शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

वजन किती हवे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 8:33 AM

आपल्याला वाटते, वाढत्या वयानुसार आपले वजन योग्य आहे, पण खरे तर विसाव्या वर्षीचे वजन हेच आपले योग्य वजन!

-डॉ. यशपाल गोगटे

लहानपणापासून शरीराचा विकास व वाढ होत असतांना उंची व वजन वाढणे हा नैसर्गिक नियम आहे, पण एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे ज्यावेळेस वजन वाढते त्यावेळेस ते नुकसानकारक ठरत असते. यावरून जाडी किंवा लठ्ठपणा ठरत असतो. पण आपण जाड आहोत का नाही हे कसे ओळखावे? व्यक्ती तितक्या प्रकृती प्रमाणेच प्रत्येकाची अंगकाठी व वजन वेगवेगळे असते. त्यामुळे लठ्ठपणा ठरवतांना केवळ वजनाचा निकष लक्षात न घेता आणखीन काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक असते. यासाठी ‘बीएमआय’ हा साधारण लोकांना सहजपणे मोजता येईल असा फॉर्मुला उपयोगात आला.

बीएमआय = वजन / उंचीचा वर्गउदाहरणार्थ.. ५ फूट ७ इंच (१.७ मीटर) उंचीच्या व ७५ किलो वजनाच्या माणसाचा बीएमआय= ७५/ (१.७)२ = २५.९आशिया खंडातील विशेषत: भारतीयांमध्ये बीएमआय २१ हा योग्य मानला जातो. परंतु तो अधिक असल्यास त्या व्यक्तीला स्थूल असे म्हंटले जाते. हाच मानक युरोपीय लोकांसाठी ३० असा आहे. याचे कारण भारतीय लोकांमध्ये चरबी मुख्यत: पोटाच्या आसपास अधिक प्रमाणात साठते. पोटाच्या आसपासची चरबी ही जास्त धोकादायक असते कारण ही चरबी शांत न बसता रक्तामध्ये काही टॉक्सिक हार्मोन्स सोडते ज्याला एॅडीपो- सायटोकाईन्स असे म्हणतात. हे एॅडीपो- सायटोकाईन्स स्थूलतेमुळे होणाऱ्या मानसिक व शारीरिक आजारांना आमंत्रण देतात. याउलट युरोपीय वंशातील लोकांमध्ये खांदा व मानेच्या अवतीभवती विसावलेली चरबी ही शांत व निष्क्रिय असल्यामुळे एकूणच कमी धोकादायक असते.

बीएमआयच्या व्यतिरिक्त पोटाचा घेरसुद्धा लठ्ठपणाचा एक चांगला मापदंड म्हंटला जातो. स्त्रियांमध्ये हा ३१ इंच (८० सेमी) वा त्यापेक्षा अधिक तर पुरुषांमध्ये ३५ इंच (९० सेमी) च्या वर असल्यास स्थूलतेत मोडतो.वजनाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम दोन प्रकारात मोडतात- एक चयापचयाशी संबंधित आजार जसे डायबेटीस, कोलेस्टेरॉल, उच्च- रक्तदाब इ. व दुसºया प्रकारातील आजार स्थूलतेमुळे हाडं व स्नायूंचे आजार- पाठदुखीपासून गुडघे दुखीपर्यंत. या दोन्ही धोक्यांमध्ये तुलना केल्यास चयापचयाशी संबंधित आजार हे थोडेही वजन वाढले तरी आपले डोके वर काढतात, तर हाडांच्या व स्नायूंचे आजार वजनातील लक्षणीय वाढीनंतरच होतात. आपल्या शरीराचे वजन वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे येऊ शकते. त्यामध्ये अक्षरश: किलो-दीड किलोचाही फरक पडू शकतो. त्यामुळे शक्यतो वजन मॉनिटर करतांना एकाच वेळी ऐकाच काट्यावर वजन करावे.

१८ ते २० वयानंतर आपली उंची स्थिरावते व हाडांची वाढ थांबते. त्यामुळे या वयात जे वजन असते (जर ते ‘अति’ प्रमाणात नसेल तर) ते आपल्या शरिराला सहजपणे पेलवते. सामान्यत: एक समज आहे कि वयाबरोबर वाढणारे वजन हे शरीराला सहजपणे पेलवता येते, पण या वाढणाºया वजनालाही ५ किलोपर्यंतची मर्यादा असते. म्हणजेच तुमच्या अठरा ते विसाव्या वर्षाच्या वजनापेक्षा जर तुमचे वजन ५ किलोपेक्षा अधिक असेल आणि जरी ते उंचीला प्रमाणशीर असेल तरीही ही लठ्ठपणाची सुरवात ठरू शकते.उदाहरणादाखल एखाद्या अतिशय काटक स्त्रीचे अठरा ते विसाव्या वर्षीचे वजन ४५ किलो आहे व दहा वर्षानंतर ते ६० झाले, तर ती लठ्ठपणातच मोडते. तिच्या उंचीनुसार योग्य वाटणारे हे वजन तिच्याकरता धोकादायक असू शकते. त्यामुळे बारीक माणसाने आयुष्यभर बारीकच राहावे व जाड माणसाने आयुष्यभर बारीक होण्याचा प्रयत्न करावा.माणसाच्या वजनवाढीचीही काही कारणे आहेत. ते पाहूया पुढील लेखात..

(लेखक एंडोक्रिनॉलॉजिस्ट अर्थात हार्मोन तज्ज्ञ आहेत.)