शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मला गोळ्या झाडा मी मरणार नाही, तुम्हाला सोडणार"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
3
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
4
“देवेंद्र फडणवीस यांची ही ‘लाडका विनोद’ योजना आहे का?”; काँग्रेसची खोचक टीका
5
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
6
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
7
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
8
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
9
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
10
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
11
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
12
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
13
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
14
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
15
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
16
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
17
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
18
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
19
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
20
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप

डेटा, जेवण आणि एकटेपणा - लॉकडाऊनच्या काळात तरुण मुलांचं नेमकं काय झालं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 2:19 PM

मानसिक आणि शारीरिक आरोग्याचे आर्थिक ताणासह मानसिक ताणाचेही कोणते प्रश्न निर्माण झाले याचे अभ्यास आता जगभर होत आहेत. इंग्लंड, कॅनडा आणि दक्षिण आफ्रिकेत झालेल्या सर्वेक्षणातली ही निरीक्षणं.

ठळक मुद्दे- गरजा बदलल्या की प्राधान्यक्रम बदलतात ते असे!

-चिन्मय लेले

भारतात हजारो मजूर लॉकडाऊनच्या काळात चालत आपल्या गावांकडे गेले. एक भयानक स्थलांतर लॉकडाऊनमध्ये देशानं अनुभवलं. त्यात तरुणांची संख्या अर्थातच जास्त होती.हाताला काम नाही तर गावी जाऊ म्हणून भूक आणि आर्थिक चणचण सोबत घेऊन तरुण पाऊलं आपल्या घरोघर परतली.बाकी तारुण्याचं काय झालं? त्यांनी काय केलं? भविष्याची तयारी करत हातपाय हालवले की डेटा पॅक जाळला? - तशी आकडेवारी किंवा डाटा आजच्या घडीला तरी भारतात उपलब्ध नाही. जगभरात मात्र असे काही अभ्यास लॉकडाऊनच्या काळात करण्यात आले. एकटेपणा, एकलकोंडेपणा, सोशल मीडियातलं गुंतलेपण, आर्थिक असुरक्षितता आणि कुटुंब-नातेसंबंध या संदर्भात तरुण मुलांचं काय झालं?तरुण ऊर्जा अशी चार भिंतीत आणि टाळेबंदीत कोंडली गेली, त्यानंतर त्यांच्या मनांचं आणि जगण्याचं काय झालं असे काही अभ्यास आता प्रसिद्ध होऊ लागले आहेत. काही अभ्यास तर एकूण माणसांचं काय झालं लॉकडाऊनच्या काळात असेही झाले. मात्र त्यातही अन्य वयोगटापेक्षा तरुण वयोगटांत जास्त अस्वस्थता आणि एकाकीपण दिसलं असं हे अभ्यास सांगतात.अनेकांनी लॉकडाऊनच्या काळात अधिक नैराश्य अनुभवलं किंवा जे आधी निराश होतेच ते अधिक हताश आणि हतबल होत गेले असंही हे अभ्यास सांगतात.त्यापैकी काही अभ्यासांनी नोंदवलेली ही निरीक्षणं.

इंग्लंडच्या तारुण्याचं काय झालं?

इंग्लंडमधील ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्स (ओएनएस) यांनी लॉकडाऊनच्या काळात एक सर्वेक्षण केलं. 3 एप्रिल ते 3 मेच्या दरम्यान हे माहिती संकलन करण्यात आलं.526क् जणांची मतं या सव्र्हेत नोंदविण्यात आली.तर हा अभ्यास असं सांगतो की, सव्र्हेत सहभागी झालेल्यांपैकी ज्यांना अतिशय एकटेपणा भासला असे 5क् टक्के लोक हे 16 ते 24 या वयोगटातले आहेत. (एकटेपणा वाटतो असं सांगणा:यांत 55 ते 69 या वयोगटातले लोक तुलनेने इतरांपेक्षा कमी आहेत.)एकटेपणाच नाही तर याकाळात तरुण मुलांनी काही गोष्टी प्रकर्षाने अनुभवल्या किंवा त्यांना त्याविषयी काळजी वाटली, धास्ती वाटली असं हा अभ्यास सांगतो.* एकटेपणा वाटला असं तर अनेकजण सांगतात.* तब्येतीची काळजी वाटली, आरोग्यविषयक प्रश्न पडले.* नाती, जवळची माणसं, प्रेमप्रकरण यासा:यांचं कसं होणार असं तरी वाटलं किंवा त्यात ताण निर्माण झाला.*आर्थिक चिंतेने बहुसंख्यांना ग्रासलेलं होतं.

कॅनडात काय झालं?वल्र्ड व्हिजन कॅनडा यांनी केलेल्या अभ्यासानुसार कॅनडातल्या 18 ते 29 या वयोगटातल्या तारुण्याला सर्वात जास्त काळजी आपल्या मानसिक आरोग्याची वाटली.लॉकडाऊनच्या काळात मानसिक आरोग्याचा अनेकांनी विचार केला, त्याविषयी त्यांना चिंता वाटली.मानसिक आरोग्याचा विचार करताना प्रेमप्रकरण, अन्य नाती आणि कुटुंब यासा:याविषयी लॉकडाऊन सुरूझाल्यापासून जरा जास्तच काळजी आणि ताण वाटू लागला असं 55 टक्के तरुण सांगतात.तर 32 टक्के तरुणांना सगळ्यात जास्त चिंता आपल्या नोकरीचं काय होईल याची लागून राहिली. ही महामारी संपेल तेव्हा आपल्या हातात काम असेल ना असे प्रश्न अनेकांना पडले.तरीही 32 टक्के  तरुणांनी सांगितलं की, भविष्यात अगदीच काही अंधार नाही, काही चांगलंही होईल, फक्त आता ते दिसत नाहीये इतकंच.

दक्षिण आफ्रिकेत काय झालं?केप टाउन विद्यापीठाच्या दक्षिण आफ्रिका कामगार आणि विकास विभागाने एक सर्वेक्षण केलं. लॉकडाऊनच्या काळात तरुण मुलांचं स्वास्थ्य असाच या अभ्यासाचा विषय होता.17,992 तरुण/तरुणी या सर्वेक्षणात सहभागी झाले. प्रश्नावली भरून पाठवली सर्वानी. त्यात तरुणांना विचारलं होतं की या लॉकडाऊनच्या काळात काय काय मिळालं तर तुमचं स्वास्थ्य उत्तम राहील?त्यावर तरुण मुलांनी दिलेल्या उत्तरांची ही टक्केवारी.

* म्हणजे 36 टक्के तरुण मुलांनी सांगितलं की फ्री डेटा द्या. * 32 टक्के तरुणांनी सांगितलं की, आम्हाला शिकण्यासाठी काही मदत योजना आणि सहाय, पाठबळ हवं.* 34 टक्के म्हणतात की, ऑनलाइन लर्निग कोर्सेस, ट्रेनिंगची गरज आहे.* मात्र 44 टक्के म्हणतात की, आता आर्थिक विवंचनाच असल्याने फूड पॅकेट्स मिळाले तर उत्तम.- गरजा बदलल्या की प्राधान्यक्रम बदलतात ते असे!