-चित्रा अहेन्थेम
मणिरत्नमचा रोजा आमच्या इम्फाळमध्ये रिलिज झाला तेव्हा म्हणजे 1991 साली मी अकरावीत होते. शाळा बुडवून आम्ही मैत्रिणी रोजा पहायला गेलो होतो. रोजाच्या गाण्यांनी सार्यांनाच वेड लावलं होतं, सिनेमाच्या तर सगळेच प्रेमात पडले. ज्या प्रॉडक्शन हाऊसने तो सिनेमा बनवला, ज्याच्या संगीतानं वेड लावलं त्यांच्यासोबत मी कधी काम करेन असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण ते झालं, कविथालय प्रॉडक्शन हाऊससोबत आणि दस्तूरखुद्द ए.आर. रहमानसोबत काम करण्याची सुवर्णसंधी माझ्यार्पयत चालून आली.कट टू एप्रिल 2018. बोरून थोकचाम, हे इम्फाळचे तरुण फिल्ममेकर. एक दिवस त्यांचा मला फोन आला. थोडक्यात म्हणाले, एक चेन्नईचं बडं प्रॉडक्शन हाऊस आहे. ते लोक लॉरेमबाम बेदबती यांच्यावर एक डॉक्युमेण्ट्री बनवत आहेत. त्यांच्याकडे ट्रान्सलेटर आहे; पण मणिपुरी भाषा, लोकसंगीत यांसाठी कुणीतरी उत्तम मणिपुरी-इंग्रजी येणारं हवंय, तू करशील का हे काम? - बेदबती या मणिपूरच्या अत्यंत ख्यातनाम खुंग इशेई गायक आहेत. हा एक प्रकारचा लोकसंगीताचा प्रकार आहे. मौखिक ज्ञानपरंपरा आणि सामाजिक-सांस्कृतिक रीतीनुसार हे लोकसंगीत गायलं-शिकवलं जातं. आताशा ही कलाही मरणपंथालाच लागलेली आहे.या डॉक्युमेण्टरीचं काम करायचं की नाही हे ठरवण्यापूर्वी मला त्या चेन्नईच्या टीमला भेटायचं होतं. पण संध्याकाळ होता होता त्या क्रूमधले आठ जण माझ्या घरीच आले. पण त्या प्रोजेक्टविषयी काही फारसं सांगत नव्हते. तुटक बोलत होते. त्यांना आता फक्त माझा होकार आणि काही विशिष्ट तारखा हव्या होत्या. काही काळ मी चेन्नईत येऊन काम करावं एवढंच म्हणणं होतं. माझा निर्णय पटकन होईना तेव्हा बोरूनच हळूच माझ्या कानात म्हणाला, या प्रोजेक्टमध्ये ए.आर. रहमानपण असणार आहेत, नाही म्हणू नकोस. पण ते तेवढंच, त्या प्रॉडक्शन हाऊसमधल्या दुसर्या कुणीही ए.आर. रहनामनचं नावही घेतलं नाही. पण तरीही मी त्या प्रोजेक्टला होकार भरला. त्याचं आणखी एक कारण म्हणजे मलाही ओजा बेदबतीविषयी, त्यांच्या गाण्याविषयी अधिक जाणून घ्यायचं होतंच. मणिपुरीत ओजा म्हणजे गुरु. ओजा बेदबती यांच्यासोबत काम करण्याचा अनुभवही हवासाच होता.साधारण आठवडाभरातच काम सुरू झालं. पण कुठंही ए.आर. रहमानचा उल्लेख नव्हता. तासन्तास शूटिंग चालायचं, कामापलीकडे काही बोलणंही व्हायचं नाही. पुन्हा ए.आर. रहमानचा कुणी कुठं उल्लेखही करत नव्हतं. पहिलं काही शूट संपवून तो क्रू पुढच्या शेडय़ुलसाठी सिक्कीमला रवानाही झाला. मेमध्ये पुन्हा शूटिंगचं दुसरं शेडय़ुल लागलं.आणि त्यावेळी वाटलं ए.आर. रहमान भेटणार. ‘हार्मोनी विथ ए.