शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

एकटेपणा येतो, त्याचं करायचं काय? कॉफी आणि उघडं दार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2017 10:22 AM

फॉरवर्डची ढकलगाडी आपण नेहमी ढकलतो. तसाच एक मेसेज आपण अलीकडेच बराच फिरवला. तो सांगत होता, कधी एकटं वाटलं, अगदी बोलावंसं वाटलं, तर माझ्या घरी या, माझं दार उघडंच आहे. पण असं जाऊ का आपण कुणाकडे? म्हणू कुणाला, बस माझ्याजवळ मला एकटं वाटतंय? अशी असतात का खरंच दारं कुणाची उघडी? आणि मनाची दारं? ती उघडतील पटकन कुणासमोर?

- प्राची पाठकफोनमध्ये काहीही आले की वाचून, किंवा न वाचताच फॉरवर्ड करायची सवय आपल्याला इतकी पटकन कशी लागली असेल?एरवी आपण म्हणतो, सवयी बदलता येत नाहीत, सवय लागायला खूप वेळ लागतो, आळस आड येतो, वगैरे. पण ही फॉरवर्ड करायची सवय कशी सहज लागली आपल्याला. लोकांना नकोसे होतील इतके फुकाचेच गुड मॉर्निंग आणि गुड नाइट मेसेजेस आपण पाठवत राहतो. कोणी निरर्थक फॉरवर्ड्स पाठवू नका म्हटलं तर अनेकांना राग येतो. दुसºयांना वैताग येईपर्यंत आपण फॉरवर्ड ढकलतच असतो. ही सवय अशी कशी काय चटकन लागली आपल्याला?विचार केलाय कधी?सवय हा एक वेगळाच विषय आहे.पण अलीकडेच एक मेसेज तुफान फॉरवर्ड होत होता. खूप फिरला तो मेसेज.त्यात काय म्हटलं होतं..‘तुम्हाला एकटं वाटत असेल, जीव द्यावासा वाटत असेल, तर एक कप कॉफी प्यायला माझ्याकडे या. माझं दार खुलं आहे.’साधारण अशा अर्थाचं ते फॉरवर्ड होतं. ते शेअर करून/फॉरवर्ड करून खचलेल्या, आत्महत्या करायला प्रवृत्त होणाºया, एकटं वाटणाºया कोणालाही आपण किती छान दिलासा दिला, असे आभासी समाधान अनेकांनी या कृतीतून मिळवले. आपण एरवी फार काही करू शकत नाही कोणासाठी, निदान फॉरवर्ड तर करावं, म्हणून देखील काहींनी ते फिरतं ठेवलं.सगळ्यांनी एकमेकांना सांगितलं, ‘एक कप कॉफी प्यायला दार उघडं आहे.’कोणी कोणी तर इतर करतात म्हणून स्वत:ने देखील ते फॉरवर्ड केलं. कोणाला वाटलं यातून जागृती होणार तर काय वाईट?अर्थातच काही प्रमाणात जागृती झालीच. पण जागृत होऊन प्रत्यक्ष कुठं जायचं असेल कोणाला तर नक्की कोणत्या मित्राकडे, मैत्रिणीकडे जावं ते त्यात नव्हतं, कोण कुठे राहतं ते त्यात नव्हतं. केवळ माझ्याकडे या, असं जेव्हा सर्वजण सांगतात तेव्हा त्यात स्पेसिफिक मदत अशी काहीच नसते. ही कृती केवळ फॉरवर्ड करणाºयाला समाधान, मी काहीतरी केलं, एखादा संदेश वाहून नेला, अधिकाधिक लोकांना वाचता येईल असं बघितलं, इतकीच मर्यादित राहते. हा मेसेज फॉरवर्ड करणाºया व्यक्तीला सुद्धा कधी फार एकटं वाटलं तर नेमकं कोणाकडं जावं कॉफी प्यायला, याबद्दल कसं ठरवता येईल? तो नक्की गोंधळून जाणार. कोणाकडे केव्हाही कसं जाता येईल, या प्रश्नाचं त्यात उत्तर नव्हतं. जाणं इतकं सहज असेल का? आपल्या घराजवळ कोण असेल, किती प्रवास करून कोणाकडं जावं लागेल त्यापेक्षा आपण आहोत तसेच ठीक होऊन जाऊ का? असा विचार प्रत्यक्ष कृती करताना आधी समोर आला असता.आपण अगदी तापानं फणफणत असू तर घराजवळच्या, नेहमीच्या डॉक्टरकडे जायचं असतं तरीदेखील आज बघू, उद्या जाऊ असं करत काही वेळ का होईना ते दुखणं अंगावर काढतो. इथे तर ओळख ना पाळख सगळ्या व्यक्ती नुसत्या फॉरवर्ड करत सुटल्या आहेत, माझं दार खुलं आहे. पण ते दार कुठं आहे, हे कसं कळणार?अचानक कोणाच्याही घरी असं कसं आणीबाणीत जाता येईल, या प्रश्नांची उत्तरं खरंच एखाद्याला (अशी मदत लागलीच तर) विशेष मिळत नाहीत. पुन्हा, त्यातील सुरक्षेचा मुद्दा दुर्लक्षिला जातो. दाराशी येणाºया कुरिअरवाल्याकडेही अनेकजण संशयानं बघतात. एकटी-दुकटी माणसं घरात असतात. अशावेळी कोण उठून कोणासाठी दार उघडं ठेवणार? किती वेळ ठेवणार?पण तरीही एकटं वाटलं तर बोला कोणाशीतरी, आपल्या जवळच्या व्यक्तीच्या सोबत राहा, इतपत संदेश हे मेसेज पोहचवतात. अर्थात तेही कुणी वाचून फॉरवर्डकेले असतील, त्यातला मतितार्थ समजून घेतला असेल तर? अनेक फॉरवडर््स न वाचताच शेअर होत असतात, ते वेगळेच. एकटेपणा, त्याविषयी बोलणं, तसं माणूस हक्काचं असणं हे सारं नीट समजून मात्र घ्यायला हवं.-  prachi333@hotmail.com

