शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहना सिंगची 'गगनचुंबी' झेप! बनली तेजस फायटर फ्लीटमधील पहिली महिला फायटर पायलट
2
'दगडूशेठ'च्या बाप्पांची श्री उमांगमलज रथातून सांगता मिरवणूक उत्साहात; भाविकांची झुंबड
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रावरील शस्त्रक्रिया यशस्वी; दुखापतग्रस्त हाताने खेळलेला 'डायमंड लीग'
4
अमेरिकेच्या प्रतिष्ठित हम्फ्रे फेलोशिप प्रोग्रामसाठी विजयलक्ष्मी बिदरी यांची निवड
5
लेबनॉनमध्ये साखळी बॉम्बस्फोट, 5 जणांचा मृत्यू तर 1200-1500 जखमी; इस्रायलवर संशय
6
अचलपूर तालुक्यात गणेश विसर्जना करण्यासाठी गेलेले दोन कर्मचारी पूर्णा नदीपात्रात गेले वाहून
7
हातगाडी लावण्यावरून चाकू हल्ल्यात एकाचा खून; कोल्हापूरच्या आराम कॉर्नर येथील घटना
8
जळगाव जामोदमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक, तरुण जखमी; पोलिसांचा हस्तक्षेप
9
तलावातील पाण्यामध्ये बुडून बाप-लेकाचा मृत्यू; लातूर जिल्ह्यातील माळहिप्परगा येथील घटना
10
गोळ्या झाडून पोलीस कर्मचाऱ्याने केला पत्नीचा खून; किरकोळ वादातून उचललं टोकाचं पाऊल
11
'पुढच्या वर्षी लवकर या'चा जयघोष, जळगावात जल्लोषात विसर्जन अन् सामाजिक संदेश
12
गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत दणदणाट अन् लखलखाट! कोल्हापुरात तुफान धामधूम
13
“बाहेर जाऊन देशाबाबत असे बोलणे शोभत नाहीत, राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करावा”: रामदास आठवले
14
'मला मेनोपॉझबद्दल वडिलांनी आधीच..' सुधा मूर्तींनी सांगितला मासिक पाळी अन् मेनोपॉझचा अनुभव
15
“भाजपाचा CM होणार असेल तर देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री”: गिरीश महाजन
16
Ganesh Visarjan 2024 Live: पुण्यातील मानाच्या पाचही गणपती बाप्पांचे विसर्जन
17
भारतात वेगाने वाढतीये करोडपतींची संख्या, ₹ 10 कोटी कमावणाऱ्यांच्या संख्येत 63 टक्क्यांनी वाढ
18
अमित शाह यांची हरियाणात अग्निवीरांसंदर्भात बडी घोषणा, नोकरीसंदर्भात दिली मोठी गॅरंटी
19
आगामी विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार; अजित पवार स्पष्टच बोलले
20
PM मोदींना वाढदिवसानिमित्त इटलीतून शुभेच्छा; जॉर्जिया मेलोनी काय म्हणाल्या? पाहा...

तरुणांचा विकास, म्हणजे नेमकं काय करायचं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 8:00 AM

 निर्माण या तरुणांसाठी काम करणाऱ्या उपक्रमाने तरुणांसाठी एक यूथ फ्लरिशिंग फ्रेमवर्क तयार केलं आहे. तरुणांचा विकास म्हणजे नेमकं काय? -त्याचं हे उत्तर.

- अमृत बंग

भारताची २२ % लोकसंख्या ही ‘युवा’ (वय १८ – २९ वर्षे) या गटात आहे. आवाका समजून घ्यायचा तर भारताचे हे २६ कोटी युवा हे आख्या पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त आहेत. या लोकसंख्याशास्रीय लाभांशाला (डेमोग्राफिक डिव्हिडंड) पाया समजून त्यावर मजबूत उभारणी करणं अत्यावश्यक आहे, कारण हा युवा वर्गच देशाचा चेहरा, ताकद आणि भविष्य असणार आहे.

दुर्दैवाने आपल्याकडे युवांच्या विकसनासाठी फारसे काही केले जात नाही आहे. शासन व खासगी क्षेत्राचा युवांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा निव्वळ मतदार वा संभाव्य ग्राहक यापुरता सीमित असतो. सामाजिक क्षेत्रातदेखील बहुतांश वेळा ‘यूथ डेव्हलपमेंट’ हा तुलनेने गौण महत्त्वाचा विषय मानला जातो. युवांच्या विकासासाठी आपल्याकडे फारसे जोमदार उपक्रम तर नाहीतच; पण अत्यंत महत्त्वाची एक समस्या म्हणजे यासाठीचे कुठलेही सिद्धांत वा प्रारूपदेखील भारतात नाही. त्यामुळे एखाद्या युवाचा सुयोग्य विकास करायचा किंवा व्हायला हवा म्हणजे नेमकं काय करायचं, तरुणाचा विकास होतो आहे किंवा नाही, त्याची विविधांगी सक्षम जडणघडण होते आहे की नाही, हे कसे ओळखायचे याबाबत अस्पष्टता राहाते.

