प्रिय पाऊस,
साऱ्या महाराष्ट्रातला शेतकरी
तुझ्यासाठी तरसत होता, तुझ्यासाठीच रडत होता.
आणि फक्त तुझ्या आठवणीत मरत होता.
मागील चक्क ३ वर्ष
माझ्या धरणी मातेच्या अंगाची
लाही लाही होताना मी पाहीली,
पण बरं झालं तू आलास.
मध्यंतरी तू आलास,
दोन दिवस थांबलास
व नंतर कोणास ठाऊक
कुठे गायब झालास?
असं वाटत होतं की,
एखाद्या भुकेनं व्याकूळ झालेल्या
पण हात नसलेल्या माणसासमोर
पंचपक्वानांचे ताट जणू ठेवून गेलास..
पण बरं झालं तू आलास,
तू आलास आणि जणू माझ्या धरणी मातेनं
हिरवी शालच पांघरली.
तू येण्या आधी शेतकºयाच्या डोळ्यात अश्रू होते,
अर्थात ते आजही आहेत
पण फरक एवढाच की,
त्या वेळचे अश्रू दुखा:चे होते
या क्षणीचे सुखाचे आहेत..
असाच बरसत रहा..
आलास तसा रहा..
भरपूर..
- प्रतिक प्रशांत कुलकर्णी, लातूर
वाचक कट्टा
हा कट्टा खास तुमच्यासाठी.
मनातलं सारं शेअर करण्याची एक खास जागा. तुमचाही लेख या वॉलवर झळकू शकतो. या कट्टयावर त्याची चर्चा होऊ शकते.
तेव्हा लिहा आणि तुमचे लेख आम्हाला ङ्म७८ॅील्ल@’ङ्म‘ें३.ूङ्मे
वर मेल करा.
निवडक लेखांना या वाचक कट्ट्यावर झळकण्याची संधी