शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

सरकारी होस्टेल्समध्ये जेवण की पैसे?

By admin | Published: March 01, 2017 1:48 PM

शासनाने अनुदान दिलेल्या समाजकल्याण विभागाच्या होस्टेल्समध्ये राहाणार्या विद्यार्थ्यांना जेवण मिळतं ते ठेकेदाराच्या माध्यमातून! जेवणापेक्षा तक्रारी जास्त अशी एकूण अवस्था असते. वरणाचं पाणी, पाण्यावरच्या अळ्या, आज बटाट्यात वाटाणा आणि उद्या वाटाण्यात बटाटा - आणि कधीमधी पाली, झुरळंही!

 शासनाने अनुदान दिलेल्या समाजकल्याण विभागाच्या होस्टेल्समध्ये राहाणार्या विद्यार्थ्यांना जेवण मिळतं ते ठेकेदाराच्या माध्यमातून! जेवणापेक्षा तक्रारी जास्त अशी एकूण अवस्था असते. वरणाचं पाणी, पाण्यावरच्या अळ्या,  आज बटाट्यात वाटाणा आणि उद्या वाटाण्यात बटाटा - आणि कधीमधी पाली, झुरळंही! अशा ठेकेदारी जेवणापेक्षा  समाजकल्याण विभागाने मुलांना थेट पैसेच दिले तर ? - एका चर्चेची सुरुवात!

दोनेक आठवड्यांपूर्वीची गोष्ट. मुंबईतल्या चेंबूरमधल्या समाजकल्याण विभागाच्या होस्टेलमध्ये मुलांच्या जेवणात पाल सापडल्याच्या बातमीनं मोठा गहजब झाला.या घटनेच्या पार्श्वभूमीवर समाजकल्याण विभागाच्या वतीनं शासनाला देण्यात आलेल्या एका अहवालात असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे की, यापुढे होस्टेलमध्ये मुलांना थेट जेवण देणं, त्यासाठी ठेकेदार नेमून स्वयंपाकाची व्यवस्था करणं हे सारं रद्द करून त्याऐवजी मुलांना थेट भोजनभत्ता देण्यात यावा. म्हणजे काय तर प्रत्येक मुलाच्या जेवण आणि नास्ता यापोटी सरकार जे पैसे खर्च करते, ते पैसे त्या मुलाला दरमहा थेट अदा करण्यात यावे. म्हणजे निकृष्ट जेवण, त्यातले गैरप्रकार, मुलांच्या जेवणाविषयीच्या तक्रारी हे सारं टाळून मुलांना जेवणाचं थेट स्वातंत्र्य मिळेल. बाजारभावाप्रमाणे ते हवी तिथं मेस लावून जेवू शकतात. महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात साधारण जीवनमानाच्या खर्चाप्रमाणं हा भत्ता बदलतो. पण साधारण ३४०० रुपये ते ४५०० रुपये दरमहा प्रतिविद्यार्थी असे पैसे शासनातर्फे खर्च होतात. हेच पैसे थेट विद्यार्थ्यांच्या हातात ठेवण्याचा प्रस्ताव आता विचाराधीन आहे.म्हणजे दिसतं असं आहे की, साऱ्या मध्यस्थांना फाटा देऊन थेट लाभार्थींपर्यंतच लाभ पोहोचवणं हे नव्या जमान्याचं सूत्र आता थेट होस्टेलपर्यंतही पोहोचणार आहे. जे आपण घरात गॅस सबसिडी, रेशनिंग यासंदर्भात अनुभवत आहोत तेच आपल्या होस्टेलच्या जेवणासंदर्भातही घडू घातलं आहे. व्यवस्थेतली गैरप्रकाराची बिळं बुजवून लाभार्थी व्यक्तीला निवड आणि दर्जाचं स्वातंत्र्य या व्यवस्थेत अपेक्षित आहे.शासकीय अनुदानित होस्टेल्समध्ये राहाणाऱ्या विद्यार्थ्यांना असे पैसे थेट मिळाले तर शहरात कुठंही आवडीची मेस लावून त्यांना जेवता येऊ शकतं. दर्जा नाहीच आवडला स्वयंपाकाचा तर ती मेस बदलता येऊ शकते. मेसचं ठेकेदारी जेवण, वरणाचं पाणी, पाण्यावरच्या अळ्या, उसळींचं फुळूक पाणी, वातड पोळ्या, रोज बटाटा आणि बटाट्यात वाटाणा हे चक्र संपू शकतं. आणि त्यातून विद्यार्थ्यांनाही हाती येणारा पैसा जबाबदारीनं वापरण्याचं आणि आपल्या निवडीचं स्वातंत्र्य जपण्याचं शिक्षणही मिळू शकतं.या अर्थानं पाहिलं तर हा प्रस्ताव चांगला आहे..पण प्रत्यक्षात काय घडतं?पुण्यात ज्ञानेश्वर होस्टेलमध्ये आणि लातूरच्या समाजकल्याण होस्टेलमध्ये असे विद्यार्थ्यांना थेट पैसे देण्याचे प्रयोग करण्यात आले.पुण्यातला प्रयोग फसला तर लातूरमध्ये काही विद्यार्थ्यांनी स्वत:हून भोजनभत्त्याची मागणी केली आणि आता ते त्या निर्णयाची जबाबदारी घेऊन आपल्या निर्णयावर ठाम आहेत..पैसे की जेवण?या एका प्रश्नाभोवती प्रत्यक्षात घडतं काय याचं या दोन शहरातलं लाईव्ह चित्र आजच्या अंकात पान ४+५ वर.समस्यांची नुस्ती चर्चा करण्यापलीकडे,उपाय म्हणून काही बदलांची जबाबदारी आपण घेऊ शकतो का याचीच ही चर्चा.. - आॅक्सिजन टीम

oxygen@lokmat.com