शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
4
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
5
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
6
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
8
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
9
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
10
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
11
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
12
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
13
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
14
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
15
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
16
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
17
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
19
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
20
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

क्लिक होतं तेव्हा..

By admin | Published: March 21, 2017 3:08 PM

नात्यापासून शॉपिंगपर्यंत आपलं आयुष्य एका क्लिकवर येऊन पोहचलं आहे का?

 - नोटबंदीनंतर कॅशलेस व्यवहार करायला हवेत, असं सर्वचजण म्हणायला लागले. या कॅशलेस व्यवहारापायी आपलं जगणंच एका 'क्किलवर' सामावलेलं असल्याचं वाटायला लागलंय. पैशांचे सगळेच व्यवहार आता आॅनलाईन आणि तेही एका क्लिकवर होतात. 'क्लिक' केलं की काहीही म्हणजे अगदी काहीही आपण पटकन करतो. ( आपल्या मैत्रीत, प्रेमात अगदी जुजबी गोष्टीतही काही गोष्टी क्लिक होतात, काही नाही!)

सोमवार ते शनिवार हे वार तर सगळ्यांचेच अत्यंत धावपळीत जातात. एका रविवारी किती आणि काय काय कामं करणार. आराम तर पाहीजे की नको! मग घर सावरायला,आवरायला बँकेची काम करायला अशा कितीतरी गोष्टींसाठी हे क्लिक करणं आता फायद्याचं ठरतं आहे.

आॅफिसला डबा नेतोच तरी मधे भूक लागली असली तर फोनवरून आॅर्डर देण्यापेक्षा तेही आॅनलाईन मागवलं जाऊ लागलंय. बरं टेस्ट कशी आहे त्यापेक्षा रिव्ह्यू काय आहे यावरूनही आता खाणं ठरायला लागलं आहे. त्यामुळे खाणं 'क्लिक' होण्यासाठी ते कसं दिसतंय यासाठीही अनेकदा क्लिक करत रिव्ह्यू वाचायला लागतात.

घरीसुद्धा कॉफीमेकर, टोस्टर, आॅव्हन हे दिमतीला असतातच. त्यांच्या बटणांचा योग्य उपयोग करून आता घेतला जातोय. घरी-दारी कुठेही हे क्लिक फार म्हणजे फार महत्वाचं ठरू लागलंय. शॉपिंग ला जायचंय मात्र वेळच नाही. फिकर नॉट! आवडती साईट उघडायची आणि भरपूर प्रकारचे कपडे एका कळीसरशी आॅनलाईनच बिल भरून मागवायचे. एवढच नाही तर किराणा मालाचे सामान घ्या. प्रत्येकाचा ब्रँड हा ठरलेलाच. एका क्किलवर आपल्या सोयीप्रमाणे तेही सामान आॅर्डर करता येतं. हा मात्र किराणा माल घेताना वस्तू बघत बघत एखादं काही वेगळं घेण्याची मजा मात्र यात मिळत नाही. पण पर्याय नाही. त्यामुळे आॅनलाईन भटकंती करत ही हौस भागवायची. यात पण सॉल्लिड थ्रील वाटतं. फर्निचर घेतानाही हाच निकष लागू होतो आहे. अगदी प्रत्येक शॉपिंग एका 'क्लिक’वर आलं आहे.आणखी एक गंमत, पूर्वी साग्रसंगीत वधू-वर सुचक केंद्रात जाऊन नाव नोंदणी व्हायची. पुस्तकं बघून आवडतं स्थळ बघितलं जायचं. आता मात्र यात सारं चित्रच बदललं आहे. सगळंच आॅनलाईन. आवडतं प्रोफाईल बघून क्लिक करायचं. इंटरेस्ट पाठवायचा आणि पलीकडून रिप्लाय आला तर कॉण्टॅक्ट करायचा. त्याच्या किंवा तिच्या अधिक माहितीसाठी झुक्याचं फेबु आहेच. अशा कितीतरी गोष्टीत आता मजा येऊ लागली आहे. असं सगळं सगळंच आता एका क्लिकसरशी व्हायला लागलाय. मग ते कुठलही काम असो. त्या कामात पैसे जरी जात असतील तरी वाचतोय तो वेळ. आणि सध्या तोच गरजेचा आहे. कारण वेळच मिळत नाहीये. स्वता:साठी नाहीच तिथे इतरांची काय कथा... शेवटी काय जियो 'क्लिक'के संग..-भक्ती सोमण