या संदिग्धतेचा परिणाम असा होतो की मग निव्वळ सहजरीत्या दृश्यमान आणि विनासायास मोजता येण्यासारख्या अशा गोष्टी युवा विकासाचे मापदंड व मानदंड आहेत असा समज प्रस्थापित होतो. उदा. परीक्षेतील मार्क्स, नोकरी असणे, पगार, घर वा गाडी असणे म्हणजे विकास असे मानले जाते. या गोष्टींचेही काही महत्त्व आहेतच; पण ही मानके म्हणजेच परिपूर्ण असेदेखील मानता येणार नाही.

मग असे इतर काय घटक, लक्षणे, वैशिष्ट्ये असू शकतात ज्यावरून कल्पना येईल की एखाद्या युवाचे जीवनात खरोखर छान सुरू आहे, तो किंवा ती ‘फ्लरिश’ होत आहे. युवा विविधांगाने बहरताहेत आणि विकासाच्या / वाढीच्या मार्गावर इष्टतम स्थितीत आहेत हे ठरवणार कसं?

युवांच्या विकासासंबंधीचा आपल्याकडील बहुतांश संवाद व चर्चा ही आत्महत्या, बेरोजगारी, अपघात, लैंगिक अत्याचार, मादक पदार्थांचे व्यसन याभोवतीच घोळते. म्हणून मग ‘निर्माण’ उपक्रमाने भारतातील युवांसाठी प्रथमच एक ‘निर्माण यूथ फ्लरिशिंग फ्रेमवर्क’ तयार केले आहे. गेल्या १४ वर्षांत हजारो युवकांसोबत निर्माणने केलेल्या कामातून आणि अनुभवातून झालेल्या निरीक्षणांवर तसेच या विषयाबाबतच्या नवीनतम विज्ञानावर आधारलेले असे आहे.

काय आहे या फ्रेमवर्कमध्ये? तरुण मुलं फ्लरिश होतील म्हणजे नेमकं काय होतील?

तर यात ७ मुख्य विभाग आणि त्यामध्ये एकूण ५० विविध घटक अशी विभागणी केलेली आहे.

७ मुख्य विभाग पुढीलप्रमाणे..

१. शारीरिक स्वास्थ्य - Physical Health

२. मानसिक स्वास्थ्य - Psychological Well-Being

३. चारित्र्य विकास - Character Development

४. नातेसंबंध - Social Relationships

५. व्यावसायिक विकास- Professional Development

६. जीवन कौशल्ये - Life Skills

७. सामाजिक योगदान - Social Contribution

या सात विविध टप्प्यांत तरुण मुलं सर्वांगीण विकास करत आहेत का, तो कसा करता येईल. त्यांना स्वत:ला, त्यांच्या पालकांसह शिक्षक, विविध संस्था, कार्यकर्ते, धोरणकर्ते यात सहभागी होऊ शकतील.

निर्माण म्हणून आम्ही असे भविष्य बघू इच्छितो जिथे भारतातील तरुणाईची वाढ, प्रगती व उत्कर्ष यांची संकल्पना, त्यांच्या व इतरांच्या विचारातदेखील, ही परीक्षेचे मार्क्स, पॅकेजचे आकडे, मालकीच्या गाड्यांची संख्या अथवा मालमत्तेचा चौरस फुटामधील आकार, या पलीकडे जाते आणि वैविध्यपूर्ण स्वरूप घेते.

मानसिक वा शारीरिक आजारांचा निव्वळ अभाव म्हणजे आपोआप निकोप व निरोगी वाढ असा अर्थ होत नाही. त्यातून फक्त इतकेच कळते की आपण अक्षाच्या ऋण बाजूला नाही आहोत तर शून्य बिंदूवर आहोत. अक्षाच्या धन बाजूला, सकारात्मक वाढीसाठीच्या अगणित संभावना आहेत आणि त्या शक्यतांना वास्तवात आणणे ही युवा पिढीची जाबाबदारी आणि आपण बाकी सगळ्यांचे उत्तरदायित्व आहे. या रोमांचकारी प्रवासामध्ये हे फ्रेमवर्क उपयुक्त मार्गदर्शक ठरेल, अशी आम्ही आशा करतो.

फ्लरिशिंग युवा हे फ्लरिशिंग भारताचे खरे चिन्हक व पताका असतील आणि देशाच्या भरभराटीचे इंजिन ठरावेत.

(प्रकल्प संचालक – निर्माण)

www.nirman.mkcl.org