आर. रहमान’ या म्युझिक मिनी सिरीजचं हे शूटिंग होतं. खुद्द रहमान मणिपूरला, ओजाब बेदबतीच्या घरी आला. पूर्व इम्फाळच्या काहीशा ग्रामीण भागात, सेईंजंगमध्ये ओजा बेदबती यांचं घर आहे. जुनी पुरातन वास्तू. तिथं शूट सुरू झालं. मी आसपासच होते, ट्रान्सलेटरची गरज कधीही भासली तर आपण जवळ असणं गरजेचं असं मला वाटलं. ओजा बेदबती रहमानचं स्वागत करतात, असा पहिला सीन शूट झाला आणि मग घरात पुढच्या सीनची तयारी झाली.पुढच्या सीनची तयारी होत होतीच त्या दरम्यान कार्यक्रमाची दिग्दर्शक श्रुती हरीहरा हिने मला थेट रहमानला भेटवलं. ओळख करवून दिली. आम्ही शेकहॅण्ड केलं, ओळख झाली. आणि त्या क्षणापासून सर रहमान आणि ओजा बेदबती यांच्या गप्पांतला मी एक अदृश्य धागा बनले. जुन्या पद्धतीची भुई घेतलेली जमीन, जुनंच चमचमतं छत, जुनं घर या वातावरणातही सर रहमान सहज वावरत होते. शूटिंगची तयारी होईर्पयत शांतपणे वाट पाहत होते. कॅमेरा अॅँगल्स लागले, त्या गप्पांचेही टप्पे झाले म्हणजे मग गप्पा सुरू झाल्या, की मी दोघांचं बोलणं परस्परांना ट्रान्स्लेट करून सांगू लागले. दोघांच्या गप्पा झाल्या, शॉट ओके झाला की रीटेक देऊ, असं ते शांतपणे विचारतही.ए.आर. रहमानविषयी मी वाचलं, ऐकलं होतं की, ते अत्यंत कमी बोलतात, अत्यंत विनम्र आहे. दुसरी गोष्ट खरीच आहे; पण कमी बोलतात असा माझा तरी अनुभव नाही. त्यांनी मणिपूरविषयी मला बारीक बारीक प्रश्न विचारले. इथली माणसं, वातावरण, जेवणखाण याविषयी उत्सुकतेनं जाणून घेतलं. मग विचारलं की ही जी पहाडांची रांग दिसतेय, त्यापलीकडे काय आहे? मी त्यांना सांगितली की, त्यापलीकडे एक नदी आहे, ती पार करूनच दुसर्या महायुद्धाच्या काळात जपानी सैन्य इथवर पोहचलं होतं. हे ऐकून ते पटकन म्हणाले, ‘हाउलीटल वुई नो अबाउट यूअर प्लेस !’ हे असं चटकन म्हणणंही मला फार मोलाचं वाटलं. अजून एक गोष्ट मला चकीत करून गेली. त्यांचा मिश्कील स्वभाव. अत्यंत सहजपणे ते आवतीभोवती वावरणार्या लोकांना स्वतर्शी जोडून घेतात, सहज गप्पा मारतात. या शूटच्या वेळीही मधल्या वेळात ते मणिपूरच्या प्रसन्न हवेविषयी कौतुकानं बोलले आणि एकदम म्हणाले, ‘नाहीतर आमच्या चेन्नईची हवा, रंग बघ माझा कसा झालाय त्यामुळे.!’ मग मी त्यांना सांगितलं की पहिलं शूट संपलं तेव्हा मी काळ पोस्ट प्रॉडक्शनच्या कामासाठी चेन्नईत येऊन गेले. मुलाखती ट्रान्स्क्रीब करण्याचं काम केलं तेव्हा ते ऐकून ते हसले म्हणाले, ‘आह, तुला भयंकर उकडलं असेल तिथं. पण डोण्ट वरी, तू काही फार काळी पडणार नाहीस तिकडे ! पण पुढच्या वेळी चेन्नईला आलीस की माझ्या म्युझिक कॉलेजला ये!’ - हे शेवटचं वाक्य ऐकून तर मी उडालेच!