सध्याच्या काळात खासगी क्षेत्रात काम करणं म्हणजे खूपच जीव मुठीत घेऊन करण्यासारखं आहे. कारण सतत आपला पर्फोमन्स द्यावा लागतो नोकरी आज आहे तर उद्या नाही अशी परिस्थिती असते. त्यातुनच आर्थिक मंदीचा फटका संपूर्ण भारतातल्या कंपन्याना बसत असताना प्रत्येक व्यक्तीला आपला जॉब टिकवण्यासाठी आधीपेक्षा खूप मेहनत घ्यावी लागत आहे. अनेक जण मानसीक तणावात जगत असतात.
स्वतःच्या कार्यक्षमतेवर शंका घेऊन वावरत असतात. जर तुमच्या बाबतीत सुद्धा असं होत असेल टेंन्शन घेण्यासारखं यात काहीही नाही, जर तुमच्यावर जॉबलेस होण्याची वेळ आली तर ही परिस्थिती कशी हॅण्डल करायला हवी हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
(image credit-IES magazine)
अनेक मुलांवर आणि मुलींवर घरची जबाबदारी असते. त्यामुले पैसे कमावण्याशिवाय पर्याय नसतो. त्यांना स्वतःच आयुष्य मनासारखं इन्जॉय करता येत नाही मानसीक आरोग्य चांगले राहत नाही. कारण सतत पैश्याच्या आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तडफड चालू असते. आकड्यांचं चक्र डोक्यात फिरत असतं.
(image credit- forbes)
अनेकदा खासगी क्षेत्रात वातावरण अनुकूल वातारणं नसतं. सहकारी वर्ग तसचं बॉसच्या नकारात्मक प्रतिक्रिया काहीवेळा त्रासदायक ठरू शकतात. अनेकदा तुम्ही ज्या ठिकाणी काम करत असता त्या ठिकाणचे मॅनेजमेंट पोलीसी किंवा अंतर्गत काही कारणांमुळे तुम्हाला पदावरून हटवण्यात येऊ शकतं. या स्थितीतून बाहेर पडून स्वतःचा बचाव करायचा असेल तर तुम्ही काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. ( हे पण वाचा-अनुभव नसल्यामुळे नोकरी मिळत नसेल, तर 'या' खास टीप्स तुमच्यासाठीच)
(image credit-menutes.com)
कोणत्याही कंपनीत तुम्हाला राजीनामा देण्याची वेळ का येते
राजीनाम्यासाठी कोणतीही जबाबदारी कंपनीची राहत नाही. जरी आपण कंपनीच्या दबावात राजीनामा दिला असला तरी उद्या आपण कोणत्याही शासकीय किंवा न्यायालयीन व्यवस्थेपुढे आव्हान देऊ शकत नाही. कारण तुम्ही स्वखुशीने राजीनामा दिला आहे असेच अधोरेखित होते. (त्यामुळे अनेकदा कंपनीतील चोरी, विनयभंग, गैरव्यवहार अश्या प्रकरणात देखील थेट टर्मिनेशन चा मार्ग न अवलंबता त्या एम्प्लॉयीकडून राजीनामा लिहून घेतात. असो…) कंपनीचे कुठल्याही प्रकारचे दायित्व व जबाबदारी अशावेळी राहत नाही. अनेकदा कंपनीला होणारं नुकसान परवडणारं नसतं त्यामुळे तुम्हाला पदावरून हटवण्यात सुद्धा येऊ शकतं.( हे पण वाचा- जॉबलेस झाल्यानंतर येणाऱ्या समस्या टाळण्यासाठी 'हे' नक्की वाचा )
(Image credit-live science)
मानसीक आरोग्य असं ठेवा चांगलं.
तुमच्याबाबतीत सुद्धा असं झालं तर स्वतःच्या भावना स्वीकारून आपल्या चुकांना सुधारण्याचा प्रयत्न करा. या चुका पुन्हा नव्याने काम करत असताना टाळा. स्वतःला काय वाटत आहे. आपण कुठे चुकत आहोत का या गोष्टींचा विचार करा.
जर तुम्हाला खूप ताण आला असेल तर आपल्या घरातील लोकांना विश्वासात घेऊन त्यांना तुमची समस्या सांगा. या कालावधीत घरच्या व्यक्तींना वेळ दिल्याने तसंच त्यांचाशी मनमोकळ्या गप्पा मारल्याने तुम्हाला प्रसन्न वाटेल आणि ताण हलका होईल. जर तुम्हाला जास्त राग किंवा दडपण येत असेल तर ताण घालवण्यासाठी मद्याचे अतिसेवन करणे, बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळा. असं केल्यास तुमचे विचार नकारात्मक होण्याची शक्यता असते.