शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

एआय हाजीर हो म्हटल्यावर रोबोट संसदेत साक्ष द्यायला येतो तेव्हा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 5:52 PM

तुम्ही वैमानिक होण्याचं स्वप्न पाहाल पण तोवर विमानं उडवण्याचं काम रोबोटच करायला लागतील त्यावेळी आपण काय करू?

ठळक मुद्देब्रिटनच्या संसदेत रोबोट साक्ष द्यायला आला, आता पुढे.

कालचीच बातमी आहे की ब्रिटनच्या संसदेमध्ये ‘पेप्पर’ नावाच्या रोबोटला पाचारण करण्यात आलं होतं. एआयवर आधारित प्रणालीचा वापर करणारा हा पहिला ‘साक्षीदार’. ‘एआय हाजिर हो’ म्हटल्यावर हा रोबोट संसदेत आला आणि साक्षही त्यानं दिली. जगातल्या सर्वात जुन्या आणि आद्य लोकशाहीच्या साक्षीनेच ही ‘साक्ष’ झाली!अजून एक महत्त्वाची बातमी म्हणजे नागरी विमान उद्योगात अशी वदंता आणि अभ्यास आहे की वैमानिकांऐवजी रोबोट वापरले तर खर्च कमी होईल. आणि तोही थोडाथोडका नसेल. अभ्यास असं सांगतो की आता ज्या विमानांमध्ये दोन वैमानिक असतात त्याऐवजी एक वैमानिक व 1 रोबोट ठेवला तर 15 अब्ज व दोन्ही वैमानिकांऐवजी रोबोट ठेवले तर 35 अब्ज डॉलर्स वाचतील! लक्षात घ्या ही रक्कम थोडीथोडकी नव्हे. आयबीएम या जगद्विख्यात कंपनीच्या वार्षिक उलाढालीच्या 1/3 एवढी ही रक्कम आहे! म्हणजे आर्थिकदृष्टय़ा हे आकर्षक आहे!

मागील आठवडय़ात एका सेवाभावी संस्थेसाठी करिअर नियोजन कार्यशाळा मी घेतली. त्यात एक बारामतीची मुलगी -जिला आर्थिक अडचणीमुळे शिष्यवृत्ती मिळाली होती ती सहभागी झाली होती.  तिनं सांगितलं की शेतजमिनीचा काही भाग विकून तिच्या कुटुंबानं तिला वैमानिक होण्याच्या करिअरसाठी काही लाख रुपये उभारून दिलेत. कुटुंबानं मुलीच्या स्वप्नासाठी ही मजल मारली याचं कौतुक आहे, त्या मुलीच्या धडाडीचंही कौतुक आहे. पण विमानं चालवायच्या क्षेत्रात होऊ घातलेल्या बदलाची मात्र त्या मुलीला काही कल्पनाच नाही. काहीच वर्षात वैमानिकांऐवजी रोबोट विमानं चालवतील याबद्दल तिला काहीच माहिती नव्हती. ही गोष्ट काळजी करण्यासारखीच नाही का? तिच्यासाठी आणि आपल्यासाठीही.मला तर असं वाटतं की बर्‍याच रोजगारसंधींबाबत ही परिस्थिती कमी-अधिक प्रमाणात आणि कमी-अधिक कालखंडात येऊ शकते. म्हणून वाचकहो आपण सावध राहायला हवं. रोजगाराच्या संधी खूप कमी होतील असे भाकीत नसून रोजगाराचं, नोकरी आणि कामाचं स्वरूप बर्‍याच प्रमाणात बदलेल हे भाकीत अनेक शास्त्रज्ञ, अर्थतज्ज्ञ करत आहेत.परवाच पंतप्रधान मोदींनी ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या कार्यक्रमात दिल्लीत असं सांगितलं की भारतानं ‘इंडस्ट्री 40’चं खुल्या दिलानं स्वागत करायला हवं. इंडस्ट्री 1.0 आणि 2.0 च्या काळात भारत पारतंत्र्यात होता आणि इंडस्ट्री 3.0 च्या वेळी आपण नुकतंच स्वतंत्र होऊन समाजवादी जोखडात अडकले होतो; पण आजच्या इंडस्ट्री 4.0 काळात भारत जोमानं विकसित होतोय आणि हीच आपली संधी आहे. भारतात सध्या टेलेडेन्सिटी ही 93 टक्के आहे. 50 कोटी लोकांकडे मोबाइल आहे. आपल्याला मराठी माणूस म्हणून अजून विशेष अभिमानाची गोष्ट म्हणजे, जगातील चौथं केंद्र जे ‘इंडस्ट्री 4.0’साठी बनेल ते महाराष्ट्रात बनणार आहे. तशी घोषणा पंतप्रधानांनी केली. पहिलं केंद्र सॅन फ्रान्सिस्को, दुसरं टोक्यो, तिसरं बिजिंगला आहे. चौथं केंद्र महाराष्ट्रात प्रामुख्याने ड्रोन्स, एआय व ब्लॉकचेन या तंत्रज्ञानांवर काम करेल. या तीनही तंत्रज्ञानांचा ऊहापोह आपण या लेखमालेत आधी केला आहेच.ब्लॉकचेन याचा वापर आभासी चलनं तयार करण्यात, त्यांचा विनिमय करण्यात व त्याची सुरक्षा यासाठी होतो हे आपल्याला माहिती आहेच. ब्लॉकचेनचा वापर करून तयार झालेल्या प्रणालीचा वापर नीट झाला तर  भ्रष्टाचाराला आळा बसू शकेल तेही राष्ट्रीयस्तरावर. परंतु इतकं पुढे जाण्याची गरज नाही. परवाचीच बातमी आहे की आपल्या भारतात अगदी बंगलुरूमध्ये ‘केम्प फोर्ट मॉल’मध्ये आभासी चलनातील काम करणारी कंपनी ‘उनोकॉईन’ यांनी बिटकॉइन/इथेडियम्चे एटीएम मशीन बसवलंय. ओटीपी वापरून तुम्ही आभासी चलन डिपॉझिट करू शकता व काढू शकता!‘एआय हाजिर हो’ असं म्हणे म्हणे र्पयत इंडस्ट्री 4.0 आपल्या दारात पोहोचून जुनं झालंय ते असं!!