कधी वाटतं एकटं? भरल्या घरात, दोस्तांच्या मैफलीतही?एकटं वाटणं. ही एक भावना आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर प्रत्येकाच्या मनात येत असते.कधी थेट एकटे नसाल. पण भरल्या घरात एकटे असाल. मित्र यादीत, फोनच्या लिस्टमध्ये शेकडो नावे सेव्ह आहेत आणि तरीही गरजेला कोणी नाही असं होतंच. ‘मला पेन दे रे जरा’ हे जितकं सहज मागितलं जातं तसं ‘बस माझ्यासोबत थोडं, मला एकटं वाटतं आहे’, असं इतकं सहज बोललं जात नाही. आपल्या एकटेपणात दुसºयाची मदत घेण्यात संकोच असतो. अर्थात दुसरा आपल्यासाठी रिकामाच बसलेला नसतो. सतत मदत घेतली तर आपल्याला त्याची सवय होईल का, दुसरा आपल्याला काय म्हणेल, कंटाळेल का, असे प्रश्न सतावत असतात. आजूबाजूला माणसं खूप; पण बोलायला कोणी नाही, हे वाटणं अजूनच एकटं पाडतं.

‘मला कोणी समजूनच घेत नाहीत’, ‘माझ्याबाबत नेहमी गैरसमजच केले जातात’, असे दोन, तीन, चार प्रसंगात घडले तर आपण आतल्या आत कोलमडून पडतो. जरा धीर एकवटून कोणाची सोबत शोधायला, चार शब्द बोलायला जातो, तर आपल्याला समजून घेतलं जात नाही, ही भावना घेऊन परततो. पुन्हा असं करणं नकोसं होऊन जातं अगदी. कोणाची मदत नको, आपण एकटंच बरं हेही मनावर बिंबवतो. या सगळ्यातून आपण अजूनच एकटे पडतो. हे एकटेपण आधी समजून घ्यावं लागतं आणि मग त्यावर लहान लहान उपाय शोधावे लागतात. पुढील भागात ते समजून घेऊच. तोवर, कधी आणि आठवड्यातून, महिन्यातून कितीवेळा आपल्या मनात ‘आपण एकटे आहोत, एकटे पडलोय’ असा विचार येऊन जातो, ते स्वत:लाच विचारूयात. हे तर जमेल ना? पण हा विचार सध्या मनातच ठेवू, फॉरवर्ड न करता!