हाटय़ावर आणणार नाही, हा संकेत सगळ्यांनी पाळायला हवाय. उद्या कदाचित आपल्यावरदेखील अशीच वेळ येईल आणि आपण बोलून गेलेलं कोणी कुठे आपल्याविरु द्ध वापरेल किंवा स्वत: न्यायाधीश बनून आपल्याला चुकीचं ‘जज’ तरी करेल, अशी जाणीव ठेवावी लागेल. प्रत्येकाच्या मनात अनेक गुंतागुंतीचे, मन पोखरणारे प्रश्न असतात. ते शब्दांत मांडायला धाडस लागते आणि मनाची तयारी व्हावी लागते. तिचा गैरफायदा, गैरवापर न करणं ही प्रगल्भता आपण शिकली पाहिजे. आणि कुणी आपल्याशी मनातलं काही बोललं तर ते पोटात ठेवलं पाहिजे, विश्वासाला जागलं पाहिजे.त्यामुळे बोला-बोला म्हणता आपण स्वत: उत्तम आणि भरवशाचा ‘लिसनर’ होणार का?हे विचारा स्वत:ला..

‘ऐकून घेताना’ ही एवढी पथ्यं पाळता येतील?

1. मुळात आपले आयुष्य सुरळीत चालू आहे का? हे आधी पहावं.  दुस:याच्या मनातल्या समस्यांची, गुपितांची जबाबदारी आपण पेलू शकू का, हे स्वत:ला विचारा.2.  दुस:यांचे प्रॉब्लेम तर आपण झटकन सोडवू, साधी गोष्ट आहे, काय घोळ घालत बसतात असं तुम्हाला इतरांचं मन मोकळं होताना वाटतं का? लगेच सल्ला, उपदेश देणं तुम्ही सुरूकरता का?3. दुस:याचं ऐकून घेऊन, बोलतं करून, त्यांना आपण काय मदत करणार, याचा विचार करता का? की आपण त्यांच्या प्रश्नांची रेडिमेड झट की पट उत्तरं आपल्या बुद्धीने देणार आणि अमुक कर म्हणणार? याला समुपदेशन तर म्हणत नाहीच; पण हे दुस:याचं आयुष्य चालवायला घेणं आहे, याची जाणीव आपण ठेवणार का? 4. कोणाच्या समस्येत आपण इतके गुरफटून जाऊ, इतके अडकून पडू की आपलं आयुष्य आणि त्यातले प्राधान्यक्रम आपल्याला कळेनासे होतील, असं तुमच्याबाबत होण्याची शक्यता आहे का?   असेल तर आधी स्वत:ला सावरा.5. आपण मनाचे तज्ज्ञ आहोत का? कोणी म्हणालं, हात फ्रॅक्चर झाला, कोणी म्हणालं हृदयविकार आहे, तर आपण स्वत:च डॉक्टर बनतो का एका लिमिटनंतर? की आपण त्यातल्या कोणी जाणकार माणसाकडे त्याला जायला सांगतो? तिथे जायला सोबत करतो? मग मन आणि त्याचे प्रश्न त्यातलं शिक्षण घेतलेल्या माणसांना सोडवू देत की. आपण फार तर तिथे जायचा मार्ग सुचवू शकतो. तिथवर जाण्यासाठी सोबत करू शकतो. त्या संपूर्ण काळात त्या व्यक्तीसोबत गरजेनुसार राहू शकतो. 6. रेडिमेड उत्तरं, तयार सल्ले देणं म्हणजे समुपदेशन नाही. ते करणं म्हणजे दुस:याचं ऐकून घेणंदेखील नाही, हे कृपया समजून घेऊ. आपण फक्त समस्या ओळखून त्यावर औषध देणा:या तज्ज्ञांची मदत घेऊ.7. आणि सर्वात महत्त्वाचं काहीही, अगदी काहीही झालं तरी आपल्याला विश्वासाने कळलेली दुस:याची कमजोर बाजू कोणत्याही कारणाने चार लोकांना सांगणार नाही. ते आपल्याकडे विश्वासाने ठेवलेलं गुपित असतं. त्याला आपल्याकडून चव्हाटय़ावर येऊ न देणं हीसुद्धा चांगल्या मैत्रीची एक जबाबदारीच असते.8. आपल्याशी कुणी मनातलं बोलतं, कुणी आपल्याशी भरवशानं सारं शेअर करतं, म्हणजे आपण भारी, सुपिरिअर असं वाटून शेअर करणा:याला दुय्यम किंवा कमी लेखू नये.9. अगदी नकळतही त्याच्या दुख:या गोष्टींची चेष्टा करून, मला असं म्हणायचं नव्हतं असं उगाळू नये.1क्. तो वेदनादायी काळ, त्या जुन्या चुका किंवा घोळ सरले की त्यावरून तू पूर्वी असं वागत असे असं म्हणू नये.

(प्राची मानसशास्नची अभ्यासक आहे.)